नितीन गडकरींचा ‘सिक्सर’, लहान आणि स्वस्त कारमध्येदेखील 6 एअरबॅग्स देण्याचं कंपन्यांना आवाहन

रस्ते अपघातांना आळा घालण्याबरोबरच अपघातांमधील मृतांची संख्या कमी करण्यात वाहनांमधील सुरक्षा वैशिष्ट्ये मोठी भूमिका बजावतात. या प्रकरणात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी छोट्या कारमध्ये देखील चांगले सेफ्टी फीचर्स देण्याचा पुनरुच्चार केला आहे.

नितीन गडकरींचा 'सिक्सर', लहान आणि स्वस्त कारमध्येदेखील 6 एअरबॅग्स देण्याचं कंपन्यांना आवाहन

नवी दिल्ली : भारत सरकार वाहनांमध्ये प्रदान केलेल्या सुरक्षा वैशिष्ट्यांबाबत (सेफ्टी फीचर्स) अत्यंत सावध होत आहे. रस्ते अपघातांना आळा घालण्याबरोबरच अपघातांमधील मृतांची संख्या कमी करण्यात वाहनांमधील सुरक्षा वैशिष्ट्ये मोठी भूमिका बजावतात. या प्रकरणात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी छोट्या कारमध्ये देखील चांगले सेफ्टी फीचर्स देण्याचा पुनरुच्चार केला आहे. (Nitin Gadkari appeals to Vehicle companies to provide 6 airbags even in small and cheap cars)

नितीन गडकरी यांनी वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, लहान कार, ज्या बहुतांश निम्न मध्यमवर्गीय लोकांकडून विकत घेतल्या जातात, त्यांच्याकडेही पुरेशा संख्येने एअरबॅग असाव्यात. मला आश्चर्य वाटते की, ऑटोमेकर्स फक्त श्रीमंत लोकांनी खरेदी केलेल्या मोठ्या आणि महागड्या कारमध्येच 8 एअरबॅग का देतात?

गडकरींचं कारमध्ये 6 एअरबॅग्स देण्याचं आवाहन

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी यांनी एअरबॅग्सच्या विषयावर जोर दिला. ते म्हणाले की, लहान आणि स्वस्त कारमध्ये अधिक एअरबॅग प्रदान करणे आवश्यक आहे, ज्यामुळे अपघातांमध्ये संभाव्य मृत्यू रोखण्यात मदत होईल. बहुतेक मध्यमवर्गीय लोक लहान आणि स्वस्त कार विकत घेतात आणि जर त्यांच्या कारमध्ये एअरबॅग नसतील आणि अपघात झाले तर त्यात त्यांचा मृत्यू होऊ शकतो. अशा परिस्थितीत, मी सर्व कार उत्पादकांना आवाहन करतो की, कारच्या सर्व व्हेरिएंटमध्ये कमीतकमी 6 एअरबॅग प्रदान करा.

गडकरी म्हणाले की, एकीकडे तुम्ही महाग आणि लक्झरी कारमध्ये 8 एअरबॅग देत आहात, ज्या श्रीमंत वर्गाकडून खरेदी केल्या जातात आणि दुसरीकडे कमी किंवा मध्यमवर्गीय खरेदी करत असलेल्या स्वस्त आणि छोट्या कारमध्ये केवळ 2 किंवा 3 एअरबॅग दिल्या जातात. पण असे का?

लहान कारमध्ये एअरबॅग्स दिल्यास किंमत वाढणार!

गडकरींनी मात्र हेदेखील कबूल केले की, लहान कारमध्ये अतिरिक्त एअरबॅग पुरवल्यास त्यांच्या किंमतीत किंमत कमीतकमी 3,000 ते 4,000 रुपयांनी वाढ होऊ शकते, परंतु आपल्या देशात रस्ते अपघातांच्या बाबतीत प्रत्येकाला सुरक्षा मिळालीच पाहिजे.

नितीन गडकरी यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा वाहन उद्योगाला चिंता आहे की जास्त कर, उत्सर्जन निकष आणि कठोर सुरक्षा नियमांमुळे वाहनांच्या वाढलेल्या किंमती. गडकरींच्या या आवाहनानंतर लहान आणि स्वस्त कार्समध्येदेखील सहा एअरबॅग्स दिल्या तर या वाहनांच्या किंमती वाढणार आहेत.

6 एअरबॅग्सबाबत गडकरींचा पुनरुच्चार

नितीन गडकरी प्रवशांच्या सुरक्षेबाबत सातत्याने बोलत आहेत. याआधीदेखील त्यांनी 6 एअरबॅग्स देण्याबाबत वाहन कंपन्यांना आवाहन केले होते. गेल्या महिन्यात गडकरींनी याबाबत एक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, “प्रवाशांच्या सुरक्षेच्या हितासाठी, मी सर्व खासगी वाहन निर्मात्यांना आवाहन करतो की, वाहनाच्या सर्व प्रकार आणि विभागात किमान 6 एअरबॅग अनिवार्यपणे उपलब्ध करुन द्याव्यात.”

सर्व वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करण्याबाबत SIAM (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स) च्या बैठकीत चर्चा झाली. वाहनांच्या सुरक्षिततेला चालना देण्यासाठी अतिरिक्त एअरबॅग जोडण्याव्यतिरिक्त, फ्लेक्स-इंधन वाहनांच्या भविष्यावरदेखील चर्चा झाली. केंद्रीय मंत्र्यांच्या आणखी एका ट्विटनुसार, अशी वाहने 100 टक्के इथेनॉल आणि पेट्रोलवर चालण्यास सक्षम असतील आणि एका वर्षात उपलब्ध होतील. सध्या, भारतीय बाजारातील सर्व कारसाठी फक्त ड्रायव्हर-फ्रंट एअरबॅग अनिवार्य आहे.

31 डिसेंबरपासून ड्युअल फ्रंट एअरबॅग अनिवार्य

31 ऑगस्टची प्रारंभिक मुदत पुढे ढकलल्यानंतर, यावर्षी 31 डिसेंबरपासून ड्युअल फ्रंट एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. आपल्या बाजारपेठेत बहुतेक एंट्री लेव्हल वाहने आधीपासूनच स्टँडर्ड म्हणून दोन फ्रंट एअरबॅग्जसह येतात.

साइड आणि कर्टन एअरबॅग महाग आहेत आणि म्हणूनच सामान्यत: फक्त प्रीमियम मॉडेल्समध्येच त्या ऑफर केल्या जातात. तसेच, साइड एअरबॅग नसलेल्या कारचे पुन्हा कॅलिब्रेशन करणे आवश्यक आहे, जेणेकरून ही प्रणाली अखंडपणे चालू राहील. परंतु यामुळे खर्चात आणखी भर पडेल. निर्मात्यांनी त्यांच्या विद्यमान उत्पादनांच्या समाप्तीपर्यंत प्रतीक्षा करणे आणि नेक्स्ट जनरेशन मॉडेलमध्ये अतिरिक्त सुरक्षा तंत्रज्ञान (एक्स्ट्रा सिक्योरिटी टेक्नोलॉजी) जोडणे चांगले होईल.

अलीकडच्या काळात, आपण भारतातील कारच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना पाहिले आहे, मुख्यतः कच्चा माल आणि वाहतुकीच्या वाढलेल्या खर्चामुळे. शिवाय, ऑटोमोबाईल उद्योग अजूनही लॉकडाऊन-प्रेरित बाजारातील मंदीमधून सावरत आहे आणि कार उत्पादकांना किंमती वाढवण्यापूर्वी आणि संभाव्य ग्राहकांना दूर नेण्यापूर्वी काळजी घ्यावी लागेल.

मारुती सुझुकी, रेनॉल्ट आणि निसान सारख्या कार उत्पादकांकडे सध्या त्यांच्या रेंजमध्ये साइड किंवा कर्टन एअरबॅग असलेली कोणतीही वाहने नाहीत. टाटा, महिंद्रा, होंडा इत्यादी इतर काही उत्पादक त्यांच्या प्रीमियम मॉडेल्सच्या उच्च श्रेणींमध्ये अशा एअरबॅग्ज देतात.

इतर बातम्या

ओला इलेक्ट्रिक स्कूटरची कमाल! दोन दिवसांत तब्बल 1100 कोटींची कमाई

होंडा एन7एक्स मिडसाईज एसयुव्ही 21 सप्टेंबरला लॉन्च होणार, ह्युंडाई क्रेटा आणि किया सेल्टोससारख्या कारशी असेल स्पर्धा

PHOTO | डस्टर ते हॅरियर पर्यंतच्या बेस्ट मिडसाईज एसयूव्हीवर मोठी सवलत, जाणून घ्या तपशील

(Nitin Gadkari appeals to Vehicle companies to provide 6 airbags even in small and cheap cars)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI