AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ह्युंदाईची वेन्यू फेसलिफ्ट कार होणार लाँच…‘अशी’ देईल ब्रेझाला टक्कर, काय आहेत खास वैशिष्ट्ये

ह्युंदाई लवकरच आपल्या एसयुव्ही सेगमेंटमधील वेन्यूचा फेसलिफ्ट व्हेरिएंट भारतात लाँच करणार आहे. त्यामुळे येत्या काळात एसयुव्ही सेगमेंटमध्ये कार निर्मात्या कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही नवीन एसयुव्ही अनेक फीचर्सही खास ठरणार आहे.

ह्युंदाईची वेन्यू फेसलिफ्ट कार होणार लाँच...‘अशी’ देईल ब्रेझाला टक्कर, काय आहेत खास वैशिष्ट्ये
Hyundai Venue Facelift Image Credit source: Hyundai
| Updated on: Jun 14, 2022 | 12:12 PM
Share

दक्षिण कोरियाची प्रसिद्ध कार निर्माता कंपनी ह्युंदाईची (Hyundai) नवीन कार ह्युंदाई वेन्यू फेसलिफ्ट (Hyundai Venue) कार या आठवड्यात लाँच होणार असून या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स पाहायला मिळणार आहेत. यासोबतच या अपकमिंग कारच्या डिझाईनमध्ये काही महत्त्वाचे बदलही पाहायला मिळणार आहेत. ही कार 16 जून रोजी लाँच केली जाणार आहे. एका रिपोर्टनुसार, ह्युंदाईला आपल्या या अपकमिंग कारच्या मदतीने मारुती सुझुकी ब्रेझाशी (Maruti Suzuki Brezza) स्पर्धा करायची आहे. त्यामुळे ह्युंदाईची अपकमिंग कार लाँच होताच ती ब्रेझाला टक्कर देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुढील काही मुद्यांच्या आधारे या कारबद्दल अधिक माहिती घेणार आहोत.

1) डिझाइन

ह्युंदाई वेन्यूच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले, तर त्यात फ्रंट ग्रील अपडेट करण्यात आले आहेत, यामुळे या नवीन कारला एकदम फ्रेश आणि आकर्षक लुक मिळण्यास मदत झाली आहे. कारचे प्रोडक्शन करताना क्रोम ग्रीलचा वापर करण्यात आला असून तो, अल्काझार कार आणि आगामी क्रेटाच्या डिझाइनशी मिळताजुळता दिसत आहे. याशिवाय, या वाहनातील टेल-लाइट्स देखील कनेक्ट केलेल्या लाइट सेटअपसह अपग्रेड करण्यात आलेले आहेत.

2) तीन इंजिन पर्याय

ही कार तीन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये दोन पेट्रोल पॉवरट्रेन आणि एक डिझेल व्हेरिएंट उपलब्ध असेल. ही कार Kappa 1.2L MPI पेट्रोल इंजिन, One Kappa 1.0 Turbo GDI पेट्रोल इंजिन आणि U2 1.5 CRDi डिझेल इंजिनसह दिसेल.

3) सात रंगांचा पर्याय

ह्युंदाईची ही कार सात रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये टायफून सिल्व्हर, टायटन ग्रे, डेनिम ब्लू, फँटम ब्लॅक, पोलर व्हाइट, फायरी रेड, फँटम ब्लॅक रूफसह फायरी रेड सारख्या अनेक आकर्षक रंगांचा समावेश आहे.

4) इतर फीचर्स

वरील सर्व फीचर्सशिवाय सर्व प्रकारच्या नवीन अपग्रेड Hyundai Venue मध्ये देखील दिसून येणार आहेत. यामध्ये विविध प्रादेशिक भाषांसाठी सपोर्ट, नवीन ड्राइव्ह मोड सिलेक्टर, मागील प्रवाशांसाठी दोन-स्टेप रिक्लाइनिंग सीट आणि 60 कनेक्टेड कार आदी विविध फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.