Mahindra XUV700 ची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 24 तासांत 4000 किमी अंतर पार

महिंद्रा XUV700 (Mahindra XUV700) ने चेन्नईजवळ कार निर्मात्याच्या नवीन SUV प्रोव्हिंग ट्रॅक (MSPT) मध्ये 24 तासांच्या स्पीड एन्ड्युरन्स चॅलेंजमध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे.

Mahindra XUV700 ची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 24 तासांत 4000 किमी अंतर पार
Mahindra Xuv700
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 5:40 PM

मुंबई : महिंद्रा XUV700 (Mahindra XUV700) ने चेन्नईजवळ कार निर्मात्याच्या नवीन SUV प्रोव्हिंग ट्रॅक (MSPT) मध्ये 24 तासांच्या स्पीड एन्ड्युरन्स चॅलेंजमध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. चार XUV700 SUVs ज्यांनी चॅलेंजमध्ये भाग घेतला, त्यांनी प्रत्येक इव्हेंटमध्ये 4000 किमीचा प्रवास केला. या व्यवस्थेतील मागील विक्रम 2016 मध्ये 3161 किमीचा होता. (Mahindra XUV700 sets new record, clocks over 4000 km in 24 hrs speed challenge)

चार XUV700s पैकी, डिझेल मॅन्युअल व्हेरिएंटने 4384.73 किमी, डिझेल ऑटोमॅटिक व्हेरिएंटने 4256.12 किमी, पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटने 4232.01 किमी, पेट्रोल ऑटोमॅटिक 4155.65 व्हेरिएंटने किमी अंतरासह शर्यतीचे नेतृत्व केले. राष्ट्रीय विक्रमाव्यतिरिक्त, XUV700 SUV ने MSPT मध्ये या चॅलेंजदरम्यान 80 अतिरिक्त रेकॉर्ड देखील मोडले आहेत, जेथे वाहने 170-180 किमी/ता या सरासरी वेग मर्यादेवर चालत असताच. कडक नियम आणि फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली हे चॅलेंज पूर्ण करण्यात आले.

या कारची किंमत 19.79 लाख रुपये आहे. महिंद्रा 1.8 लाख रुपयांच्या अतिरिक्त पेमेंटवर AX7 ऑटोमॅटिकसह लक्झरी पॅक ऑफर करेल. AX7 डिझेल ऑटोमॅटिकसह AWD व्हेरिएंट देखील उपलब्ध आहे. त्याची किंमत 1.3 लाख रुपये अधिक असेल.

फीचर्स

XUV700 चे आतील लेआउट उत्तम आहे, सॉफ्ट-टच मटेरियल आणि क्रोम अॅक्सेंटचा वापर केबिनला आणखी उत्कृष्ट बनवतो. मध्यभागी 10.25 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध आहे. XUV700 मध्ये सोनी 3D साउंड सिस्टीम, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, केबिन एअर फिल्टर, अॅम्बियंट लायटिंग, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक एसी, पॉवर्ड फ्रंट सीट, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल आणि पॅनारोमिक सनरूफ सारखे फीचर्स यात आहेत.

एसयूव्ही कनेक्टेड कार टेक्नोलॉजी आणि अमेझॉन अलेक्सा कॉम्पॅटिबिलिटीसाठी अॅड्रेनॉक्स सूट सादर करते. जे व्हॉईस कमांड वापरून सनरूफ ऑपरेट करू शकते. XUV700 चार ड्रायव्हिंग मोडसह येते, ज्यात Zip, Zap, Zoom आणि Custom मोड्सचा समावेश आहे. XUV700 चे एक स्मार्ट वैशिष्ट्य म्हणजे एंट्रीसाठी पुढील सीट आपोआप मागे घेतली जाते.

सेफ्टी फीचर्स

XUV700 मध्ये फ्रंट आणि साइड एअरबॅग्स, ABS, EBD, हिल-होल्ड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, रिव्हर्सिंग कॅमेरा, 360 डिग्री साराऊंड व्ह्यू इत्यादी सेफ्टी फीचर्स मिळतात. यासह, एसयूव्हीला ऑटो-बूस्टर हेडलॅम्प (जे ऑटोमॅटिक रुपात हेडलॅम्प्स थ्रो आणि इंटेन्सिटी वाढवतात.), ड्रायव्हर स्लीप डिटेक्शन, पर्सनल सिक्योरिटी अलर्ट सारख्या अनेक सेगमेंट-फर्स्ट सेफ्टी फीचर्स देखील यात देण्यात आले आहेत.

इंजिन

XUV700 टर्बो पेट्रोल इंजिन आणि डिझेल पॉवरप्लांटच्या निवडीसह उपलब्ध आहे. पेट्रोल युनिट 2.0 लीटर mStallion युनिट आहे, जे नवीन थार मध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 198 bhp पॉवर आणि 380 Nm टॉर्क जनरेट करते. डिझेल इंजिन mHawk इंजिन आहे जे 182 बीएचपी पॉवर आणि 450 एनएम टॉर्क जनरेट करते. ही दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह उपलब्ध आहेत. XUV700 मध्ये 4X4 पॉवरट्रेनचा पर्याय देखील आहे.

इतर बातम्या

डुकाटीची शानदार सुपरस्पोर्ट 950 मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात लाँच, 21000 रुपये देऊन बुक करा शानदार मायक्रो एसयूव्ही

MG Astor लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स

(Mahindra XUV700 sets new record, clocks over 4000 km in 24 hrs speed challenge)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.