Car : मारुती सुझुकीचा ‘हा’ आहे फ्यूचर प्लॅनिंग… हायब्रिड कार निर्मिती ठरणार गेम चेंजर…

मारुती सुझुकी आणि टोयोटा मिळून एक मिड साइज एसयुव्ही बनवित आहेत. अपकमिंग मिड साइज एसयुव्हीमध्ये स्ट्राँग हायब्रिड टेक्नॉलॉजीचाही वापर करण्यात आला आहे. या महिन्या लाँच होत असलेल्या टोयोटा अर्बन क्रूजन हायराइडटर एसयुव्हीमधये हायब्रिड इंजिन दिसू शकते.

Car : मारुती सुझुकीचा ‘हा’ आहे फ्यूचर प्लॅनिंग... हायब्रिड कार निर्मिती ठरणार गेम चेंजर...
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 12:43 PM

मुंबई : भारतीय कार बाजारात गेल्या काही वर्षांमध्ये अमुलाग्र बदल बघायला मिळत आहे. दरवर्षी या मार्केटमधील ट्रेंड बदलत आहे. यात, देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आता फ्यूचर प्लॅनिंगमध्ये लागली आहे. इलेक्ट्रिक कार्सची (electric cars) वाढती मागणी पाहता, कंपनी आता पूर्णपणे इलेक्ट्रिक कार बनविण्यामध्ये लक्ष केंद्रीत करीत असल्याचे दिसत आहे. इतरही कंपन्यांनी विविध सेगमेंटची चाचपणी करायला सुरुवात केलेली आहे. मारुती सुझुकी, टोयोटा (Toyota) आणि होंडा सारख्या जपानी ऑटोमोबाईल कंपन्या पूर्णपणे इलेक्ट्रिक कार बनविण्याच्या ऐवजी हायब्रिड कारवर काम करीत आहेत. रिपोर्टनुसार, मारुती सुझुकी पुढील पाच ते सात वर्षांपर्यंत स्ट्राँग हायब्रिड लाइनअपवर काम करणार आहे. मारुती सुझुकीची नेमकी काय स्ट्रॅटेजी आहे, याची माहिती या लेखातून घेणार आहोत.

मारुतीने आणली हायब्रिड कार

मारुती सुझुकीने नवीन 1.5L K15C फोर सिलेंडर माइल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिनने सुसज्ज अर्टिगा आणि एक्सएल6 चे फेसलिफ्ट व्हर्जन बाजारात आणले आहे. या पावरट्रेनचा वापर नुकतेच लाँच करण्यात आलेल्या ब्रेझाच्या नवीन मॉडेलमध्येही करण्यात आला आहे. ब्रेझाच्या लाँच होण्याआधीच तब्बल 45 हजार बुकिंग झाल्या होत्या.

नवीन एसयुव्हीमध्ये मिळेल स्ट्राँग हायब्रिड इंजिन

मारुती सुझुकी आणि टोयोटा मिळून एक मिड साइज एसयुव्ही बनवित आहेत. अपकमिंग मिड साइज एसयुव्हीमध्ये स्ट्राँग हायब्रिड टेक्नॉलॉजीचाही वापर करण्यात आला आहे. या महिन्या लाँच होत असलेल्या टोयोटा अर्बन क्रूजन हायराइडटर एसयुव्हीमधये हायब्रिड इंजिन दिसू शकते. त्यानंतर मारुतीची अपकमिंग एसयुव्हीदेखील स्ट्राँग हायब्रिड इंजिनसह बाजारात येण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

Bio-CNG आणि इथेनॉलचीही चाचपणी

मारुती सुझुकी माइल्ड हायब्रिड, स्ट्रांग हायब्रिड, बायो सीएनजी आणि इथेनॉल फ्यूअल सारख्या विभिन्न सेगमेंटचीही चाचपणी करीत आहे. मारुती सुझुकीचे चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर सीवी रमन यांच्या मते, फ्यूअल इंजिनच्या तुलनेत हायब्रिउ टेक्नोलोजी 30 टक़्के कमी कार्बनचे उत्सर्जन करतात. सीएनजीच्या माध्यमातून कार्बन उत्सर्जनमध्ये 20 टक्के कमी येते.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.