AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दैनंदिन वापरासाठी दारी कार हवी, तर या 5 CNG कार करतील मोठी बचत, मिळतेय इतके डिस्काऊंट

Best CNG Cars:जर तुम्ही घर ते कार्यालय अशा रोजच्या वापरासाठी वा कुटुंबियांना फिरण्यासाठी एक विश्वासार्ह कारच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक फायद्याचा सौदा समोर आला आहे.

दैनंदिन वापरासाठी दारी कार हवी, तर या 5 CNG कार करतील मोठी बचत, मिळतेय इतके डिस्काऊंट
budget cng car
| Updated on: Jun 22, 2026 | 3:52 PM
Share

डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या असताना सीएनजी स्वस्तातले इंधन मानले जात आहे.याशिवाय सीएनजी कार चांगले मायलेज देतात आणि पर्यावरण स्नेही असतात. याच कारणाने गेल्या काही वर्षात सीएनजी कारची लोकप्रियता वाढली आहे.

जून २०२५ मध्ये अनेक प्रमुख कार कंपन्यांनी त्यांच्या प्रसिद्ध सीएनजी कारवर चांगले डिस्काऊंट आणि ऑफर दिली आहे. जर तुम्ही ऑफीस जाण्यासाठी वा फॅमिलीसाठी लांबचा प्रवास करण्यासाठी एका विश्वासार्ह कारच्या शोधात असाल तर ही ऑफर तुमच्यासाठी फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकते.

Hyundai Grand i10 Nios

Hyundai ग्रँड i10 निओस CNG वर चांगले डिस्काऊंट मिळत आहे. कंपनी या कारवर एकूण ७५ हजारापर्यंतचे डिस्काऊंट देत आहे. या ऑफरमध्ये कॅश डिस्काऊंट, एक्स्चेंज बोनस,स्क्रॅपेज बोन, कॉर्पोरेट आणि इतर ऑफरचा समावेश आहे. ही कार शहरातील दैनंदिन वापरासाठी खूपच प्रसिद्ध आहे. याची किंमत सुमारे ५.६० लाख रुपयांनी सुरु होत ७.७७ लाखापर्यंत आहे.

Maruti WagonR CNG

दुसरा नंबर Maruti WagonR CNG कारचा आहे. देशातील सर्वाधिक विक्री होणारी हॅचबॅक कारपैकी एक आहे. कंपनीने याच्या पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंट्सवर ५२,५०० रुपयांचा फायदा देत आहे. या ऑफरमध्ये कॅश डिस्काऊंट, एक्स्चेंज वा स्क्रॅपेज बोनस आणि कॉर्पोरेट ऑफरचा समावेश आहे. वॅगनआर कार तिच्या मोठा केबिन स्पेस, कमी मेटेनन्स आणि चांगल्या मायलेजसाठी ओळखली जाते. या कारची किंमत सुमारे ४.९९ लाख रुपयांनी सुरु होते.

Maruti Swift CNG

जर तुम्हाला थोडा स्पोर्टी लुक आणि चांगला ड्रायव्हींगचा अनुभव हवा असेल तर मारुती स्विफ्ट सीएनजी एक चांगला पर्याय होऊ शकते. कंपनी याच्या मॅन्युअल ट्रान्समिशन मॉडेल्सवर एकूण ४० हजार रुपयांची ऑफर देत आहे. ही कार युवकांमध्ये प्रसिद्ध आहे. आणि हीची सुरुवातीची किंमत ५.७९ लाख रुपये आहे.

Tata Altroz CNG

Tata Altroz CNG वर देखील ग्राहकांना ४० हजाराची सुट मिळत आहे. या प्रीमियम हॅचबॅकमध्ये डिस्काऊंट आणि एक्स्ट्रा बोनसची ऑफर आहे. अल्ट्रोज तिची मजबूत बिल्ड क्वालिटी, सेफ्टी फिचर्स आणि आकर्षक डिझाईनसाठी ओळखले जाते. या कारची किंमत ६.३० लाख रुपयांनी सुरु होऊन १०.७७ लाख रुपयांपर्यंत जाते.

Tata Tiago CNG

या यादीत पाचवे नाव टाटा टियागो सीएनजी कारचे आहे. कंपनी निवडक व्हेरिएंट्सवर ३५,००० रुपयांपर्यंतचा फायदा देत आहे. ग्राहकांनी कॅश डिस्काऊंट सह स्क्रॅपेज वा एक्स्चेंज बोनसचा देखील लाभ मिळू शकतो. टियागो त्या लोकांसाठी चांगला पर्याय आहे ज्यांना कमी बजेटमध्ये सेफ आणि मायलेजवाली कार हवी आहे. या कारची किंमत सुमारे ४.७० लाख रुपयांनी सुरु होते.

Follow Us
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
"बॅनर A-1, पण रस्ता स्पेस टेक्नॉलॉजीचा"; ठाकरेंचा भरत गोगावलेंन टोला
आदित्य ठाकरेंचा सवाल:
सुटे तेल बंदीवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
सुटे तेल बंदी: आठवडी बाजारांना फटका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना