Tesla ला टक्कर देण्यासाठी Mercedes ची शानदार इलेक्ट्रिक कार लाँच, 8.9 सेकंदात 100 किमी वेग पकडणार

Mercedes Benz ची नवीन इलेक्ट्रिक कार टेस्ला कंपनीच्या मॉडल Y ला जोरदार टक्कर देणार आहे.

Tesla ला टक्कर देण्यासाठी Mercedes ची शानदार इलेक्ट्रिक कार लाँच, 8.9 सेकंदात 100 किमी वेग पकडणार
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 5:59 PM

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला लक्झरी कार्स बनवणाऱ्या कंपन्याही इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. टेस्ला कंपनीने नुकतीत भारतात कंपनी स्थापन केली आहे. आता या स्पर्धेत मर्सिडीज बेंझचाही समावेश झाला आहे. कारण Mercedes Benz ने त्यांची नवीन इलेक्ट्रिक EQA 2021 ही कार वर्ल्डवाईड (जगभरात) लाँच केली आहे. (Mercedes Benz unveils all-electric EQA 2021, its answer to Tesla Model Y)

Mercedes Benz ची नवीन इलेक्ट्रिक EQA ही SUV टेस्ला कंपनीच्या मॉडल Y ला जोरदार टक्कर देणार आहे. मर्सिडीजने ही कार युवकांना आणि शहरी ग्राहकांना नजरेसमोर ठेवून डिझाईन केली आहे. EQA ही कार GLA चं फुल इलेक्ट्रिक वर्जन आहे. या कारचं प्रोडक्शन (उत्पादन) जर्मनी, बीजिंग आणि चीनच्या Rastatt च्या कारखान्यात करण्यात आलं आहे. या कारचा फ्रंट लुक ग्रिल आणि LED हेडलाईट्ससह डिझाईन करण्यात आला आहे. ज्यामध्ये ब्लू टिंट देण्यात आला आहे. तर गाडीच्या मागच्या बाजूला हाईलाईट फ्लॅशलाईट आहे. या कारचा साईड व्ह्यूदेखील आकर्षक आहे. साईडला अलॉय व्हील्स खूप स्टायलिश दिसत आहेत. EQA मध्ये 190 हॉर्सपॉवर क्षमतेची इलेक्ट्रिक मोटार देण्यात आली आहे. जी 375 Nm टॉर्क जनरेट करते. तर मागच्या बाजूला 66 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

पॉवरफुल बॅटरी

या कारमधील बॅटरी 100 kW च्या डीसी चार्ज्ड किंवा 11 kW च्या चार्जिंग बॉक्सद्वारे चार्ज केलं जाऊ शकतं. EQA ही कार 0 से 100 किमी प्रति तास इतका वेग केवळ 8.9 सेकंदांमध्ये पकडू शकते. ही कार जास्तीत जास्त 160 किमी प्रति तास वेगाने धावू शकते. भविष्यात या कारचं फोर व्हील ड्राइव वर्जन लाँच केलं जाऊ शकतं. जे 270 hp आणि 50 माइल्सच्या रेंजसह लाँच केलं जाईल.

अशी आहे EQA

या कारचं वजन 2040 किलो आहे, ही कार 430 किलो लोड घेऊ शकते (वजन उचलू शकते). या कारमध्ये 340 लीटर इतकी बूट स्पेस आहे. रियर सीट फोल्ड केल्यानंतर ही स्पेस 1320 लीटर्स इतकी होते. या कारची लांबी 446 cm, रुंदी 183 cm आणि उंची 162 cm इतकी आहे.

फिचर्स

या कारमध्ये तुम्हाला 18 इंचांचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, जे LED हेडलाईट्स आणि MBUX इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह येतात. या कारची किंमत तब्बल 44 लाख रुपयांच्या आसपास असू शकते. 4 फेब्रुवारीपासून कंपनी या कारची ग्लोबल डिलीव्हरी सुरु करणार आहे.

हेही वाचा

Special Story : 2021 मध्ये इलेक्ट्रिक कार्सचा जलवा, टाटा, महिंद्रा ते टेस्ला, अनेक बड्या कंपन्या शानदार कार लाँच करणार

देशात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली, टाटा मोटर्सच्या Nexon EV च्या 2,200 युनिट्सची विक्री

पेट्रोल पंपप्रमाणेच इलेक्ट्रिक गाड्यांसाठी ‘चार्जिंग’ स्टेशन उघडणार, चार्जिंगसाठी येणार ‘इतका’ खर्च!

2021 मध्ये येणार जबरदस्त इलेक्ट्रिक कार, एकदाच चार्ज करून 500 किमी धावणार

आता इलेक्ट्रिक कार चार्ज करावी लागणार नाही, ही कंपनी बॅटरी स्वॅपिंग सर्व्हिस सुरु करणार

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.