AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MG Hector किंवा Hector plus खरेदी करताय? ‘इतके’ महिने वाट पाहावी लागेल

MG Hector आणि MG Hector plus या एसयूव्ही बुक करणाऱ्या ग्राहकांना डिलीव्हरीसाठी अधिक काळ थांबावे लागणार आहे.

MG Hector किंवा Hector plus खरेदी करताय? ‘इतके’ महिने वाट पाहावी लागेल
MG Hector plus
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 25, 2021 | 7:14 AM
Share

मुंबई : एमजी मोटर कंपनीने (MG Motor) एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात कंपनीने असे म्हटले आहे की, ज्या ग्राहकांनी MG Hector आणि MG Hector plus या एसयूव्ही बुक केल्या आहेत, त्यांना डिलीव्हरीसाठी अधिक काळ थांबावे लागणार आहे. कार उत्पादक कंपनीने असे म्हटले आहे की आमच्या कारची मागणी खूप जास्त आहे. तसेच दुसऱ्या बाजूला सेमीकंडक्टरची कमतरता निर्माण झाली आहे. त्याचा उत्पादनावर परिमाण होत असून त्यामुळे वाहनांच्या डिलीव्हरीसाठी (वितरणासाठी) अधिक वेळ लागत आहे. (MG Hector, Hector Plus waiting period increases due to high Demand and Lack of semiconductors)

वाहनांच्या वितरणासाठी 2 ते 3 महिन्यांचा विलंब होऊ शकतो, असे कंपनीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना अधिक माहितीसाठी इथल्या व्यापाऱ्यांशी (एमजी डीलर्स) संपर्क साधावा लागेल. सध्या, एमजी हेक्टरच्या मिड स्पेक आणि फुली लोडेड वेरिएंटसाठी सर्वात जास्त वाट पाहावी लागू शकते. अशी परिस्थिती या एसयूव्हीच्या थ्री रो हेक्टर प्लसचीदेखील आहे. हेक्टर प्लसचा प्रतीक्षा कालावधी (वेटिंग पीरियड) 5 महिन्यांचा आहे. हेक्टर हे कार निर्मात्या कंपनीचे सर्वात प्रसिद्ध मॉडेल आहे. कंपनीने लाँचिंगनंतर दोन वर्षात या कारच्या एकूण 50,000 युनिट्सची विक्री केली आहे. दुसऱ्या बाजूला एमजीच्या ऑल इलेक्ट्रिक झेडएस ईव्हीचा (ZS EV) प्रतीक्षा कालावधी 2 महिन्यांचा आहे. यावर्षी झेडएस ईव्हीची बॅटरी आणि मॉडेल कंपनीने अपडेट केले आहे.

कशी आहे 2021 MG Hector?

एमजी मोटर इंडिया (MG Motor India) कंपनीने गेल्या महिन्यात भारतात MG हेक्टरची नवी गाडी लाँच केली आहे. एमजी या कंपनीने भारतीय मार्केटमध्ये 2019 ला दमदार इंट्री केली होती. त्यानंतर अनेक एकापेक्षा एक चांगल्या गाड्या कंपनीने मार्केटमध्ये लाँच केल्या होत्या. या गाडीची किंमत 12.89 लाखापासून सुरु होत आहे. या विविध फिचर्स असल्याने सध्या या गाडीची मार्केटमध्ये चांगलीच चर्चा आहे. सध्या भारतात MG च्या MG Hector, MG ZS EV, MG Hector Plus 6 Seater आणि MG Gloster या कार उपलब्ध आहेत.

कंपनीने नवीन CVT गियरबॉक्स सध्याच्या पेट्रोल इंजिनसोबत जोडलं आहे. यापूर्वी एमजी हेक्टर पेट्रोल वेरियंट डुअल-क्लच ट्रान्समिशनसह (DCT) सादर करण्यात आलं होतं. नवीन CVT युनिट 2021 एमजी हेक्टरमध्ये 1.5-लीटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिनसोबत जोडलं जाईल. हे इंजिन 141 बीएचपी आणि 250 एनएम टार्क जनरेट करतं. सध्या हे 6-स्पीड मॅनुअल आणि डीसीटी गियरबॉक्ससह दिलं जातं. नव्या ट्रान्समिशन अपडेटसह एमजी इंडिया हेक्टरची किंमत जवळपास 50,000-60,000 रुपयांपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

किंमत

कंपनी या वर्षीच्या मध्यात सात सीटर हेक्टर लाँच करणार होती, पण कोरोना संकटामुळे कंपनीने या कारचे लाँचिंग पुढे ढकलले. भारतात एमजी हेक्टर प्लस 6 सीटरची किंमत 13.73 लाख ते 18.68 लाख रुपयांपर्यंत असू शकते. या CVT युनिट 2021 एमजी हेक्टरची किंमत 50 ते 60 हजारांनी कमी करण्याची शक्यता आहे.

तर MG Hector Plus 7 Seater ची किंमत 6 सीटर मॉडलच्या तुलनेत एक लाख रुपयांनी अधिक असू शकते, असे बोलले जात आहे. ही कार महिंद्राची अपकमिंग एसयूव्ही New Mahindra XUV500 आणि टाटा मोटर्सची आगामी एसयूवी Tata Gravitas ला टक्कर देणार आहे.

शानदार फिचर्स

हेक्टरकडे स्वतःचे असे अनेक फिचर्स आहेत. कारच्या बाहेरील प्रोफाईलवर एक मोठं ग्रिल, स्वतःची एलईडी डीआरएल शैली, नवीन स्किड प्लेट आमि क्रोम आहे. यामध्ये अपडेटेड आय स्मार्ट इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि ड्युल-टोन अपहोल्स्ट्री मिळते. सहा-सीटर हेक्टर अधिक प्रिमीय दिसते. त्यामुळे हेक्टरच्या सात-सीटर एडिशनची सध्या जोरदार चर्चा आहे.

दमदार इंजिन

MG Hector Plus 7 Seater ही कार 6 सीटर एमजी हेक्टर प्लस प्रमाणे तीन इंजिन पर्यांयासोबत लाँच केली जाण्याची शक्यता आहे. ज्यात 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि हायब्रिड सिस्टिमसोबत 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन 143 बीचएपीची पॉवर आणि 250 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. पेट्रोल इंजिन 6 स्पीड मॅन्यूअल आणि डीटीसी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत येते. तर 2.0 लीटर डिझेल इंजिन 168bhp पॉवर आणि 350Nm टॉर्क जनरेट करतं.

इतर फीचर्स

या कारच्या सीट पोझिशनमध्ये थोडे बदल अपेक्षित आहेत. यामध्ये सीट्सच्या दुसऱ्या ओळीत (दुसरी रो) 60.40 प्रमाणे सीट असणार आहे. तर थर्ड रोच्या सीट स्लायडिंग फिचर्ससोबत असणार आहेत. इन्फोटेनमेंट सिस्टम सोबत पॉवर अॅडजस्टेबल फ्रंट पॅसेंजर सीट, ड्रायव्हर सीट, स्मार्ट स्वाइफ फंक्शनसोबत पॉवर टेल गेट, 8 कलर एंबियट लायटिंग, पॅनारेमिक सनरूफ, कनेक्टेड व्हेईकल टेक्नोलॉजी, मल्टी फंक्शन स्टियरींग व्हीलसोबत सेफ्टी फीचर्समध्ये 6 एअरबॅग्स, ट्रॅक्शन कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटर, एबीएस, ईएससी, 360 डिग्री कॅमेरा, हिल होल्ड असिस्ट सह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

इतर बातम्या

तुमची आवडती कार लवकर बुक करा, 1 एप्रिलपासून ‘या’ गाड्या महागणार

Hyundai ची स्पेशल ऑफर, या पाच कार्सवर 1.50 लाख रुपयांची सूट

Maruti Suzuki Car Price Hike: येत्या महिन्यापासून मारुती सुझुकीच्या गाड्या महागणार, जाणून घ्या

सचिन तेंडुलकरची BMW X5M विकत घ्यायचीय? नाशिकच्या मालकाकडून विक्रीला, किंमत अवघी…

(MG Hector, Hector Plus waiting period increases due to high Demand and Lack of semiconductors)

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...