CAR LOAN: स्वप्न ड्रीम कारचं; जाणून घ्या- विविध बँकांचे सर्वोत्तम कार लोनचे पर्याय

तुम्ही तुमचं ड्रीम कारचं स्वप्न प्रत्यक्षात आणू इच्छित असल्यास विविध बँकांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. आकर्षक व्याजदरांत बँकांचे कार लोनचे पर्याय तुमच्यासाठी खुले आहेत.

CAR LOAN: स्वप्न ड्रीम कारचं; जाणून घ्या- विविध बँकांचे सर्वोत्तम कार लोनचे पर्याय
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 1:19 PM

नवी दिल्ली: प्रत्येकाच्या मनात ड्रीम कारचं (Dream Car) स्वप्न असतं. सध्या मार्केटमध्ये विविध व्हेरियंटच्या कार उपलब्ध आहेत. कार खरेदीसाठी ग्राहकांसमोर एकाधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र, पुरेशा आर्थिक तरतुदी अभावी अनेकांचे कार खरेदीचे (Car Purchasing) स्वप्न लांबणीवर पडते. त्यामुळे आपल्या ड्रीम कारच्या स्वप्नांवर देखील पाणी फेरण्याची वेळ येऊन ठेपते. तुम्ही तुमचं ड्रीम कारचं स्वप्न प्रत्यक्षात आणू इच्छित असल्यास विविध बँकांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. आकर्षक व्याजदरांत बँकांचे कार लोनचे पर्याय तुमच्यासाठी खुले आहेत. प्रक्रिया शुल्क, मासिक ईएमआय (Monthly EMI) यासर्व पर्यायांचा विचार करुन तुम्हाला निश्चितच कार लोनची निवड करावी लागेल.

भारतीय स्टेट बँक

एक लाख रुपयांच्या पाच वर्ष अवधीच्या लोन रकमेसाठी भारतीय स्टेट बँकेचे 7.25 टक्के ते 8.15 टक्के व्याजदराने कर्जाचे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला मासिक ईएमआई 1992 ते 2035 रुपयांच्या दरम्यान भरावा लागेल. आतापर्यंतच्या अपडेटनुसार स्टेट बँकेकडून कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया

एक लाख रुपयांच्या पाच वर्ष अवधीच्या लोन रकमेसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank Of India) 7.25 ते 7.70 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करते. तुम्हाला 1,992 से 2,013 रुपयांदरम्यान ईएमआय अदा करावा लागेल. सेंट्रल बँक प्रक्रिया शुल्क 0.50 टक्क्यांपर्यंत आकारते. (किमान 2,000- कमाल 20,000 रुपये)

पंजाब नॅशनल बँक

एक लाख रुपयांच्या पाच वर्ष अवधीच्या लोन रकमेसाठी पंजाब नॅशनल बँक (Central Bank Of India) 7.65 ते 9.05 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करते. लोन रकमेच्या 0.25 टक्के (किमान 1,000 रुपये आणि कमाल 1500 रुपये) प्रक्रिया शुल्क स्वरुपात आकारणी केली जाते. मासिक ईएमआय 2011 से 2078 रुपयांच्या दरम्यान असेल.

बँक ऑफ महाराष्ट्र

एक लाख रुपयांच्या पाच वर्ष अवधीच्या लोन रकमेसाठी महाराष्ट्र बँक (Central Bank Of India) 7.70 ते 10.20 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करते. मासिक ईएमआय 2013 से 2135 रुपयांच्या दरम्यान असेल. बँकेच्या वेबसाईटवर कोणत्याही प्रकारच्या प्रक्रिया शुल्काबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.