AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 वर्ष जुनी कार वापरता? ऑक्टोबरपूर्वी ‘हे’ काम करा, अन्यथा आठपट शुल्क भरावं लागणार

ऑक्टोबर महिन्यापासून ग्राहकांना त्यांची 15 वर्षे पूर्ण झालेल्या कारचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी 8 पट रक्कम भरावी लागेल. New Scrappage Policy

15 वर्ष जुनी कार वापरता? ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा, अन्यथा आठपट शुल्क भरावं लागणार
लाखो वाहनांनी चुकवला कोट्यवधींचा कर
| Updated on: Mar 18, 2021 | 1:59 PM
Share

नवी दिल्ली : 2021च्या ऑक्टोबर महिन्यापासून ग्राहकांना त्यांची 15 वर्षे पूर्ण झालेल्या कारचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी 5 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. सध्याच्या नोंदणी शुल्काच्या 8 पट शुल्क भरावं लागेल. तर, दुचाकी वाहनाचं रजिस्ट्रेशन करायचं असल्यास 1 हजार रुपये भरावेलागणार आहेत. तर, 15 वर्ष झालेल्या ट्रक आणि बसेससाठी फिटनेस रिन्यूअल सर्टिफिकेटसाठी12,500 रुपये द्यावे लागतील. हे सध्याच्या नोंदणी शुल्काच्या 21 पट जास्त आहे. (New Scrappage Policy from October registration fee increased by eight times for 15 year old car)

नोंदणीला उशीर झाल्यास दंड

रस्ते वाहतूक मंत्रालयानं नवीन व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी जाहीर करण्यापूर्वी एक ड्राफ्ट नोटिफिकेशन जारीकेले आहे. त्यामध्ये खासगी वाहनाची नोंदणी करण्यासाठी उशीर केल्यास 300 रुपयांचा दंड 500 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

देशभर स्क्रॅपेज पॉलिसी राबवा

केंद्र सरकारनं या प्रस्तावाबाबत यापूर्वी घोषणा केली आहे. प्रदूषण पसरवणाऱ्या जुन्या गाड्यांबाबत त्यामध्ये माहिती देण्यात आली आहे. 10 ते 15 वर्ष जुन्या पेट्रोल आणि डिझेल गाड्या दिल्ली आणि दुसऱ्या भागांमध्ये बॅन करण्याबाबत सरकार एनजीटी किंवा सुप्रीम कोर्टात जाणार याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पर्यावरणवादी कार्यकर्ते अनिल सूद यांनी केंद्र सरकार प्रदूषण पसरवणाऱ्या गाड्यांच्या बाबतीत एक धोरण तयार करत असल्याचं सांगितलं. एका ठिकाणी ही पॉलिसी राबवण्यापेक्षा संपूर्ण देशभरात स्क्रॅपेज पॉलिसी लागू केली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.

पेट्रोल आणि डिझेलशिवाय चालणाऱ्या वाहनांबाबात अस्पष्टता

सरकारच्या नव्या धोरणामध्ये पेट्रोल आणि डिझेल सोडून दुसऱ्या इंधनावर चालणाऱ्या 15 वर्ष झालेल्या गाड्यांबाबत स्पष्टता नसल्याची माहिती आहे. खासगी वाहनांसाठी त्यांना 15 वर्षानंतर त्यांच्या आरसी बुक नूतनीकरण करावे लागेल. तर वाहनांचं फिटनेस सर्टिफिकेट 8 वर्षानंतर जमा करावे लागणार आहे.

नितीन गडकरी यांचं स्क्रॅपेज पॉलिसीवर मत

स्क्रॅपेज धोरण फायदेशीर ठरेल. यामुळे अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळेलच, मात्र त्यासोबत प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. स्वैच्छिक वाहन स्क्रॅपेज धोरणानुसार खासगी वाहनांची 20 वर्षांनी तर व्यावसायिक वाहनांची 15 वर्षांनी फिटनेस टेस्ट होईल, असेही गडकरींनी नमूद केले. लवकरच स्वैच्छिक वाहन स्क्रॅपेज धोरण राबवण्यात येईल. जे लोक या धोरणाचा अवलंब करणार नाहीत त्यांच्या वाहनांवर हरित कर आणि अन्य कर आकारण्यात येतील. तसेच अशा वाहनांना ‘ऑटोमेडेट फिटनेस टेस्ट’ ही करावी लागेल.

संबंधित बातम्या:

नाईट ड्युटीवर जाण्यास मनाई केल्याने शिवीगाळ, संतापलेल्या तिघांकडून चाकूने वार

Gold Rate : 8 महिन्यात सगळ्यात स्वस्त झालं सोनं, यावर्षी 4000 ने घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी

(New Scrappage Policy from October registration fee increased by eight times for 15 year old car)

लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.