सिंगल चार्जवर 439 किमी रेंज, MG ची नवी इलेक्ट्रिक कार बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

ब्रिटिश ऑटोमोबाईल कंपनी एमजी ने आपल्या MG ZS EV चे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लाँच केले आहे. कंपनीने या कारच्या ड्रायव्हिंग रेंजमध्ये सुधारणा केली आहे.

सिंगल चार्जवर 439 किमी रेंज, MG ची नवी इलेक्ट्रिक कार बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Mg Zs Ev
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 1:55 PM

मुंबई : ब्रिटिश ऑटोमोबाईल कंपनी एमजी ने आपल्या MG ZS EV चे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लाँच केले आहे. कंपनीने या कारच्या ड्रायव्हिंग रेंजमध्ये सुधारणा केली आहे. कंपनीच्या मते, ही कार सिंगल चार्जवर 439 किमीची रेंज देईल. यासोबतच या कारमध्ये नवीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. MG ZS EV भारतीय बाजारात आधीच विक्रीसाठी उपलब्ध आहे, आता ते नवीन व्हेरियंटसह अपडेट केले जाईल की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. (MG ZS EV facelift revealed, comes with enhanced driving range)

केबिनमध्ये बदल

MG ZS EV च्या केबिनबद्दल बोलायचे झाले तर त्यात काही नवीन फिचर्स दिसतील. या कारमध्ये 10.1-इंच डिस्प्ले आहे, जी नवीन MG iSMART इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. या नवीन व्हर्जनमध्ये अनेक नवीन फीचर्स रिमोट कंट्रोल फंक्शन्स आणि अधिक कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध होतील, असा दावा ब्रिटिश कार उत्पादक कंपनीने केला आहे. याशिवाय वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजी त्यात वापरण्यात आली आहे.

MG ZS EV मध्ये स्ट्राँग बॅटरी

या कारमध्ये कंपनीने 72 kWh ची मोठी बॅटरी वापरली आहे, जी सिंगल चार्जवर 439 किमी रेंज देते, असा कंपनीचा दावा आहे. या कारचे सध्याचे मॉडेल सिंगल चार्जवर 262 किमीचे अंतर कापू शकते. कंपनीने सांगितले की, पुढच्या वर्षापर्यंत 51 kWh बॅटरी पॅक लॉन्च केला जाईल, जो सिंगल चार्जवर 318 किमीचे अंतर पार करू शकेल.

MG ZS EV ची खासियत

पेट्रोल इंजिनसह एमजी झेडएस प्रमाणेच ईव्हीमध्येदेखील नवीन शार्प एलईडी हेडलॅम्प आणि टेललाइट्स देण्यात आले आहेत. यामध्ये ग्रिल स्वतंत्रपणे देण्यात आलेलं नाही, यातील ग्रिल बंपरचाच एक भाग आहे आणि तो कारच्या बॉडी कलरमध्ये आहे. बॅक पॅनेलवर असलेल्या प्रोफाइलमध्ये थोडासा बदल देखील केला आहे. यामध्ये अलॉय व्हील्सही अपडेट करण्यात आले आहेत.

सध्याच्या MG ZS EV मधील फीचर्स

ही कार दोन ट्रिम्स ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये Excite आणि Exclusive चा समावेश आहे. MG ZS EV मध्ये 44.5 kWh ची लिक्विड कूल्ड लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे, जी 150 PS पॉवर आणि 353 Nm टॉर्क जनरेट करते. SUV एकदा चार्ज केल्यानंतर 340 किमीपर्यंत अंतर धावू शकते. MG ने म्हटलंय की, ZS EV मधील बॅटरी 15A होम सॉकेट आणि DC फास्ट चार्जरनेसुद्धा चार्ज करु शकता. 50 kW DC फास्ट चार्जरद्वारे ही बॅटरी चार्ज केली तर 80 टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी केवळ 50 मिनिटं पुरेशी आहेत. सुरक्षेसाठी या गाडीत 6 एयरबॅग्स, HDC, HSA, ABS आणि EBD सारखे स्टँडर्ड फिचर्स देण्यात आले आहेत. या कारची सुरुवातीची किंमत 20 लाख रुपये इतकी आहे.

इतर बातम्या

डुकाटीची शानदार सुपरस्पोर्ट 950 मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात लाँच, 21000 रुपये देऊन बुक करा शानदार मायक्रो एसयूव्ही

MG Astor लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स

(MG ZS EV facelift revealed, comes with enhanced driving range)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.