AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत टाटाच्या ‘या’ EV ची जोरदार क्रेझ, अवघ्या काहीच दिवसांत बुकिंग्सचं शतक

अलीकडेच लॉन्च झालेली टाटा टिगॉर ईव्ही (Tata Tigor EV) ही भारतातील सर्वात स्वस्त मास मार्केट इलेक्ट्रिक कार आहे. ही कार महाराष्ट्रातील ईव्ही पॉलिसी अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनांमुळे अधिक परवडणारी बनली आहे.

मुंबईत टाटाच्या 'या' EV ची जोरदार क्रेझ, अवघ्या काहीच दिवसांत बुकिंग्सचं शतक
| Edited By: | Updated on: Sep 14, 2021 | 8:44 PM
Share

मुंबई : अलीकडेच लॉन्च झालेली टाटा टिगॉर ईव्ही (Tata Tigor EV) ही भारतातील सर्वात स्वस्त मास मार्केट इलेक्ट्रिक कार आहे. ही कार महाराष्ट्रातील ईव्ही पॉलिसी अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनांमुळे अधिक परवडणारी बनली आहे. या प्रोत्साहनांमुळे Tigor EV ची किंमत सुमारे 2.30 लाख रुपयांनी कमी होऊ शकते. या EV धोरणाच्या अंमलबजावणीनंतर महाराष्ट्रात Nexon EVs ची जोरदार मागणी पाहिली. त्यानंतर टिगॉरलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. नवीन Tigor EV ला एकट्या मुंबईतून 100 हून अधिक बुकिंग मिळाल्या आहेत. इलेक्ट्रिक सेडानची डिलिव्हरी ऑक्टोबर 2021 च्या मध्यापर्यंत सुरू होणार आहे. (Over 100 Tata Tigor EVs booked in Mumbai alone)

महाराष्ट्रातील नवीन EV धोरणानुसार, सर्व इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना बॅटरी क्षमतेसाठी 5,000 रुपये प्रति kWh इतका बेसिक इंसेंटिव्ह मिळेल, जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये प्रोत्साहन मिळेल. याचा अर्थ Tigor EV च्या 26kWh बॅटरी पॅकला 1.30 लाख रुपयांचे प्रोत्साहन मिळेल. तसेच, खरेदीदारांना EVs मध्ये स्विच करण्याची विनंती करण्यासाठी, 31 डिसेंबर 2021 पूर्वी नोंदणी केलेल्या सर्व कार अर्ली बर्ड इन्सेन्टिव्हसाठी पात्र असतील, ज्यामुळे मूळ किमतीवर आणखी 1 लाख रुपयांची सूट मिळते.

Tigor EV च्या सर्व व्हेरिएंटवर 2.30 लाखांची सूट

Tigor EV ग्राहकांना वर्षाच्या अखेरपर्यंत इलेक्ट्रिक सेडानच्या सर्व प्रकारांवर एकूण 2.3 लाख रुपयांची सूट मिळेल. ही ऑफर ग्राहकांना अधिक आकर्षित करेल. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की Xpres -T – Tigor EV चे व्हेरिएंट जे फ्लीट ऑपरेटर्सना विकले जाते, त्यावर 2.07 लाख रुपयांपर्यंत सूट (16,5kWh मॉडेलवर 82,500 रुपयांची सबसिडी आणि 1.07 लाख रुपये 21.5kWh मॉडेलवर) मिळेल. सोबत अर्ली बर्ड इन्सेन्टिव्ह म्हणून 1 लाख रुपयांचे अनुदान देखील मिळेल.

Tata Tigor EV Ziptron टाटाची सर्वात परवडणारी मास मार्केट ईव्ही आहे, या सवलतींसह टिगॉर ईव्ही सर्वात स्वस्त ईव्ही म्हणून स्वतःला सिद्ध करते. तथापि, हे लक्षात घेण्यासारखे आहे की पेट्रोल-ऑपरेटेड एक्वीवेलेंट अजूनही खूपच कमी खर्चिक आहे, कारण मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 5.65-7.27 लाख रुपये आहे आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत 6.80-7.82 लाख रुपये (एक्स-शोरूम, भारत) इतकी आहे.

2021 Tata TIgor EV: पॉवरट्रेन आणि चार्जिंग डिटेल्स

नवीन Tigor EV ला पॉवर देण्यासाठी टाटाची Ziptron हाय-व्होल्टेज आर्किटेक्चर आहे जी एक स्टेबल मॅग्नेटिक सिंक्रोन्स इलेक्ट्रिक मोटर वापरते. जी मोटर 75 एचपी पॉवर आणि 170 एनएम टॉर्क जनरेट करते. हे 26kWh लिथियम-आयन युनिट बॅटरी पॅकसह येते, ज्याला इलेक्ट्रिक मोटरसह IP67 वॉटर आणि डस्टप्रूफिंग स्टँडर्डनुसार रेट केले जाते. नवीन Ziptron Tigor EV 306 किमी रेंज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. Tigor EV मध्ये फास्ट चार्जिंग क्षमता आहे आणि फक्त 60 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज करता येते.

इतर बातम्या

महिंद्राच्या शानदार SUV वर 2.63 लाखांचा डिस्काऊंट, ऑफरबद्दल सर्वकाही जाणून घ्या

Yamaha ची शानदार फेस्टिव्ह ऑफर, ग्राहकांना 1 लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी

Royal Enfield च्या ग्राहकांना झटका, Meteor 350 नंतर आता ‘या’ बाईकची किंमत वाढली

(Over 100 Tata Tigor EVs booked in Mumbai alone)

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....