AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahindra Upcoming EV: महिंद्राची ईव्ही लाँचिंगसाठी सज्ज, डिझाईन लीक

Mahindra Upcoming EV 2022: महिंद्रा बॉर्न इलेक्ट्रिक (Mahindra Born Electric) या वर्षाच्या जुलै 2022 मध्ये आपल्या तीन नवीन ईव्ही (Electric Vehicle) कार लॉन्च करणार आहे.

Mahindra Upcoming EV: महिंद्राची ईव्ही लाँचिंगसाठी सज्ज, डिझाईन लीक
Mahindra Electric VehicleImage Credit source: Auto.mahindra.com/
| Updated on: Apr 05, 2022 | 3:52 PM
Share

Mahindra Upcoming EV 2022: महिंद्रा बॉर्न इलेक्ट्रिक (Mahindra Born Electric) या वर्षाच्या जुलै 2022 मध्ये आपल्या तीन नवीन ईव्ही (Electric Vehicle) कार लॉन्च करणार आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्ही कूपचे रेंडर्स समोर आले आहेत, ज्यामध्ये कारचं डिझाइन, लाईट्स आणि व्हील्स दाखवण्यात आले आहेत. लीक झालेल्या फोटोमध्ये एसआरके डिझाईन्स (SRK Designs) दाखवले आहेत. ही एक कूप स्टाईल कार असेल. मात्र, आतापर्यंत कंपनीने या कारच्या डिझाइनबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. महिंद्रा अँड महिंद्राने बॉर्न इलेक्ट्रिक व्हिजन रेंजबद्दल (Born Electric Vision Range) यापूर्वीच माहिती शेअर केली आहे.

महिंद्रा आगामी काळात इलेक्ट्रिक कारअंतर्गत मध्यम आकाराची SUV, एक SUV कूप आणि कॉम्पॅक्ट SUV कार सादर करणार आहे. कंपनीने असा निर्णय घेतला आहे कारण गेल्या काही महिन्यांत एसयूव्ही कारला भारतीय बाजारात खूप पसंती मिळत आहे. बॉर्न इलेक्ट्रिक व्हेइकल युनायटेड किंगडमच्या डिझायनर्सच्या सहकार्याने या आगामी कारचे डिझाइन तयार करत आहे. महिंद्रा बॉर्न इलेक्ट्रिक SUV कूप कारबद्दल माहिती आधीच समोर आली होती. या कारचे वर्णन पूर्वी महिंद्रा XUV 900 असे केले गेले आहे आणि या कारचे वर्णन आगामी EV कार म्हणून केले गेले आहे.

कंपनीचा डेडीकेटेड प्लॅटफॉर्म तयार

महिंद्राने त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक कारसाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार केला आहे आणि त्यावरच या आगामी EV कारचे स्केच आहे. याशिवाय, एक डिजिटल इमेज देखील समोर आली आहे, ज्यामध्ये ती कारच्या केबिनच्या आतून कशी आहे हे दाखवण्यात आलं आहे. यामध्ये ड्रायव्हरच्या बाजूची सीट दिसत आहे, ज्यामध्ये स्टिअरिंग पाहता येईल.

महिंद्राच्या आगामी ईव्हीचे फीचर्स

लीक्सवर विश्वास ठेवला तर त्यात आकर्षक बोनेट, कूप रूफलाइन आणि नवीन डिझाइन केलेली चाके मिळतील. तसेच, कंपनी त्यात इंग्रजी शब्द C-shaped headlamps वापरण्यात आले आहेत. हे एक प्रकारे कंपनीचे सिग्नेचर लाईट्स असतील. लीक्स रिपोर्टनुसार, या कारला ट्विट स्क्रीन सेटअप मिळेल, जो XUV700 सारखा असू शकतो. यामध्ये रॅपराऊंड कॉकपिट डिझाइन देखील दिले जाऊ शकते. यात पॅनोरमिक सनरूफही मिळेल.

इतर बातम्या

150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम

क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.