कार चालवताना अचानक फेल झाले ब्रेक? अपघातापासून वाचण्यासाठी काय कराल

Car Break Fail | कार चालवताना अचानक तुमच्या कारचे ब्रेक फेल झाले तर किती अडचणीत सापडला नाही? रस्त्यावरुन वाहन चालवताना केव्हा काय होईल काही सांगता येत नाही. ब्रेक जर अचानक निकामी झाले तर अशावेळी घाबरुन न जाता सर्वात अगोदर कार थांबविण्यासाठी उपाय करणे आवश्यक आहे. त्यामुळे कारचा अपघात टळेल.

कार चालवताना अचानक फेल झाले ब्रेक? अपघातापासून वाचण्यासाठी काय कराल
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 11:43 AM

नवी दिल्ली | 29 नोव्हेंबर 2023 : कार चालवताना अचानक ब्रेक निकामी झाल्यास मोठी बिकट परिस्थिती होते. अशा स्थितीत सहाजिकच आहे, कोणी पण घाबरुन जाईल. त्यामुळे दुर्घटना होण्याची जास्त शक्यता असते. पण तुम्ही वेळेचे भान ठेवत योग्य पाऊलं टाकली तर कदाचित मोठी दुर्घटनेपासून तुम्ही वाचू शकता. तसेच इतरांना पण तुमच्यामुळे कोणताही धोका राहणार नाही. जाणून घ्या कारचे ब्रेक निकामी झाले तर सर्वात अगोदर काय उपाय करावा आणि अपघात होण्यापासून कसे टाळावे?

Car चे ब्रेक फेल होण्यापूर्वी करा हे काम

  • घाबरु नका – ब्रेक फेल झाल्याचे कळताच घाबरुन जाऊ नका. घाबरल्याने अजून एखादी मोठी चूक होऊ शकते.
  • हॉर्न वाजवा – ब्रेक फेल झाल्यावर हॉर्न वाजवा. ज्यामुळे इतर चालकांना काहीतरी गडबड असल्याची सूचना मिळेल. ते तुमच्या कारपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतील.
  • गिअर डाऊन करा – ब्रेक फेल झाल्यावर टॉप गिअरवरुन खालच्या गिअरकडे या. त्यामुळे कारचा वेग कमी होईल.
  • ब्रेक पॅडल दाबा – ब्रेक फेल झाले असले तरी ब्रेक पॅडल दाबा. सतत दाबल्याने थोडाफार परिणाम होऊन कारचा वेग कमी होण्यास मदत मिळू शकते.
  • हँडल सोडू नका – अशा प्रसंगात कारचे हँडल सोडू नका. ते दिशा देण्यासाठी आणि सुरक्षित स्थळी पोहचण्यासाठी मदतीला येईल.
  • कार थांबविण्याचा प्रयत्न करा – कारचा वेग कमी झाला तर पटांगण पाहून ती थांबवण्याचा प्रयत्न करता. सुरक्षित स्थळ शोधा. त्यामुळे कोणाला इजा होणार नाही.

या गोष्टींचे ठेवा ध्यान

हे सुद्धा वाचा
  • इंजिन बंद करु नका- इंजिन बंद करु नका. ब्रेक फेल झाल्यावर ही गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा. इंजिन बंद झाले तर कारवर नियंत्रण राहणार नाही.
  • हँड ब्रेकचा वापर करा – कारचा वेग कमी झाल्यास, कारच्या हँडब्रेकचा वापर करा.
  • कार थांबविण्याचा प्रयत्न करा – कारचा वेग कमी झाला, तर वाळूचा ढिगारा, मातीचा ढिगारा अथवा एखाद्या वस्तूला ठोस द्या. त्यामुळे कार थांबेल. पण तुम्हाला इजा होणार नाही आणि कारचे पण मोठे नुकसान होणार नाही.

मेंटेन्सकडे द्या लक्ष

  • कारच्या मेंटेन्सकडे जरुर लक्ष द्या. ब्रेक सिस्टम अगोदर तपासून घ्या. नियमीत त्याची तपासणी करा.
  • ब्रेक सिस्टिम सातत्याने चेक करा. एखाद्या मॅकेनिकला ते दाखवा.
  • कारचे ब्रेक फेल झाले तर सर्वात अगोदर ती रस्त्याच्या कडेला घेऊन वेग कमी करण्याचा प्रयत्न करा.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर.
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?.
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा.
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने...
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने....
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज.
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका.
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल.