चारचाकीनंतर दुचाकींच्या किंमतीदेखील वाढणार, ‘या’ आघाडीच्या कंपनीची Price Hike ची घोषणा

पुढील महिन्यापासून केवळ कार कंपन्याच नाहीत तर दुचाकी वाहन उत्पादक कंपन्यांनीदेखील दुचाकींच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

चारचाकीनंतर दुचाकींच्या किंमतीदेखील वाढणार, 'या' आघाडीच्या कंपनीची Price Hike ची घोषणा
Kawasaki bikes

मुंबई : चारचाकींसह आता दुचाकी वाहनंदेखील महाग होणार आहेत. पुढील महिन्यापासून केवळ कार निर्मात्या कंपन्याच नव्हे तर दुचाकी वाहन उत्पादक कंपन्यांनीदेखील दुचाकींच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी यावर्षीच्या जानेवारी महिन्यात दुचाकी आणि चारचाकी वाहन उत्पादक कंपन्यांनी वाहनांच्या किंमती वाढवल्या होत्या. आता पुन्हा एकदा वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. (Kawasaki Announces price hike for motorcycles from 1st april)

आतापर्यंत अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये मारुती सुझुकी, रेनॉ, निसान, इसुझू या कंपन्यांचा समावेश आहे. त्यानंतर देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पनेदेखील त्यांच्या दुचाकींची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. आता यात कावासाकी (Kawasaki) कंपनीचीसुद्धा भर पडली आहे.

कावासाकी (Kawasaki) कंपनीने आपल्या नवीन घोषणेत म्हटले आहे की, 1 एप्रिलपासून ते आपल्या बाईकच्या किंमती वाढवणार आहेत. जपानी प्रीमियम टू व्हीलर कंपनीने असा निर्णय घेतला आहे की ते आपल्या देशातील बहुतांश बाईकच्या किंमती वाढवणार आहे. यात निंजा स्पोर्ट टूर रेंजर आणि Versys बाइक्सचा समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार नवीन किंमतींचा कावासाकी निंजा 300 आणि निंजा झेडएक्स -10 आरवर (ZX-10R) कोणताही परिणाम होणार नाही.

या बाईक्सच्या किंमती वाढणार

 1. Kawasaki Ninja 300 : 3,18,000 रुपये (किंमतीत कोणताही बदल नाही)
 2. Kawasaki Ninja 650 : 6,54,000 रुपये (vs 6,39,000 रुपये)
 3. Kawasaki Ninja 1000SX : 11,29,000 रुपये (vs 11,04,000 रुपये)
 4. Kawaskai Ninja ZX-10R : 14,99,000 रुपये (किंमतीत कोणताही बदल नाही)
 5. Kawasaki Z 650: 6,18,000 रुपए (vs 6,04,000 रुपये)
 6. Kawasaki Z 900 : 8,34,000 रुपये (vs 8,19,000 रुपये)
 7. Kawasaki Z H2 : 21,90,000 रुपये (किंमतीत कोणताही बदल नाही)
 8. Kawasaki Z H2 SE : 25,90,000 रुपये (किंमतीत कोणताही बदल नाही)
 9. Kawasaki Versys 650 : 7,08,000 रुपये (vs 6,94,000 रुपये)
 10. Kawasaki Versys 1000: 11,44,000 रुपये (vs 11,19,000 रुपये)
 11. Kawasaki Vulcan S : 6,04,000 रुपये (vs 5,94,000 रुपये)
 12. Kawasaki W800: 7,19,000 रुपये (vs 7,09,000 रुपये)
 13. Kawasaki KLX110: 2,99,500 रुपये (किंमतीत कोणताही बदल नाही)
 14. Kawasaki KLX140G: 4,06,600 रुपये (किंमतीत कोणताही बदल नाही)

निसान आणि मारुती सुझुकीची वाहनं महागणार

निसान इंडियाने (Nissan India) जाहीर केले आहे की, ते एप्रिल 2021 पासून आपल्या वाहनांच्या किंमती वाढवणार आहेत. वाढत्या इनपुट कॉस्टचा प्रभाव कमी करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचललं आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (एमएसआय) यांनी कच्च्या मालाच्या किंमतीतील वाढीची भरपाई करण्यासाठी पुढील महिन्यापासून आपल्या सर्व मॉडेल्सच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, देशातील सर्व मॉडेल्सवर ही दरवाढ लागू होईल.

देशातील सर्वात मोठी कार उत्पादन कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (MSI) पुढच्या महिन्यापासून मारुती सुझुकीच्या कार महागणार असल्याचं सांगितलंय. कच्च्या मालाच्या किमतीतील वाढीची भरपाई करण्यासाठी ते आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमतीत (Cars Price Hike From 1st April) वाढ करणार असल्याचं कंपनीनं सोमवारी सांगितलं. शेअर बाजाराला दिलेल्या अहवालात मारुती सुझुकीनं यासंदर्भात स्पष्टीकरणही दिलंय.

महिंद्रा, आयशर, अशोक लेलँडच्या किंमतीही वाढणार

कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली वाढ ही वाहन उद्योगातील किंमती वाढण्यामागचं प्रमुख कारण आहे. या वर्षात अशी वाढ दुसऱ्यांदा होत आहे. वाहन उत्पादक कंपन्या पुढील महिन्यापासून त्यांच्या वाहनांच्या किंमती 1 ते 3 टक्क्यांनी वाढवू शकतात. महिंद्रा अँड महिंद्रा, आयशर मोटर्स आणि अशोक लेलँड या कंपन्या एप्रिल-मेमध्ये दर वाढवू शकतात.

इतर बातम्या

1 रुपयांत 5 किलोमीटर धावणार, रिव्हर्स मोडसह नवी इलेक्ट्रिक स्कूटर दाखल

तुमची आवडती कार लवकर बुक करा, 1 एप्रिलपासून ‘या’ गाड्या महागणार

रॉयल एनफील्ड Interceptor 650 आणि Continental GT 650 चं नवं मॉडेल लाँच, किंमत…

(Kawasaki Announces price hike for motorcycles from 1st april)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI