नोव्हेंबर महिन्यात या कंपनीने विकल्या तब्बल 1,64,439 कार, पाहा कोणती कंपनी

प्रत्येकाचे स्वत:ची कार असावी असे स्वप्न असते. भारतात सध्या चार चाकी वाहनांचे मार्केट तेजीत आहे. वाहनचालक वाहन घेताना आता वाहनचालकाच्या सुरक्षेला महत्व देत आहेत. तरीही स्वस्त आणि मस्त कार घेण्याकडेही ग्राहकांचा कल असतो. तर गेल्या नोव्हेंबर महिन्यात एका कार कंपनीच्या कारची विक्री छप्पर फाडके झाली आहे. पाहा कोणती ही कंपनी....

नोव्हेंबर महिन्यात या कंपनीने विकल्या तब्बल 1,64,439 कार, पाहा कोणती कंपनी
maruti suzuki indiaImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 5:27 PM

मुंबई | 1 डिसेंबर 2023 : आपल्या दारापुढे चारचाकी असावी असे मध्यमवर्गीयाचे स्वप्न असते. परंतू देशात सध्या कोणत्या कार कंपनीची चलती आहे. हे जाणून घेण्यात तुम्हाला अवश्य आवडेल. तर भारतातील सर्वाधिक मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडीयाची कार विक्री नोव्हेंबर 2023 मध्ये 3.39 टक्के वाढून 1,64,439 युनिटवर पोहचली आहे. गेल्यावर्षी याच महिन्यात हा आकडा 1,59,044 युनिट होता. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहीतीनूसार प्रवासी वाहने, व्यापारी वाहने आणि थर्ड पार्टी पुरवठ्यासह एकूण घरगुती विक्री गेल्या महिन्यात 1.57 टक्के वाढून 1,41,489 इतकी झाली आहे. गेल्यावर्षी याच काळात 1,39,306 इतकी होती.

घरगुती स्तरावरील प्रवासी वाहनांची ( पीव्ही ) एकूण विक्री 1.33 टक्के वाढून गेल्या महिन्यात 1,34,158 युनिट होती. तर नोव्हेंबर 2022 मध्ये हाच आकडा 1,32,395 युनिट होता. मारुती सुझुकीच्या आल्टो आणि एस-प्रेसो सहीत कमी किंमतीच्या कारची विक्री गेल्यावर्षी याच महिन्यात 18,251 युनिट होती. यंदा मात्र त्यात घट होऊन 9,959 युनिट इतकी कारची विक्री झाल्याची आकडेवारी सांगते.

बलेनो , सेलेरियो, डीझायर, इग्निस, स्विफ्ट, टूर एस आणि वॅगनआर सारख्या मॉडेलसहीत कॉम्पॅक्ट कारची विक्री नोव्हेंबर 2023 मध्ये 64,679 इतकी झाली आहे. गेल्यावर्षी याच महिन्यात 72,844 युनिक कार विकल्या गेल्या होत्या. तर ब्रेझा, एर्टीगा, फ्रोंक्स, ग्रॅंड व्हीटारा, इनविक्टो, जिम्नी, एस-क्रॉस आणि एक्सएल 6 सहित युटीलिटी वाहनांची विक्री गेल्या महिन्यात 49,016 युनिट होती. तर एक वर्षांपूर्वी याच महिन्यात हा आकडा 32,563 युनिट होता.

निर्यात वाढली

मिड साईज सेडान सियाजची विक्री गेल्या महिन्यात केवळ 278 युनिट्स झाली, गेल्या वर्षी याच महिन्यात 1,554 युनिट विक्री झाली. मारुती सुझुकी कंपनीने म्हटले आहे की गेल्या नोव्हेंबर महिन्यात कंपनीची निर्यात वाढून 22,950 युनिट झाली आहे.  गेल्यावर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये कंपनीची निर्यात  19,738 युनिट इतका होता.

Non Stop LIVE Update
'मनोज जरांगे हे बालबुद्धी, त्यांची अवस्था एक दिवस...,' - आशीष देशमुख
'मनोज जरांगे हे बालबुद्धी, त्यांची अवस्था एक दिवस...,' - आशीष देशमुख.
WITT : Not An ERA Of War विषयावर सखोल चर्चा, भारताची भूमिका काय?
WITT : Not An ERA Of War विषयावर सखोल चर्चा, भारताची भूमिका काय?.
... म्हणून चीनवर भडकले ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट
... म्हणून चीनवर भडकले ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट.
भारत हा आशियातील महासत्ता अन् महान देश, टोनी ॲबॉट भारतावर भरभरून बोलले
भारत हा आशियातील महासत्ता अन् महान देश, टोनी ॲबॉट भारतावर भरभरून बोलले.
WITT : मोदी हे सामान्य नेते नाहीत तर..टोनी ॲबॉट यांच्याकडून गौरवोद्गार
WITT : मोदी हे सामान्य नेते नाहीत तर..टोनी ॲबॉट यांच्याकडून गौरवोद्गार.
WITT : भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर... - बरुण दास
WITT : भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर... - बरुण दास.
व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समीटचा २रा दिवस, बॉलिवूडच्या दिग्गजांची हजेरी
व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समीटचा २रा दिवस, बॉलिवूडच्या दिग्गजांची हजेरी.
प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांचा 'नक्षत्र पुरस्कारानं' गौरव
प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांचा 'नक्षत्र पुरस्कारानं' गौरव.
WITT : पुष्पा सुपरस्टार अल्लू अर्जुनला नक्षत्र सन्मान; म्हणाला...
WITT : पुष्पा सुपरस्टार अल्लू अर्जुनला नक्षत्र सन्मान; म्हणाला....
अम्मा 'ॲनिमल' पाहू नको... खुशबू सुंदर यांच्या मुली असं का म्हणाल्या?
अम्मा 'ॲनिमल' पाहू नको... खुशबू सुंदर यांच्या मुली असं का म्हणाल्या?.