Maruti Suzuki च्या कार्सवर 57000 रुपयांची धमाकेदार ऑफर, ‘या’ गाड्या स्वस्तात मिळणार

Maruti Suzuki च्या कार्सवर 57000 रुपयांची धमाकेदार ऑफर, 'या' गाड्या स्वस्तात मिळणार

मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) एप्रिल 2021 मध्ये विशेष ग्राहक सवलत (Special consumer discount) जाहीर केली आहे.

अक्षय चोरगे

|

Apr 10, 2021 | 4:36 PM

मुंबई : एप्रिलमध्ये सर्व कार उत्पादकांनी त्यांच्या कारच्या किंमतीत वाढ केली असली तरी देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) त्यांच्या अनेक गाड्यांवर जबरदस्त ऑफर सादर केली आहे. त्यामुळे जर तुम्ही मारुती सुझुकी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एप्रिल 2021 हा महिना आपल्यासाठी उत्तम आहे. कारण मारुती सुझुकी या महिन्यात त्यांच्या बऱ्याच मॉडेल्सवर मोठी सूट आणि इतर फायदे ऑफर करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार मारुतीच्या एप्रिलच्या ऑफरमध्ये (Maruti Suzuki offers April 2021) तुम्ही 57,000 रुपयांपर्यंतचा फायदा घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला रोख सवलत, एक्सचेंज ऑफर आणि कॉर्पोरेट सवलतींचे फायदे मिळतील. (Maruti Suzuki offers April 2021: Up to 57000 Rs discount on Swift, Alto, Ciaz, Baleno, Ertiga)

मारुतीच्या या गाड्यांवर बंपर डिस्काऊंट

  • मारुतीची लोकप्रिय कार ऑल्टो 800 (Alto 800) च्या पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंटवर तुम्ही ऑफर मिळवू शकता. यावर 17,000 रुपयांची रोख सूट देण्यात आली आहे.
  • मारुतीची नवीन छोटी कार एस-प्रेसो आणि लोकप्रिय हॅचबॅक सेलेरियोवरी अनुक्रमे 14,000 आणि 15000 रुपयांची रोख सवलत देण्यात आली आहे.
  • मारुती सुझुकीच्या इको आणि वॅगनआर पेट्रोल कारवर अनुक्रमे 10,000 आणि 8,000 रुपयांची रोख सूट देण्यात आली आहे. वॅगनआरच्या सीएनजी ट्रिमवर 13,000 रुपयांची कॅश बेनिफिट ऑफर देण्यात आली आहे.
  • जर तुम्ही मारुती सुझुकी स्विफ्ट विकत घेत असाल तर तुम्हाला त्याच्या Lxi व्हेरिएंटवर 30,000 रुपयांची रोख सूट मिळेल. या व्यतिरिक्त, या कारच्या Vxi, Zxi, आणि Zxi+ ट्रिम व्हेरिएंटवर 10,000 रुपयांची रोख सवलत उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 20,000 रुपयांचा लाभ मिळेल.
  • सेडान कार सियाज (Ciaz) आणि प्रीमियम हॅचबॅक कार बलेनोवरही (Maruti Suzuki Baleno) ऑफर उपलब्ध आहेत. सियाजवर 10 हजारांची रोख सवलत, 5 हजार रुपये कॉर्पोरेट सवलत आणि 15000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. XL6 एसयूव्हीवर 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे. बलेनोवर 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. बलेनोच्या Sigma व्हेरिएंटवर 20,000 रुपयांची अतिरिक्त रोख सवलत उपलब्ध आहे.
  • जर तुम्ही एमपीव्ही कार Ertiga आणि Vitara Brezza निवडत असाल तर तुम्हाला Ertiga वर केवळ 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळेल. Vitara Brezza च्या Lxi आणि Vxi व्हेरिएंटवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस तर Zxi आणि Zxi + व्हेरिएंटवर 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल.

इतर बातम्या

Tigor पासून Harrier पर्यंत, Tata ‘या’ गाड्यांवर 65000 रुपयांची सूट

Renault India चा जलवा, गाड्यांच्या विक्रीत तब्बल 278 टक्क्यांची वाढ

ही जबरदस्त कार 8 लाख रुपये सवलतीत उपलब्ध, कार विकत घेण्याची चांगली संधी

(Maruti Suzuki offers April 2021: Up to 57000 Rs discount on Swift, Alto, Ciaz, Baleno, Ertiga)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें