AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wagon R पेक्षा ही कार स्वस्त, किंमत, फीचर्स जाणून घ्या

सिट्रोएन इंडियाने GST कपातीचे स्वागत करत आपल्या कारच्या किंमती कमी केल्या आहेत. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

Wagon R पेक्षा ही कार स्वस्त, किंमत, फीचर्स जाणून घ्या
Wagon RImage Credit source: tv9 bharatvarsh
| Edited By: Sanjay patil | Updated on: Sep 12, 2025 | 1:59 AM
Share

तुम्हाला नवी कार खरेदी करायची असेल तर ही बातमी नक्की वाचा. सिट्रोएन इंडिया कंपनीने 2.70 लाख रुपयांपर्यंत कमी केले आहे. आता यामुळे सिट्रोएन कारची किंमत आता 4.80 लाख रुपयांपासून सुरू होत आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

GST कमी झाल्याने वाहनांचे दरही कमी होत आहेत. टाटा, महिंद्रा, रेनॉल्टसह अनेक कंपन्यांनी GST कपातीनंतर आपल्या वाहनांच्या किंमती कमी केल्या आहेत. कंपन्या आपली नवी रेट लिस्ट जारी करत आहेत, ज्यामध्ये कारच्या किंमती कमी झाल्याची आणि नव्या किंमतींची माहिती दिली जात आहे.

आता परदेशी कंपनी सिट्रोएननेही भारतात आपल्या वाहनांच्या किंमती कमी केल्या आहेत. सिट्रोएनच्या कारची किंमत आता 4.80 लाख रुपये आहे. किंमतीत कपात झाल्यानंतर या कंपनीच्या एसयूव्हीसारखी दिसणारी हॅचबॅक कार आता वॅगन आरपेक्षा स्वस्त झाली आहे.

भारत सरकारने GST मध्ये नुकत्याच केलेल्या बदलांमुळे सिट्रोएन इंडियाने आपल्या सर्व वाहनांच्या किंमतीत 2.70 लाख रुपयांपर्यंत कपात केली आहे. सरकारने नवीन GST स्लॅबला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत 1200 सीसी पेट्रोल आणि 1500 सीसी डिझेल आणि 4 मीटरपेक्षा लहान कारवर आता 18 टक्के शुल्क आकारले जाईल. यापूर्वी त्यांच्यावर 28 टक्के GST आकारला जात होता. तसेच 1500 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या गाड्या आणि 4 मीटरपेक्षा जास्त लांबीच्या वाहनांवर आता 40 टक्के GST आकारला जाईल. यापूर्वी या वाहनांवर GST आणि उपकरासह सुमारे 50 टक्के कर आकारला जात होता. Citroen कार स्वस्त

कंपनीचा दावा आहे की, त्यांनी GST कपातीचा पूर्ण फायदा ग्राहकांना दिला आहे, ज्यामुळे सर्व सिट्रोएन कार खूप स्वस्त झाल्या आहेत. या नवीन किंमती 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होतील. सध्या, Citroen भारतात C3, C3X, Aircross SUV, Basalt, Basalt, Basalt X आणि C5 Aircross SUV यासह सहा पेट्रोल आणि डिझेल मॉडेल्सची विक्री करते.

वेगवेगळ्या मॉडेल्सवर सवलत

Citroën C3 आणि C3X – या एंट्री-लेव्हल हॅचबॅक कारवर व्हेरिएंटनुसार 84,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. GST दरातील बदलानंतर, Citroën C3 ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत आता 4.80 लाख रुपये असेल.

Citroen Aircross SUV – या एसयूव्हीच्या 5-सीटर आणि 7-सीटर दोन्ही मॉडेल्समध्ये 50,000 रुपयांपर्यंत बचत होईल.

Citroen Basalt आणि Basalt X – ही दोन्ही मॉडेल्स नुकतीच लाँच करण्यात आली आहेत. त्यांची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.95 लाख रुपये आहे.

Citroen C5 Aircross SUV – फ्लॅगशिप C5 एअरक्रॉस SUV ला GST कपातीचा सर्वाधिक फायदा झाला आहे, ज्याच्या किंमतीत 2.70 लाख रुपयांची मोठी घट झाली आहे. आता या SUV चे शाइन व्हेरिएंट 37.32 लाख रुपयांना (एक्स-शोरूम) उपलब्ध असेल.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?