Kia च्या MPV ला भारतीय ग्राहकांची पसंती, दोन महिन्यात रेकॉर्डब्रेक विक्री

नवीन किया केरेन्स (Kia Carens) 15 फेब्रुवारी 2022 रोजी भारतात लाँच करण्यात आली होती. किया (Kia) कंपनीने या एमपीव्ही (MPV - Multi-Purpose Vehicle) च्या आकर्षक किंमतीसह ग्राहकांना आश्चर्यचकित केले आहे. कार निर्मात्या कंपनीने 14 जानेवारी 2022 रोजी MPV साठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली होती.

Kia च्या MPV ला भारतीय ग्राहकांची पसंती, दोन महिन्यात रेकॉर्डब्रेक विक्री
Kia CarensImage Credit source: Kia.Com/In
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 6:23 PM

मुंबई : नवीन किया केरेन्स (Kia Carens) 15 फेब्रुवारी 2022 रोजी भारतात लाँच करण्यात आली होती. किया (Kia) कंपनीने या एमपीव्ही (MPV – Multi-Purpose Vehicle) च्या आकर्षक किंमतीसह ग्राहकांना आश्चर्यचकित केले आहे. कार निर्मात्या कंपनीने 14 जानेवारी 2022 रोजी MPV साठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून त्यांनी या वाहनासाठी 50,000 हून अधिक बुकिंग्स मिळवल्या आहेत. आता त्यांनी देशातील सर्वात वेगाने वाढणारी कार निर्माता कंपनी म्हणून आपले स्थान निश्चित केले आहे. जागतिक स्तरावर सेमीकंडक्टरचा (Semiconductor) तुटवडा असल्याने वाहन निर्मिती धिम्या गतीने सुरु आहे. असे असूनही, किआने ही कार लाँच केल्यापासून केवळ 13 दिवसांतच फेब्रुवारी महिन्यात 5,300 युनिट्सची विक्री केली आहे. या 50,000 बुकिंगपैकी जवळपास 60 टक्के वाहनं टियर 1 आणि टियर 2 शहरांमधील आहेत.

कंपनीच्या या यशाबद्दल बोलताना किआ इंडियाचे मुख्य विक्री अधिकारी मायुंग-सिक सोहन म्हणाले, “केरेन्सला मिळालेल्या या प्रतिसादामुळे फॅमिली मूव्हर सेगमेंटमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. आमच्या या दुसऱ्याच SUV ला मिळत असलेला हा प्रतिसाद आश्चर्यकारक आहे. भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योग एका कठीण टप्प्यातून जात आहे कारण आम्हाला सेमीकंडक्टरच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे आमच्या उत्पादनात अडथळा येत आहे आणि त्यामुळे बाजारपेठेत पुरवठा खंडित होत आहे.”

किया मोटर्सने लॉन्च केलेली चौथी एमपीव्ही कार

याआधी किया कंपनीने किया सेल्टॉस, सॉनेट, कॉर्निव्हल असे वेगवगळे मॉडल लॉन्च केलेले आहेत. करेन्स ही किया मोटर्सने लॉन्च केलेली चौथी एमपीव्ही कार आहे. या कारची तुलना मारुती सुझुकी एक्सएल 6 (Maruti Suzuki XL6), महिंद्रा मार्झो (Mahindra Marazzo), टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (Toyota Innova Crysta) आणि ह्युंदाई अल्काझर (Hyundai Alcazar) या कारशी करता येईल.

कार वेगवेगळ्या रंगात उपलब्ध

Kia Carens ही कार भारतात एकूण आठ रंगामध्ये उपलब्ध केली जाईल. यामध्ये इम्पीरियल ब्लू, मॉस ब्राउन, स्पार्कलिंग सिल्व्हर, इंटेन्स रेड, अरोरा ब्लॅक पर्ल, ग्रॅव्हिटी ग्रे, ग्लेशियर व्हाइट पर्ल आणि क्लियर व्हाइट अशा रंगांचा समावेश असेल. या कारची डिझाईन भारतात उपलब्ध असलेल्या एमपीव्ही कारपेक्षा वेगळी असेल.

किया करेन्सचे फिचर्स काय आहेत?

किया करेन्स या कारला कार प्ले अँड्रॉईड ऑटो आणि कियाच्या UVO कनेक्टीव्हीटीसोबत 10.25 इंची टच स्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळेल. या पूर्ण सिस्टिमध्ये 64-कलर अॅम्बिएंट लाईट असलेले आठ स्पिकर्सचे साऊंड सिस्टिम मिळेल. सिट्संदर्भात बोलायचे झाले तर व्हेंटिलेटेड फ्रन्ट सिट्स, तसेच कप होल्डर्स असलेले सीट बॅक टेबलसुद्धा या कारमध्ये दिले जाईल. मागेच्या ओळीतील सिट्ससाठी इलेक्ट्रिकली पावर्ड वन-टच टम्बल डाउन फीचर असेल. तसेच सिंगल-पॅन सनरूफदेखील या कारमध्ये देण्यात आलेले आहे.

कारमध्ये सहा एअरबॅग्स

सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही या कारमध्ये खबदारी घेण्यात आलेली आहे. या कारमध्ये सहा एअरबॅग्स असणार आहेत. तसेच ABS आणि ESC, हिल-स्टार्ट असिस्ट फीचर यांचा समावेश आहे. कारच्या चारही चाकांना डिस्क ब्रेकची सुविधा देण्यात आलेली आहे. तसेच रेअर पार्किंग सेन्सरदेखील देण्यात आले आहे.

इतर बातम्या

ही SUV घेतल्यावर ‘मला आमदार झाल्यासारखं’ वाटतंय, 5 राज्यांच्या निवडणुकीनंतर एसयूव्हींची विक्री वाढणार

BMW कारच्या इंजिनमध्ये आग लागण्याचा धोका, कंपनीने 10 लाख गाड्या परत मागवल्या

होळीनिमित्त Mahindra ची शानदार ऑफर, लोकप्रिय गाड्यांवर 2.5 लाखांपर्यंत डिस्काऊंट, पाहा संपूर्ण यादी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.