मोटार वीमा, थर्ड पार्टी इन्श्यूरन्सचा उपयोग काय?, जाणून घ्या गाडीच्या विम्याची संपूर्ण माहिती

कोणतेही नवे वाहन खरेदी करताना मोटार वीमा (Motor Insurance) तसेच इतर कायदे समजून घेणे गरजेचे आहे. थर्ड पार्टी इन्श्यूरन्स वीमा (Third Party Insurance) हासुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. (motor insurance insurance claim)

मोटार वीमा, थर्ड पार्टी इन्श्यूरन्सचा उपयोग काय?, जाणून घ्या गाडीच्या विम्याची संपूर्ण माहिती
वाहन विमा नूतनीकरण
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 10:47 AM

मुंबई : कोणतेही नवे वाहन खरेदी करताना मोटार वीमा (Motor Insurance) तसेच इतर गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. थर्ड पार्टी इन्श्यूरन्स (Third Party Insurance) हासुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडून (IRDAI) थर्ड पार्टी इन्श्यूरन्सची सर्व प्रक्रिया पार पाडली जाते. (motor insurance and insurance claim rules of IRDAI detail information)

हे कागदपत्र नेहमी सोबत ठेवा

कोणतेही वाहन प्रत्यक्षात चालवण्याअगोदर गाडीचे इन्श्यूरन्स सर्टिफीकेट, रजिस्ट्रेशन सर्टिफीकेट, पोल्यूशन कंट्रोल सर्टिफीकेट हे कागदपत्र सोबत असणे महत्त्वाचे आहे. तसचे वाहन चालवणाऱ्या व्यक्तीकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणेही गरजेचे आहे.

आयआरडीएआय (IRDAI) च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीप्रमाणे वाहन इन्श्यूरन्स ट्रान्सफर करता येऊ शकतो. त्यासाठी वाहन विकणाऱ्या व्यक्तीने लिखित स्वरुपात परवानगी देणे गरजेचे आहे. त्यासोबतच नवा प्रपोजल फॉर्मसुद्धा भरावा लागेल. या सर्व प्रक्रियेसाठी नाममात्र फी आकारण्यात येते. त्यानंतर वाहन इन्श्यूरन्स वाहनाच्या नव्या मालकाकडे ट्रान्सफर होतो.

वाहन इंन्श्यूरन्स क्लेम करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

अपघात किंवा इतर कारणामुळे तुमच्या वाहनाची नासधूस झाली; किंवा एखादा भाग खराब झाला तर मोटार इन्श्यूरन्स केल्म ( motor insurance claim) करुन तुमचे वाहन दुरुस्त करता येऊ शकते. त्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्रं असणं गरजेचं आहे. वाहन दुरुस्ती करण्यासाठी क्लेम फॉर्म, गाडी रजिस्ट्रेशन सर्टिफीकेट, वाहनाचे नुकसान झालेला तपशील, आलेल्या खर्चाची पावती या गोष्टी इन्श्यूरन्स क्लेम करताना तुमच्यासोबत असणे गरजेचे आहे.

अन्यथा इन्श्यूरन्स क्लेम मिळणार नाही

कित्येक वेळा आपण एखादे जुने वाहन खरेदी करतो. मात्र, यावेळी सर्व कागदपत्रं व्यवस्थितपणे घेण्याचे कधिकधी आपण विसरुन जातो. आपली ही चूक भविष्यात आपल्याला महागात पडू शकते. IRDAI च्या नियमानुसार वाहन दुरुस्तीसाठी इन्श्यूरन्स क्लेम करायचे असले तर गाडीचा मालक आणि इन्श्यूरन्स क्लेम करणारी व्यक्ती एकच असणे गरजेचे आहे. असे नसेल तर वाहनाचा इन्श्यूरन्स असूनही त्याचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे जुने वाहन घेत असाल तर गाडी स्व:तच्या नावावर करुन घेताना वाहनाचा इन्श्यूरन्ससुद्धा स्व:तच्या नावावर करुन घ्या. वरील सर्व गोष्टी तुम्हाला आणि तुमच्या वाहनाला आपत्कालीन प्रसंगामध्ये सुरक्षित ठेवतील.

संबंधित बातम्या :

भारतीय मार्केटमध्ये टाटाच्या ‘या’ छोट्या SUV चा धुमाकूळ, विक्रीमध्ये 21 टक्क्यांची वाढ

Honda Activa ला भारतीयांची सर्वाधिक पसंती, 20 वर्षात तब्बल 2.5 कोटी ग्राहक जोडले

होंडा कंपनी करणार कर्मचाऱ्यांना रिटायर; भारतातील पर्मनंट कर्मचाऱ्यांना बसणार मोठा फटका

(motor insurance and insurance claim rules of IRDAI detail information)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.