5 जुलैला येतेयं मारूतीची सर्वात महागडी सात सीटर कार, किती असणार किंमत?

मारुती सुझुकीच्या वार्षिक आर्थिक निकालाच्या पत्रकार परिषदेदरम्यान कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी सांगितले होते की, आम्ही सादर करणार असलेले नवीन उत्पादन टोयोटाकडून घेतलेले वाहन असेल

5 जुलैला येतेयं मारूतीची सर्वात महागडी सात सीटर कार, किती असणार किंमत?
मारूती सुझूकीImage Credit source: Maruti Suzuki
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 7:46 PM

मुंबई : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) मोठ्या तयारीत आहे, मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी 5 जुलै रोजी आपली नवीन कार मारुती एंगेजचे (Engage) अनावरण करणार आहे. कंपनीने देऊ केलेली ही सर्वात महागडी आणि लक्झरी कार असेल. मारुतीची ही आगामी कार टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित असेल. नुकताच एक टीझरही रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये ही कार लक्झरी असेल असे सांगण्यात आले आहे.  मारुतीची ही आगामी MPV इनोव्हा हायक्रॉसवर आधारित असेल, जसे की याआधी इतर अनेक मॉडेल्समध्ये दिसले. कंपनीने टोयोटा हिरीडरवर आधारित ग्रँड विटारा सादर केली. इनोव्हा हायक्रॉसच्या तुलनेत मारुती एंगेजच्या बाह्य डिझाइनमध्ये बदल केले जाऊ शकतात, परंतु या कारचा आकार जवळपास सारखाच असेल. यामध्ये नवीन फ्रंट ग्रिल दिसू शकते.

असे आहेत तपशील

मारुती सुझुकीच्या वार्षिक आर्थिक निकालाच्या पत्रकार परिषदेदरम्यान कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी सांगितले होते की, आम्ही सादर करणार असलेले नवीन उत्पादन टोयोटाकडून घेतलेले वाहन असेल आणि ते तीन-पंक्ती (तीन रो) मजबूत-हायब्रिड मॉडेल असेल. किमतीच्या बाबतीत ते अव्वल मॉडेल असेल असेही त्यांनी सांगितले. म्हणजेच मारुती सुझुकीच्या पोर्टफोलिओमधली ही सर्वात महागडी कार असेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Maruti Suzuki Engage MPV फक्त 2.0-लीटर पेट्रोल इंजिनसह हायब्रिड मोटरसह उपलब्ध असेल. असे सांगितले जात आहे की हे इंजिन 172bhp पॉवर आणि 188Nm टॉर्क जनरेट करते, तर इलेक्ट्रिक मोटर अतिरिक्त 206Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ई-सीव्हीटी ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडले जाईल.

हे सुद्धा वाचा

या कारच्या फीचर्स इत्यादींबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नसली तरी यामध्ये ३६० डिग्री कॅमेरा, एडीएएस, पॅनोरामिक सनरूफ, थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल यासह काही उल्लेखनीय फीचर्स दिले जाऊ शकतात असे मानले जात आहे. सिस्टमसह ऑटोमॅटिक ड्रायव्हर सीट आणि मेमरी फंक्शन समाविष्ट होण्याची शक्यता आहे.

किंमत काय असेल

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित असल्याने त्याची किंमत जास्त असेल. लॉन्चपूर्वी त्याच्या किंमतीबद्दल काहीही सांगणे कठीण आहे. पण मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की कंपनी मारुती एंगेजला 20 ते 25 लाख रुपये आणणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.