Maruti आणि Toyota ची पहिली एसयूव्ही भारतात लाँचिंगसाठी सज्ज, लूक आणि डिझाईन लीक

मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि टोयोटा (Toyota) या दोन कंपन्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर एकत्रितपणे काम करत आहेत. आगामी मॉडेल पहिल्यांदाच भारतात टेस्टिंगदरम्यान पाहायला मिळाले आहे.

Maruti आणि Toyota ची पहिली एसयूव्ही भारतात लाँचिंगसाठी सज्ज, लूक आणि डिझाईन लीक
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: File
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 5:08 PM

मुंबई : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि टोयोटा (Toyota) या दोन कंपन्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर एकत्रितपणे काम करत आहेत. आगामी मॉडेल पहिल्यांदाच भारतात टेस्टिंगदरम्यान पाहायला मिळाले आहे. असे मानले जात आहे की नवीन लॉन्च जायंट डेव्हलप कॉम्पॅक्ट एसयूव्ही (Compact SUV) ह्युंडई क्रेटा, किया सेल्टॉस, स्कोडा कुशाक आणि फोक्सवॅगन टायगुनशी स्पर्धा करेल. नवीन एसयूव्ही तांत्रिक आणि अनेक दमदार सेफ्टी फीचर्ससह सुसज्ज असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मारुती सुझुकी आणि टोयोटा या दोन्ही कंपन्यांची या खास SUV साठी वेगवेगळी सांकेतिक नावे आहेत. मारुतीने याला YFG आणि टोयोटाने D22 असे कोडनेम दिले आहे. लुकनुसार, दोन्ही SUV च्या बंपरमध्ये मेन हेडलॅम्पसह स्प्लिट हेडलॅम्प युनिट आणि ट्रेडिशनल हेडलाइट्सच्या जागी एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स असतील.

कारवरील DRL डिझाईन एकमेकांपेक्षा वेगवेगळं असू शकतं. त्यापैकी पहिल्या कारमध्ये ड्युअल-स्ट्रीप्ड LED डेटाइम रनिंग लॅम्प मिळतील तर दुसऱ्या टोयोटाच्या कारमध्ये RAV4 आधारित A-Cross SUV वर दिसलेल्या लॅम्पसारखे दिवे मिळतील. जे आंतरराष्ट्रीय बाजारात विकले जातात. SUV चे सिल्हूट देखील Toyota च्या RAV4 क्रॉसओवर SUV सारखे आहे. SUV ला स्क्वेअर ऑफ व्हील आर्च, चंकी टायर आणि हाय ग्राउंड क्लीयरन्स मिळेल, जो 200 मिमी पेक्षा जास्त असू शकतो. दोन्ही एसयूव्ही कर्नाटकमधील टोयोटाच्या प्लांटमध्ये तयार केल्या जातील.

नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीची खासियत

कारचे डिझेल पॉवरट्रेनचे डिटेल्स देखील समोर येतील. कार टोयोटा कॅमरी सारख्या पर्यायी फुल फ्लेज्ड हायब्रिड सिस्टमसह सुसज्ज असल्याचे मानले जात आहे, जे एसयूव्हीला तिच्या फ्यूल इकोनॉमीच्या दृष्टीने खूप मदत करेल. हायब्रीड तंत्रज्ञानामुळे एसयूव्हीला कमी वेगाने कमी अंतरासाठी केवळ इलेक्ट्रिक मोडवर चालवता येईल, जे शहरातील स्टॉप-स्टार्ट ट्राफिक कंडीशन्समध्ये काम करेल आणि इलेक्ट्रिक असिस्ट इंजिनचे पॉवर आउटपुट वाढवेल. दोन्ही SUV या वर्षाच्या शेवटी, बहुधा दिवाळीच्या (सणासुदीच्या) आधी लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

इतर बातम्या

ही SUV घेतल्यावर ‘मला आमदार झाल्यासारखं’ वाटतंय, 5 राज्यांच्या निवडणुकीनंतर एसयूव्हींची विक्री वाढणार

BMW कारच्या इंजिनमध्ये आग लागण्याचा धोका, कंपनीने 10 लाख गाड्या परत मागवल्या

होळीनिमित्त Mahindra ची शानदार ऑफर, लोकप्रिय गाड्यांवर 2.5 लाखांपर्यंत डिस्काऊंट, पाहा संपूर्ण यादी

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.