AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sania Mirza : थरथरत होती सानिया, घटस्फोटानंतर पॅनिक अटॅक; शूटिंग सोडून पायजमा-चप्पलमध्ये मदतीसाठी धावली खास मैत्रीण !

सानिया मिर्झाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगांबद्दल, विशेषतः शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटानंतर एकटी आई म्हणून आलेल्या आव्हानांबद्दल, मनमोकळेपणाने सांगितले. मानसिक त्रासातून जात असताना फराहने तिला कशी साथ दिली, हेही तिने यावेळी नमूद केलं.

| Updated on: Aug 26, 2026 | 9:57 PM
Share
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने आपल्या शानदार कारकिर्दीत देशाचे नाव जगभरात उंचावलं. मात्र, तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही प्रसंग तितकेच वेदनादायक ठरले. त्याबद्दल ती बऱ्याच काळाने स्पष्टपणे बोलली. ( All Photos : Social Media)

1 / 8
2010 साली सानियाने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न केले. दोघांना एक मुलगाही आहे. मात्र, जवळपास 14 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर सानिया-शोएब हे दोघे विभक्त झाले.

2 / 8
 ‘Serving It Up with Sania’ या यूट्यूब शोमध्ये सानियाने फराह खानशी संवाद साधला होता, त्यावेळी  आयुष्यातील या कठीण काळाबद्दल ती मनमोकळेपणाने बोलली होती. यावेळी फराहने सानियाच्या संघर्षाचे कौतुक करत, एकटी आई म्हणून मुलाचा सांभाळ करणे किती आव्हानात्मक आहे, हे नमूद केलं.

3 / 8
सानियानेही तेव्हा हे मान्य केलं की, मातृत्व आणि करिअर यांच्यात समतोल साधणं सोपं नव्हतं. यावेळी तिने आपल्या आयुष्यातील एका अत्यंत कठीण प्रसंगाची आठवण सांगितली.

4 / 8
'एका शूटनंतर  मला थेट लाइव्ह शोसाठी जायचं होतं. मात्र त्या वेळी मानसिक अवस्था इतकी खालावली होती की मी अक्षरशः थरथरत होते. मात्र, त्याच वेळी फराह खान तिच्या मदतीला धावून आली' असं सांनियाने सांगितलं.

5 / 8
'त्या दिवशी  तू माझ्या सेटवर आली होतीस. त्यानंतर मला लाइव्ह शो करायचा होता. मी खूप घाबरले होते आणि थरथरत होते. तू आली नसतीस तर कदाचित मी तो शो करू शकले नसते. तू मला फक्त एवढंच सांगितलंस—काहीही झालं तरी तुला हा शो करायचाच आहे' अशी आठवण सानियाने फराहशी बोलताना सांगितली.

6 / 8
त्या प्रसगांबद्दल पुढे फराहने सांगितलं की, सानियाला पॅनिक अटॅक आला होता, ते पाहून मी प्रचंड घाबरले होते. त्या दिवशी माझ शूटिंग सुरू होतं, तरी मी ते सोडलं आणि अगदी साधा पायजमा आणि चप्पल  घातलेल्या, अशा अवस्थेतच मी सानियाकडे धाव घेतली. हा प्रसंग आठवताना फराह खानही खूप भावूक झाली होती.

7 / 8
 सानिया आणि फराहची दोघी जिवलग मैत्रिणी आहेत.  आयुष्यातील कठीण प्रसंग असो किंवा आनंदाचा क्षण, दोघीही एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्याचं वेळोवेळी दिसलं आहे.

8 / 8
Follow Us
ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील...
Rohit Pawar Tractor Morcha : ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील चर्चांना पुन्हा उधाण
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...