AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मारुती सुझुकीच्या ‘या’ कारला 5 स्टार सेफ्टी रेटिंग, किंमत किती? वाचा…

मारुती सुझुकीचे लोकप्रिय मॉडेल डिझायरला क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. मारुती सुझुकीने डिझायरचे हे अपडेटेड मॉडेल लॉन्च केले होते.

मारुती सुझुकीच्या 'या' कारला 5 स्टार सेफ्टी रेटिंग, किंमत किती? वाचा...
maruti Car
| Updated on: Jun 13, 2025 | 10:57 PM
Share

भारतातील प्रमुख कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीचे लोकप्रिय मॉडेल डिझायरला क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. मारुती सुझुकीने डिझायरचे अपडेटेड मॉडेल लॉन्च केले होते. या मॉडेलला भारत एनसीएपीने 5 स्टार रेटिंग दिले आहे. या कारला वृद्द आणि मुलांच्या सुरक्षिततेच्या चाचण्यांमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. या कारची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार मारुती सुझुकीने गेल्या वर्षी काही बदलांसह कॉम्पॅक्ट सेडान डिझायरचे नवीन मॉडेल लाँच केले होते. या कारमध्ये कंपनीने 6 एअरबॅग्ज दिल्या होत्या. त्यानंतर आता या कारला क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कंपनीचे अभिनंदन केले आहे.

नितीन गडकरी काय म्हणाले?

नितान गडकरी यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, “नवीन डिझायरला 5 स्टार एनसीएपी रेटिंग मिळाल्याबद्दल मारुती सुझुकी इंडियाचे अभिनंदन. मेड-इन-इंडिया कारसाठी हा एक अभिमानास्पद टप्पा आहे.’ समोर आलेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली २०२३ मध्ये वाहनांची सुरक्षा रेटिंग तपासण्यासाठी भारत एनसीएपी ही स्वदेशी प्रणाली लाँच करण्यात आली होती.

नवीन डिझायरमध्ये सुरक्षेची काळजी

नितीन गडकरी यांनी सांगितले की, कंपनीने या कारमध्ये 6 एअरबॅग्जसह अनेक प्रगत, सक्रिय आणि निष्क्रिय सुरक्षा उपकरणांचा वापर केला ही चांगली बाब आहे. भारत एनसीएपीद्वारे सुरक्षेची तपासणी करुन आमचे ध्येय वाहन सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवणे हे आहे.’

इंजिनची पॉवर

नवीन डिझायरमध्ये मारुतीच्या झेड-सिरीज 1.2-लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन 5700 आरपीएमवर 82 बीएचपी पॉवर आणि 4300 आरपीएमवर 112 एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड एएमटी गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात सीएनजी इंधन पर्याय देखील उपलब्ध आहे.

किंमत किती?

नवीन मारुती सुझुकी डिझायरची किंमत 6.84 लाख (एक्स-शोरूम ) रुपयांपासून सुरू होते आणि सर्वात महागड्या मॉडेलची किंमत 10.19 लाख रुपये आहे. ही कार LXi, VXi, ZXi आणि ZXi Plus या 4 ट्रिम्समध्ये 9 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.