Maruti Suzuki च्या ‘या’ तीन कार्सवर डिस्काऊंट, 50 हजारांची सूट मिळवण्याची अखेरची संधी

मारुती सुझुकी कंपनीने त्यांच्या तीन कार्सवर डिस्काऊंट ऑफर सादर केली आहे. (Maruti Suzuki Offering upto 50000 Rs Discount)

Maruti Suzuki च्या 'या' तीन कार्सवर डिस्काऊंट, 50 हजारांची सूट मिळवण्याची अखेरची संधी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सर्व वाहन उत्पादक कंपन्या घोषणा करीत आहेत की, ते 1 एप्रिलपासून त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढवणार आहेत. मारुती सुझुकीनेही अलीकडेच आपल्या वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत आपण मारुती सुझुकी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कारण Maruti Suzuki कंपनीने त्यांच्या तीन कार्सवर डिस्काऊंट ऑफर सादर केली आहे. (Maruti Suzuki Offering upto 50000 Rs Discount on Swift, Dzire and vitara brezza)

Maruti Suzuki कंपनी आपल्या स्विफ्ट (Maruti Suzuki Swift), मारुती सुझुकी डिजायर (Maruti Suzuki Dzire) आणि मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (Maruti Suzuki Vitara Brezza ) या कार्सवर बंपर डिस्काऊंट देत आहे. देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीने नुकतीच याबाबत माहिती दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार स्विफ्ट, डिजायर आणि विटारा ब्रेझा या कार्सवर तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. यात कंपनी कॅशबॅकसह अतिरिक्त सूटदेखील देत आहे. चला तर मग या ऑफरबद्दल जाणून घ्या…

Maruti Suzuki Swift वर 50,000 रुपयांचा डिस्काउंट

मारुती सुझुकीने जारी केलेल्या जाहिरातीनुसार Maruti Suzuki Swift या कारवर तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. या कारची सुरूवातीची किंमत 5.73 लाख रुपये इतकी आहे. यामध्ये आपल्याला बीएस 6 कम्पलायंट 1.2 लिटर पेट्रोल इंजिन मिळेल जे 83ps पॉवर आणि 113Nm पीक टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड AMT गिअरबॉक्स पर्यायासह सज्ज आहे.

Maruti Suzuki Dzire वर 28,000 रुपयांची बचत

तुम्ही जर एखादी सेडान कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर मारुती डिजायर ही कार एक उत्तम पर्याय असू शकते. ही कार एलएक्सआय, व्हीएक्सआय आणि झेडएक्सआय अशा तीन मॉडेल्स आणि 7 व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. यात आपल्याला एकूण 6 रंग मिळतील. या कारची किंमत 5.94 लाख ते 8.90 लाखांदरम्यान आहे.

Maruti Suzuki Vitara Brezza वर 30,000 रुपयांची सूट

मारुती सुझुक विटारा ब्रेझाची (Maruti Suzuki Vitara Brezza) किंमत 7.39 लाख ते 11.20 लाख रुपयांदरम्यान आहे. यात आपल्याला 1.5-लिटर पेट्रोल इंजिन मिळेल जे 103 bhp पॉवर आणि 138nm टॉर्क जनरेट करते. मारुती विटारा ब्रेझा एकूण 9 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे आणि या कारचे बेस मॉडेल एलएक्सआय असून टॉप व्हेरिएंट झेडएक्सआय आहे. या कारच्या खरेदीवर तुम्ही एकूण 30,000 रुपयांची बचत करू शकता.

संबंधित बातम्या

चारचाकीनंतर दुचाकींच्या किंमतीदेखील वाढणार, ‘या’ आघाडीच्या कंपनीची Price Hike ची घोषणा

कार्सपाठोपाठ बाईक-स्कूटरदेखील महागणार, हिरो मोटोकॉर्पकडून Price Hike ची घोषणा

तुमची आवडती कार लवकर बुक करा, 1 एप्रिलपासून ‘या’ गाड्या महागणार

(Maruti Suzuki Offering upto 50000 Rs Discount on Swift, Dzire and vitara brezza)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI