दुरुस्ती आणि मेंटेनन्सचे अधिकचे पैसे विसरा, Maruti चं ग्राहकांना गिफ्ट, फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली

मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) बुधवारी जाहीर केले की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची विनामूल्य सर्व्हिसिंग आणि वॉरंटी वाढवित आहेत.

दुरुस्ती आणि मेंटेनन्सचे अधिकचे पैसे विसरा, Maruti चं ग्राहकांना गिफ्ट, फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली
Maruti Suzuki

मुंबई : मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) बुधवारी जाहीर केले की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची विनामूल्य सर्व्हिसिंग आणि वॉरंटी वाढवित आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रत्येक ग्राहकासाठी ही विनामूल्य सेवा वैध केली आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी किंवा फ्री सर्व्हिसिंगची मुदत 15 मार्च ते 31 मे दरम्यान कालबाह्य होणार आहे. ती मुदत आता 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. (Maruti Suzuki extends free service and warranty of their vehicles due to covid 19 lockdown)

कंपनीने अशा वेळी ही घोषणा केली आहे, जेव्हा ग्राहकांना घराबाहेर पडताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे ग्राहक त्यांची कार सर्व्हिस सेंटरवर नेऊ शकत नाहीत. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. कुठे लॉकडाऊन, कुठे संचारबंदी तर कुठे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत ऑटोमोबाईल कंपनीचा हा निर्णय ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.

मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक पार्थो बॅनर्जी म्हणाले आहेत की, आम्ही ग्राहकांच्या सोयीसाठी ही घोषणा केली आहे. आम्ही वाहनांची विनामूल्य सर्व्हिस, वॉरंटी आणि एक्सटेंडेड वॉरंटी 30 जून पर्यंत वाढविली आहे. दरम्यान, मारुतीसह इतर अनेक कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

एप्रिलमध्ये Maruti Suzuki ची रेकॉर्डब्रेक विक्री

एक वर्षापूर्वी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता, त्यामुळे वाहन उद्योगातील विक्री पूर्णपणे ठप्प झाली होती. परंतु कालांतराने सर्वकाही सुरळीत होऊ लागले आहे आणि आज ऑटोमोबाईल क्षेत्रात भरभराट पाहायला मिळत आहे. गेला महिना (एप्रिल) ऑटो इंडस्ट्रीसाठी चांगला होता. वाहनांच्या विक्रीच्या आकडेवारीवरुन ही बाब स्पष्ट होते. दरम्यान, विक्रीच्या बाबतीत देशात मारुती सुझुकी कंपनी आघाडीवर राहिली आहे. कारण सर्वाधिक विक्री होणार टॉप 5 वाहने मारुती सुझुकीची

मारुतीच्या WagonR आणि Swift चा जलवा

मारुती वॅगनआरने बलेनो आणि स्विफ्ट सारख्या प्रीमियम हॅचबॅक कार्सना मागे टाकत विक्रीच्या बाबतीत अव्वल स्थान पटकावलं आहे. एप्रिलमध्ये मारुतीने वॅगनआरच्या एकूण 18,656 युनिट्सची विक्री केली आहे. तथापि, ही विक्री मार्चमध्ये झालेल्या विक्रीपेक्षा (18,757) कमी आहे. गेल्या काही वर्षांपासून मारुती स्विफ्ट ही भारतीय कार उद्योगातील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. तथापि, मार्च 2021 च्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये स्विफ्टची विक्री सुमारे 2,600 युनिट्सने कमी झाली आहे. मार्च महिन्यात या कारच्या 21,714 युनिट्सची विक्री झाली होती. तर एप्रिल 2021 मध्ये स्विफ्टच्या 18,316 युनिट्सची विक्री झाली आहे.

इतर बातम्या

ऑटोमोबाईल कंपन्यांचा कर्दनकाळ ठरलेलं ग्लोबल चिप शॉर्टेज प्रकरण नक्की आहे तरी काय?

सिंगल चार्जमध्ये 150KM धावणार, तुफान मागणीमुळे ‘या’ इलेक्ट्रिक बाईकचं बुकिंग थांबवलं

(Maruti Suzuki extends free service and warranty of their vehicles due to covid 19 lockdown)