5

Nexon Facelift : खरंच की काय! नेक्सॉन फेसलिफ्ट जुन्या मॉडेलपेक्षा स्वस्त असणार, किंमत आणि काय फीचर्स असतील ते जाणून घ्या

Nexon Facelift Price: टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट जुन्या मॉडेलपेक्षा स्वस्त असेल अशी चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊयात अपकमिंग इलेक्ट्रिक फेसलिफ्टची किंमत असेल आणि काय फीचर्स असतील ते..

Nexon Facelift : खरंच की काय! नेक्सॉन फेसलिफ्ट जुन्या मॉडेलपेक्षा स्वस्त असणार, किंमत आणि काय फीचर्स असतील ते जाणून घ्या
Nexon Facelift : नेक्सॉन फेसलिफ्टच्या किमतीबाबत जोरदार चर्चा, जुन्या मॉडेलपेक्षा स्वस्त आणि मिळतील असे फीचर्स
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 3:17 PM

मुंबई : नेक्सॉन फेसलिफ्ट 14 सप्टेंबर 2023 रोजी लाँच केली जाणार आहे. या कारची किंमत किती असेल? काय फीचर्स असतील? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कार खरेदीसाठी काही कारप्रेमींनी आपलं बजेटही सेट केलं आहे. ही कार लाँच होण्यासाठी अवघ्या तीन दिवसांचा अवधी शिल्लक असताना काही फीचर्स आणि किमतीबाबत माहिती समोर आली आहे. एका इंस्टाग्राम युजर्सने कंपनीला किमतीबाबत विचारणा केली होती. त्यावर कंपनीने रिप्लाय दिला आहे. हा रिप्लाय कंपनीच्या अधिकृत हँडलवरून करण्यात आला आहे. रिप्लायनुसार नेक्सॉन फेसलिफ्टची किंमतबाबत माहिती समोर येत आहे. त्यामुळे जुन्या नेक्सॉनपेक्षा फेसलिफ्ट वर्जन स्वस्त असेल असं सांगण्यात येत आहे.

टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट इव्हीची किंमत

रिपोर्टनुसार, टाटा नेक्सॉनत्या संभाव्य एक्स शोरुम किंमत 7.39 लाख रुपये असू शकते. जुलै 2023 मध्ये अपडेट केलेल्या किमतीनुसार बेस एक्सई पेट्रोल एमटीची एक्स शोरुम किंमत 8 रुपये असू शकते. ही किंमत असू शकते, असा अंदाज हे मात्र लक्षात ठेवा. त्यामुळे कंपनी 14 सप्टेंबरला अधिकृतरित्या किंमत जाहीर करेल. सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चेनंतर कंपनीने इंस्टाग्राम कमेंट डिलीट केलं आहे. टाटा नेक्सॉन इव्ही फेसलिफ्ट लाँच होताच महिंद्रा एक्सयुव्ही400, ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक आणि एमजी झेडएस इव्ही यांच्याशी स्पर्धा करेल.

टाटा नेक्सॉन फेसलिफ्टमध्ये काय असेल खासियत

टाटा नेक्सॉन दोन व्हेरियंटमध्ये येईल. यात लाँग रेंज (LR) आणि मिड रेंड (MR) यांचा समावेश असेल. लाँग रेंजमध्ये 40.5 किलोव्हॅट बॅटरी पॅकसह 465 किमी रेंज मिळेल. तसेच कमाल 142 बीएचपी पॉवर आणि 215 एनएम टॉर्क जनरेट करेल. मिड रेंजमध्ये 30 किलोव्हॅट बॅटरी पॅकसह येईल. ही बॅटरी एकदा चार्ज केली की 325 किमी रेंज देते. यात 127 बीएचपी पीक पॉवर आणि 215 एनएम टॉर्क जनरेट करते.

सध्याच्या व्हेरियंटमध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन ऑप्शन असेल. पेट्रोल युनिटला 5 स्पीड मॅन्युअल, 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक आणि एएमटी गियरबॉक्ससह जोडलेला असेल. डिझेलमध्ये 6 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आहेत.

टाटा नेक्सॉन फेसलिफ्टमध्ये मल्टिफंक्शनल दोन स्पोक स्टीयरिंग व्हील, व्हेंटिलेटेड सीट्स, एक वायरलेस चार्जर, दोन्ही बाजूला पार्किंग सेंसरसह 360 डिग्री कॅमेरा, ऑटोमॅटिक सनरुफ आणि एक मोठा 10.25 इंचाचा टचस्क्रिन सिस्टम आहे. हा सर्व प्रकारच्या कार कनेक्ट टेक्नोलॉजीला सपोर्ट करतो.

Non Stop LIVE Update
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?