Toyota ची शानदार SUV सज्ज, भारतात कधी लाँच होणार, कारमध्ये काय आहे खास?

या वाहनाला टोयोटा फ्रंटलँडर (Toyota Frontlander) असे नाव देण्यात आले आहे. ही कार नुकतेच अनावरण केलेल्या कोरोला क्रॉस एसयूव्हीचे वेगळे व्हर्जन असल्याचे दिसते.

Toyota ची शानदार SUV सज्ज, भारतात कधी लाँच होणार, कारमध्ये काय आहे खास?
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 12:11 PM

मुंबई : टोयोटा (Toyota) व्हेईकल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी लवकरच एक शानदार SUV लाँच करण्याची तयारी करत आहे. ज्याप्रमाणे लोकांना अजूनही टोयोटा फॉर्च्युनरची क्रेझ आहे, या आगामी एसयूव्हीला तितकेच प्रेम मिळेल, अशी कंपनीला आशा आहे. (New Toyota Frontlander SUV teased ahead of global debut)

एसयूव्ही आणण्यामागचे कारण असेही आहे की अलीकडच्या काळात या सेगमेंटमधील लोकांची क्रेझ खूप वाढली आहे आणि या दृष्टीने टोयोटा ही नवीन एसयूव्ही देखील आणत आहे. आता सस्पेन्स संपवत आम्ही तुम्हाला या नवीन SUV चे नाव काय आहे, ती कशी दिसते आणि भारतात कधी लॉन्च होण्याची अपेक्षा आहे ते सांगणार आहोत.

या वाहनाला टोयोटा फ्रंटलँडर (Toyota Frontlander) असे नाव देण्यात आले आहे. ही कार नुकतेच अनावरण केलेल्या कोरोला क्रॉस एसयूव्हीचे वेगळे व्हर्जन असल्याचे दिसते. कोरोला क्रॉस एसयूव्ही आधीच परदेशात विकली जात आहे. भारतात लॉन्च होण्यापूर्वी ती चीनमध्ये लॉन्च केली जाईल. फ्रंटलँडरमधील जवळजवळ प्रत्येक फीचर कोरोला क्रॉस सारखेच दिसते. फ्रंटलँडरचे साइड प्रोफाइल कोरोला क्रॉससारखेच दिसते. पण कारचे हेड लॅम्प, फ्रंट ग्रिल आणि बंपर थोडे वेगळे आहे. याशिवाय मागील बंपरमध्येही थोडा फरक आहे. या कारच्या ग्लोबल लॉन्चपूर्वी कंपनीने त्याची झलक सादर केली आहे.

कसं असेल इंजिन?

फ्रंटलँडर टोयोटाच्या टीएनजीए मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर बनवली गेली आहे. जगभरातील सर्व टोयोटा एसयूव्ही आणि सेडान या प्लॅटफॉर्मवर बनवल्या जातात. या कारला 1.8 लीटर पेट्रोल इंजिन मिळेल, जे हायब्रिड देखील असेल. कंपनी त्याच्या बहुतांश प्रकारांमध्ये AWD (ऑल व्हील ड्राइव्ह) देखील देऊ शकते.

भारतात कधी होणार लाँच?

फ्रंटलँडर सध्या केवळ लेफ्ट हँड ड्राईव्हमध्ये येणे अपेक्षित आहे, परंतु कोरोला क्रॉस निश्चितपणे थायलंड सारख्या देशांमध्ये राईट हँड ड्राइव्हमध्ये येते. अशा परिस्थितीत ही कार भारतात लॉन्च होणे अपेक्षित आहे. पण ही कार कधी लाँच होईल याबद्दल सध्या कोणताही ठोस अहवाल नाही.

काही अहवालांनुसार फ्रंटलँडरऐवजी टोयोटा RAV4 SUV भारतात लॉन्च करू शकते. कारण या कारच्या टेस्टींगदरम्यानचे अनेक फोटो याआधी समोर आले आहेत. भारतात ही कार कोणत्या नावाने लाँच होईल, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

इतर बातम्या

Yamaha YZF-R15 V4 चं वितरण सुरु, जाणून घ्या नव्या मोटारसायकलमध्ये काय आहे खास?

महिन्याला 2500 रुपयांच्या EMI वर घरी न्या TVS ची दमदार मायलेजवाली बाईक, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

1 लीटर पेट्रोलमध्ये 45km रेंज, 80 हजारांची Suzuki Access 125 अवघ्या 17,820 रुपयात

(New Toyota Frontlander SUV teased ahead of global debut)

Non Stop LIVE Update
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.