आता कार धावतानाच बॅटरी चार्ज होणार, बोनेटवर असणार सोलर पॅनलची सोय
Nissan कंपनी सोलर पॅनलने सुसज्ज इलेक्ट्रीक कार Ariya चा कॉन्सेप्ट सादर केला आहे. ही कार सुर्याच्या प्रकाशाने बॅटरी चार्ज करु शकत असल्याने भविष्यात इलेक्ट्रीक कारच्या मार्केटमध्ये गेमचेंजर सिद्ध होऊ शकते.

जगभरात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत नवनवीन तंत्रज्ञानावर काम केले जात आहे. आता कारना केवळ अत्याधुनिकच नाही तर पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल आणि सस्टेनेबल देखील बनवले जात आहे. याच दिशेने आता जपानची निस्सान कंपनी काम करत आहे. जपानच्या Nissan ने ऑल-इलेक्ट्रिक SUV Ariya नावाचा खास कॉन्सेप्ट कार सादर केली आहे. ही कार सौर ऊर्जेवर धावणार आहे. सुर्याच्या ऊन्हावर ही कार आपली बॅटरी चार्ज करु शकते आणि सुमारे २२ किलोमीटर अतिरिक्त रेंज देण्यास सक्षम आहे. हे तंत्रज्ञान भविष्यातील इलेक्ट्रीक कारसाठी एक मोठे गेमचेंजर पाऊल मानले जात आहे.
कार धावत असताना बॅटरी चार्ज होणार
Nissan Ariya Solar Concept च्या कारचे छत,बोनेट आणि पाठच्या भागावर सुमारे ४१ चौरस फूट एरियात सोलर पॅनेल लावण्यात आले आहेत. हे पॅनल सुर्याच्या प्रकाशाला वीजेत रुपांतर करुन बॅटरीला चार्ज करत असतात. खास बाब म्हणजे हे सोलर पॅनल बाहेर जवळपास दिसत नाहीत. म्हणजे कारच्या डिझाईन आणि लुकवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. या टेक्नॉलॉजीला निसानला नेदरलँड्सची कंपनी IM Efficiency सोबत मिळून विकसित केले आहे. सोलर सेल्सला कार बॉडीत याला फिट केले जात आहे. यात एअरो डायनॅमिक्स आणि डिझाईन दोन्ही कायम रहाणार आहे. त्यामुळेच काही कॉन्सेप्ट कार दिसायला प्रोडक्शन मॉडेल Ariya सारखीच दिसत आहे.
भविष्यातील EV टेक्नोलॉजीची झलक
निसानचा हा प्रयोग यासाठी खास आहे कारण कंपनी आता पाहू इच्छीत आहे की हिडन सोलर पॅनल लावल्यानंतर कारच्या लुक आणि कामगिरीवर काय परिणाम होतो याची कंपनी चाचपणी करीत आहे. हे तंत्रज्ञान भविष्यात रेंज एंग्जायटीला कमी करु शकते. कारण कार कार उभी असताना आणि धावत असताना आपोआप बॅटरी चार्ज होणार आहे.
Nissan Ariya: फीचर्स आणि रेंज
Nissan Ariya कंपनीची सर्वात प्रीमीयम आणि एडव्हान्स इलेक्ट्रीक क्रॉसओव्हर सुव्ह आहे. यात 63 kWh पासून ते 87 kWh पर्यंत बॅटरी सपोर्ट मिळणार आहे. जी एकदा चार्ज झाल्यानंतर सुमारे 600 किमी पर्यंत रेंज देण्यास सक्षम आहे. यात निसानची खास e-4ORCE ऑल-व्हील ड्राईव्ह टेक्नोलॉजी, कूपे-स्टाईल डिजाईन, लक्झरी इंटेरिअर, दोन 12.3-इंचाचा डिजिटल स्क्रीन, लेव्हल-2 ADAS आणि 360-डिग्री कॅमरा सारखे फिचर्स देण्यात आले आहे.
भारतात लाँच होण्याची शक्यता
Nissan Ariya ची भारतात आधीच टेस्टींग पाहिली गेली आहे. जर भविष्यात भारतात ही कार लाँच झाली तर तिची काम सुमारे 60 लाख ते 80 लाखाच्या दरम्यान असू शकते. सोलर पॅनल सारखी टेक्नोलॉजी जर प्रोडक्शन मॉडलपर्यंत पोहचली तर ही भारतीय ईव्ही बाजारासाठी गेम- चेंजर सिद्ध होऊ शकते.
