मिर्झापूर फेम अभिनेता विजय वर्माने घेतली नवी ढासू SUV, पॉवर आणि फीचर्सच्या बाबतीत अव्वल

अभिनेता विजय वर्मा याने स्वत: साठी एक आलिशान SUV खरेदी केली आहे. जीप कंपास (Jeep Compass) असे या SUV चं नाव आहे.

मिर्झापूर फेम अभिनेता विजय वर्माने घेतली नवी ढासू SUV, पॉवर आणि फीचर्सच्या बाबतीत अव्वल
Vijay Verma with his Jeep Compass

मुंबई : मिर्झापूर (Mirzapur), गली बॉय (Gully Boy) यांसारख्या चित्रपट आणि वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता विजय वर्मा याने स्वत: साठी एक आलिशान SUV खरेदी केली आहे. जीप कंपास (Jeep Compass) असे या SUV चं नाव आहे, या कारचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत विजयने माहिती दिली आहे. (Mirzapur and Gully boy fame actor Vijay Verma buysnew SUV Jeep Compass)

कारच्या फोटोसोबत कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे की, “स्क्रीनवर कारचं स्टीलिंग, फिक्सिंग, ड्रायव्हिंग आणि सेलिंगनंतर आता मला माझी स्वतःची कार मिळाली आहे. माझ्या या नव्या लव्ह इंटरेस्टला हॅलो म्हणा.”

विजयने सोशल मीडियावर जीप कंपास (Jeep Compass) विकत घेतल्याची माहिती दिल्यानंतर त्याला अभिनंदनाचे मेसेजेस येऊ लागले आहे. त्याच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाहायला मिळतोय. जीप कंपनीने यावर्षी जानेवारीत जीप कंपासची नवीन फेसलिफ्ट आवृत्ती सादर केली होती. या कारची किंमत सुमारे 20 लाख रुपये आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Varma (@itsvijayvarma)

कशी आहे 2021 Jeep Compass Facelift?

जीप इंडियाने भारतात या वर्षीच्या सुरुवातील 2021 Jeep Compass Facelift लाँच केली आहे. या शानदार SUV ची किंमत 16.99 लाख रुपयांपासून सुरु होते आणि 28.29 लाख रुपयांपर्यंत आहे. 2017 मध्ये सुरुवात केल्यानंतर जीप कम्पास ही कार कंपनीसाठी भारतात एक मुख्य आधार राहिला आहे. 2021 जीप कम्पासाठी भारत ग्लोबल स्तरावर दुसरा बाजार आहे

2021 मॉडेलच्या डॅशबोर्डची डिझाईन पूर्णपणे नवीन आहे आणि यामध्ये 10.1 इंचाची टचस्क्रीनसोबत अॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटोसोबत नवीन UConnect 5 सिस्टम मिळते. दुसरी विशेषता म्हणजे व्हेटिंलेटेड सीट्स, वायरलेस चार्जिंग, फुल डिजीटल इंस्ट्रूमेंट कंसोल आणि एक नवीन 360-डिग्री पार्किंग कॅमराही आहे. जीप ने इन-कार कंट्रोलसाठी नवीन नॉब आणि बटणसोबत प्रिमिअम सॉफ्ट-टच मटेरिअलचा वापर केला आहे.

या गाडीची टक्कर ह्युंडई Tucson, टाटा हॅरिअर आणि एमजी हेक्टरसोबत असेल. 2021 Compass SUV ची सर्वात खास बाब म्हणजे याची स्टाईल आणि अनेक महत्त्वाचे फीचर्स आहे ज्यामुळे ही आपल्या सेगमेंटमधील दुसऱ्या सर्व गाड्यांना मागे सोडू शकते.

डॅशबोर्डचं डिझाईन अपडेट झालं

SUV मध्ये तुम्हाला स्लॉट ग्रिल, ट्रॅपिजॉअडल व्हिल आर्क्स, रिफ्लेक्टर्ससोबत हेडलाईट्स आणि LED प्रोजेक्टर्स देण्यात आले आहेत. दमदार लुकसाठी कंपनीने डॅशबोर्डच्या डिझाईनला अपडेट केलं आहे. ग्राहक येथे ड्युअल टोन आणि फुल ब्लॅग कॉम्बिनेशनमधून कुठल्याही व्हेरिएंटला निवडू शकतात. या व्हिकलमध्ये नवीन स्टिअरिंग व्हील आमि अपडेटेड इंस्ट्रूमेंट पॅनल देण्यात आलं आहे. यामध्ये सेंट्रल कंसोलची स्टोरेज कॅपेसिटी जास्त देण्यात आली आहे.

गाडीमधील दमदार फीचर्स

फीचर्सच्या बाबतील अपडेटेड कम्पासमध्ये स्टिअरिंग व्हिलवर देण्यात आलेल्या बटन्सच्या मदतीने तुम्ही सहज स्क्रीनपर्यंत पोहोचू शकता. विशेष म्हणजे, एफसीए इंडियाच्या नुसार, सर्व प्रवासी 20 इंचापेक्षा जास्त डिजीटल स्क्रीन स्पेसचा आनंद घेऊ शकतात. सुरक्षेच्या दृष्टीने यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, हिल होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोल, सेलेकटरेन 4×4 सिस्टम, 6 अयरबॅग, पॅनिक ब्रेक असिस्ट, ब्रेक सपोर्ट सारख्या 50 पेक्षा जास्त सुविधा आहेत.

इतर बातम्या

Hyundai Alcazar SUV ची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी, कंपनीने लाँचिंगबाबतचा निर्णय बदलला

Mahindra वाहनधारकांसाठी खुशखबर! कोरोनाच्या परिस्थितीत ग्राहकांसाठी कंपनीचा मोठा निर्णय

वाहनांच्या टायर्सबाबत नव्या नियमावलीचा प्रस्ताव, 1 ऑक्टोबरपासून लागू होणारे नियम काय?

(Mirzapur and Gully boy fame actor Vijay Verma buysnew SUV Jeep Compass)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI