AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mercedes-Benz ची नवी मेड इन इंडिया कार लवकरच बाजारात, 4 सेकंदात 100 किमी वेग पकडणार

Mercedes-Benz India ने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये स्थानिक पातळीवर असेंबल केलेली गाडी GLC 43 एएमजी कूप (GLC 43 AMG coupe) लाँच केली होती.

Mercedes-Benz ची नवी मेड इन इंडिया कार लवकरच बाजारात, 4 सेकंदात 100 किमी वेग पकडणार
Mercedes Benz A35 AMG
| Updated on: Feb 25, 2021 | 10:52 AM
Share

मुंबई : मर्सिडीज बेंझ इंडियाने (Mercedes-Benz India) गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये स्थानिक पातळीवर असेंबल केलेली गाडी GLC 43 एएमजी कूप (GLC 43 AMG coupe) लाँच केली होती. या कारची किंमत 76.70 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. कंपनी आता अजून एक लोकल लेव्हलवर असेंबल केलेली कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. A35 AMG असं या कारचं नाव असेल. पुढील महिन्यात लाँच होणारी ही कार मर्सिडीज बेंझ ए-क्लास लिमोझिनवर आधारित असेल. (Mercedes Benz A35 AMG to be second locally assembled in India)

मॉडेलमध्ये 2.0 लिटर, फोर सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिन दिले जाईल जे 301bhp आणि 400Nm टॉर्क निर्माण करेल. हे इंजिन 7-स्पीड डीसीटी स्वयंचलित ट्रांसमिशनशी जोडले जाईल. यात 4 Matic सिस्टिमच्या मदतीने चारही चाकांना एनर्जी दिली जाते. हे मॉडेल अवघ्या 4.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास इतका वेग घेऊ शकतं. इलेक्ट्रॉनिकली या कारचा कमाल वेग 250 किमी प्रतितास इतका आहे.

आगामी मर्सिडीज-बेंझ A 35 AMG व्हिज्युअल अपडेटमध्ये ए-क्लास लिमोझिनपेक्षा थोडी वेगळी वाटते. त्यामध्ये नवीन सिंगल-स्लेट ग्रिल, रीडिझाइन फ्रंट आणि रीअर बम्पर, रीअर डिफ्यूझर आणि ड्युअल क्रोम टेल-पाईपचा समावेश आहे. या मॉडेलला AMG परफॉर्मन्स सीट्स, एएमएस स्पेक स्टीयरिंग व्हील, एमबीयूएक्स कनेक्टिव्हिटी आणि एक टचपॅड मिळेल. हे मॉडेल एएमजी परफॉर्मन्स सीट्स, AMS स्पेक स्टीयरिंग व्हील, MBUX कनेक्टिव्हिटी आणि टचपॅडसह सुसज्ज असेल.

मर्सिडीज बेंझने 1994 मध्ये भारतीय बाजारात प्रवेश केला होता. भारतातील मर्सिडिज बेंझचं मुख्यालय पुण्यात आहे. 1996 मध्ये या कंपनीने बंगळुरू येथे आपले संशोधन आणि विकास केंद्र स्थापन केले होते. भारतात मर्सिडीज-बेंझचा विस्तृत उत्पादन पोर्टफोलिओ आहे. भारत आता कंपनीसाठी मोठी बाजारपेठ आहे. मर्सिडीज बेंझच्या बर्‍याच मोटारी भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या कंपनीने भारतात आतापर्यंत एकूण 14 मॉडेल्स लाँच केल्या आहेत.

संबंधित बातम्या

2021 च्या पहिल्या तिमाहीत लक्झरी कार्सचा धडाका, Mercedes, BMW, Skoda च्या शानदार कार्स लाँच

Tesla ला टक्कर देण्यासाठी Mercedes ची शानदार इलेक्ट्रिक कार लाँच, 8.9 सेकंदात 100 किमी वेग पकडणार

Christmas Discounts विसरा! ‘ही’ कार कंपनी देतेय तब्बल 7 लाखांचा बंपर डिस्काऊंट

(Mercedes Benz A35 AMG to be second locally assembled in India)

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.