Renault कडून सर्व गाड्यांवर 80,000 रुपयांची सूट, KWID च्या बेस मॉडेलमध्ये नवं सेफ्टी फीचर

भारतातील रेनॉच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांपैकी एक असलेली रेनॉ क्विड (Renault Kwid) ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन आली आहे. Kwid 2021 मध्ये अनेक अपडेट्स आणि ऑफर्स देण्यात आले आहेत.

Renault कडून सर्व गाड्यांवर 80,000 रुपयांची सूट, KWID च्या बेस मॉडेलमध्ये  नवं सेफ्टी फीचर

मुंबई : भारतातील रेनॉच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांपैकी एक असलेली रेनॉ क्विड (Renault Kwid) ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन आली आहे. Kwid 2021 मध्ये अनेक अपडेट्स आणि ऑफर्स देण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं अपडेट म्हणजे क्विडच्या बेस व्हेरिएंटमध्येही आता ग्राहकांना दोन एअरबॅग्स मिळणार आहेत. पूर्वी या व्हेरिएंटमध्ये केवळ एक ड्रायव्हर साइड एअरबॅग उपलब्ध होती. (Kwid will get airbag feature in base model too, renault offering benefits upto 80000 Rs)

भारतातील विद्यमान सुरक्षा नियम लक्षात घेऊन कंपनीने हे फीचर त्यांच्या बेस व्हेरिएंटमध्ये जोडले आहे. बेस व्हेरियंटमध्ये एअरबॅग समाविष्ट करण्यात आली आहे, सोबतच कंपनी या कारवर आणखी ऑफर देत आहे. रेनॉ भारतात 10 व्या वर्धापन दिनानिमित्त क्विडसह सर्व वाहनांवर 80,000 रुपयांपर्यंत बचत ऑफर्स देत आहे.

या ऑफर्स सप्टेंबर 2021 पर्यंत वैध असतील. याशिवाय, रेनॉने 10 अनोखे रॉयल्टी रिवॉर्ड्स देखील जाहीर केले आहेत, ज्यात 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंतचे लॉयल्टी बेनिफिट्स मिळू शकतात. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा येथील ग्राहक 1-10 सप्टेंबर 2021 दरम्यान गणेश चतुर्थीच्या निमित्ताने विशेष ऑफर घेऊ शकतात.

कशी आहे रेनॉ क्विड

रेनॉ क्विड बीएस 6 ही एक एंट्री लेव्हल हॅचबॅक कार आहे. क्विडच्या सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये 1.0 लीटरचे पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 68 पीएसचे पॉवर आणि 91 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं. इंजिन 5 स्पीड AMT (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) गियरबॉक्ससह देण्यात आले आहे. Renault Kwid BS6 या कारची सुरुवातीची किंमत 3.12 लाख रुपये (एक्स शोरुम) इतकी आहे. सेफ्टीसाठी क्विड RXL AMT व्हेरियंटमध्ये ड्रायव्हर एयरबॅग, रियर पार्किंग सेन्सर्स, एबीएस, ईबीडी, सीट बेल्ट रिमाइंडर, ओवरस्पीड अलर्ट, रियर डोर चाइल्ड लॉक, हाई माउंटेड स्टॉप लॅम्प आणि सेंट्रल लॉकिंग सोबत रिमोट कीलेस एंट्री यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

रेनॉच्या क्विड RXL ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये फुल व्हील कवर, इन्टर्नली अॅडजस्टेबल ORVM, एसी, इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंग आणि फ्रंट पॉवर विंडो मिळणार आहे. तसेच यात 12V फ्रंट पॉवर सॉकेट, रेडियो आणि एमपी3 सोबत सिंगल डिन स्टीरियो, हँड्स-फ्री टेलिफोन आणि ऑडियो स्ट्रीमिंग साठी ब्लूटूथ, थिएटर डिमिंगसोबत केबिन लाइट, ट्रॅफिक असिस्टन्स मोड आणि फ्रंट स्पीकर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. सेफ्टीसाठी क्विड RXL AMT व्हेरियंटमध्ये ड्रायव्हर एयरबॅग, रियर पार्किंग सेन्सर्स, एबीएस, ईबीडी, सीट बेल्ट रिमाइंडर, ओवरस्पीड अलर्ट, रियर डोर चाइल्ड लॉक, हाई माउंटेड स्टॉप लॅम्प आणि सेंट्रल लॉकिंग सोबत रिमोट कीलेस एंट्री यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

इतर बातम्या

Maruti च्या गाड्यांमध्ये दोष, तब्बल 1.81 लाख वाहने परत मागवली

Nissan Magnite चा भारतीय बाजारात धुमाकूळ, 60,000 बुकिंग्सचा टप्पा पार

Tata Motors चा बाजारात धुमाकूळ, ऑगस्टमधील वाहनांच्या विक्रीत 53 टक्क्यांची वाढ

(Kwid will get airbag feature in base model too, renault offering benefits upto 80000 Rs)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI