Maruti च्या मिड साईज सेडानचा बाजारात बोलबाला, 3 लाख युनिट्ची विक्री

मारुती सुझुकीची प्रीमियम सेडान सियाझने (Ciaz) विक्रीचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कंपनीने पुष्टी केली आहे की, आतापर्यंत सियाझच्या 300,000 युनिट्सची विक्री झाली आहे.

Maruti च्या मिड साईज सेडानचा बाजारात बोलबाला, 3 लाख युनिट्ची विक्री
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 3:44 PM

मुंबई : मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) प्रीमियम सेडान सियाझने (Ciaz) आज विक्रीचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीने याची पुष्टी केली आहे की, सियाझ आतापर्यंत 300,000 ग्राहकांना विकली गेली आहे, ज्यामुळे एकिकडे भारतातील सेडानची विक्री कमी होत असताना ही मिड-साइज सेडान तिच्या सेगमेंटमध्ये यशस्वी ठरली आहे. (Maruti Suzuki Ciaz touches milestone of over 3 lakh units sale)

सियाझ 2014 मध्ये भारतात लाँच करण्यात आली. BS6 कंप्लायंट सियाजची किंमत 8.60 लाख रुपयांपासून सुरू होते आणि अल्फा 1.5 लीटर पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरिएंटसाठी 11.59 लाख रुपयांपर्यंत जाते. मिड रेंज सेडान सेगमेंटमध्ये, Ciaz ची Honda City आणि Hyundai Verna सोबत जोरदार स्पर्धा आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे ​​वरिष्ठ कार्यकारी संचालक (विपणन आणि विक्री) शशांक श्रीवास्तव म्हणाले की, “3 लाख युनिट्स विक्रीचा टप्पा ग्राहकांचा ब्रँडवरील विश्वास सिद्ध करतो.”

फीचर्स

नवीन जनरेशन मारुती सियाझला 2018 मध्ये फेसलिफ्ट मिळाले होते, त्याला आकर्षक फ्रंट ग्रिल, स्लीक बंपर आणि डीआरएलसह एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प मिळतात. यात अनेक क्रोम गार्निश देखील मिळतात आणि ही सेडान स्टीयरिंग व्हील, दरवाजाच्या हँडलच्या आत, एसी लोव्हर नॉब आणि पार्किंग ब्रेक लीव्हरमध्ये दिसू शकते. Ciaz च्या आतील बाजूस 4.2-इंच TFT मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले (MID) सह येतो. प्रवाशांसाठी स्टँडर्ड म्हणून रियर एसी व्हेंट आहेत. समोरची सीट आणि मागील सीट दोन्हीमध्ये सेंटर आर्मरेस्ट उपलब्ध आहेत. फ्रंट सीट आर्मरेस्टच्या खाली स्टोरेज स्पेस आहे तर मागील सीट आर्मरेस्ट्सला कप होल्डर मिळतात.

Ciaz मध्ये कीलेस एंट्री, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVMs आणि इतर फिचर्स देखील देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी Ciaz मध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, EBD सह ABS, स्पीड अलर्ट सिस्टीम आणि ड्रायव्हर आणि प्रवाशांसाठी सीटबेल्ट रिमाइंडर मिळते. मारुती सुझुकी सियाझमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आहे जे स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानासह आहे. हे इंजिन 103 bhp ची पॉवर आणि 138Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. इंजिन फाईव्ह स्पीड मॅन्युअल किंवा फोर स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

इतर बातम्या

टाटाची नवी 10 लाख रुपयांची एसयूव्ही, जाणून घ्या काय आहे नाव आणि कधी होणार लाँच

निसान किक्स एसयूव्हीवर एक लाख रुपयांची सूट, विशेष लाभमध्ये 2 ग्रॅम सोन्याचे नाणे देखील देतेय कंपनी

टेस्लाचे ‘फुल सेल्फ-ड्रायव्हिंग’ सॉफ्टवेअर या महिन्यात लाँच होणार, एक वर्षापासून सुरू आहे चाचणी

(Maruti Suzuki Ciaz touches milestone of over 3 lakh units sale)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.