AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

E85 Fuel Launch : रेग्युलर पेट्रोलपेक्षा 20 रुपये स्वस्त E85 फ्यूल लॉन्च, पेट्रोल-डिझेलच्या संकटात एक समाधान देणारी बातमी

E85 Fuel Launch : अमेरिका-इराणमधील तणावामुळे पेट्रोल-डिझेलच्या आयातीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने आता E85 फ्यूल लॉन्च केलं आहे. रेग्युलर पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त असलेलं हे इंधन काय आहे, ते समजून घ्या.

E85 Fuel Launch : रेग्युलर पेट्रोलपेक्षा 20 रुपये स्वस्त E85 फ्यूल लॉन्च, पेट्रोल-डिझेलच्या संकटात एक समाधान देणारी बातमी
E85 Fuel LaunchImage Credit source: X/HardeepSPuri
| Updated on: Jun 06, 2026 | 11:16 AM
Share

E85 Petrol Price : देशात आता हाय-इथेनॉल फ्यूलची अधिकृत विक्री सुरु झाली आहे. हे एक मोठं पाऊल आहे. E85 ला पारंपारिक पेट्रोल-डिझेलला पर्यायी इंधन मानलं जात आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिल्लीच्या पुसा रोडवरील इंडियन ऑइल आउटलेट येथे पहिल्या E85 फ्यूल स्टेशनचं उद्घाटन केलं. देशात पहिली फ्लेक्स फ्यूल कार सुद्धा लॉन्च झाली आहे. नवीन E85 इंधन पेट्रोलपेक्षा स्वस्त दरात मिळेल.

दिल्लीत E85 फ्यूलचा प्रति लीटर दर 82.12 रुपये आहे. विद्यमान E20 पेट्रोलच्या तुलनेत हे फ्यूल प्रति लीटर 20 रुपये स्वस्त आहे. पेट्रोल पंपावर वाहन चालकांचा गोंधळ उडू नये यासाठी E85 फ्यूलला वेगळं ब्रांडिंग आणि स्पेशल लेबलसह सादर केलं आहे. कमी किंमतीमुळे वाहन चालकांसाठी इंधनाचा हा पर्याय आकर्षक ठरु शकतो. E85 हाय-इथेनॉल फ्यूलसाठी तशा पद्धतीचं वाहन गरेजचं आहे. सध्या आशा वाहनांची संख्या कमी आहे.

हे इंधन आर्थिक आर्थिक दृष्ट्‍या परवडणारं का आहे ?

सध्या देशात E20 पेट्रोल मध्ये 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोल असतं. E85 फ्यूल मध्ये 85 टक्के इथेनॉल आणि केवळ 15 टक्के पेट्रोल आहे. इथेनॉलच्या अधिक उपयोगामुळे पेट्रोलचा वापर कमी होईल आणि कच्चा तेलावरील अवलंबित्व सुद्ध घटेल. ऊस, मका आणि तांदळापासून इथेनॉलची निर्मिती केली जाते. म्हणून आर्थिक दृष्ट्‍या हे परवडणारं इंधन आहे.

सरकारची या इंधनासाठी किती स्टेशन्स उभारणार?

देशाची राजधानी दिल्लीत पुसा रोड आउटलेट येथे पहिलं E85 स्टेशन आहे. सरकारची या इंधनासाठी मोठी योजना आहे. सुरुवातीच्या टप्प्यात दिल्ली-एनसीआर आणि मुंबई-पुणे-नागपूर कॉरिडोरमध्ये 50 ते 100 E85 स्टेशन लावण्यात येतील. यावर्षाच्या अखेरपर्यंत 500 स्टेशन्सच नेटवर्क तयार करण्याचं लक्ष्य ठरवण्यात आलय. 2027 च्या अखेरपर्यंत देशातील प्रमुख शहरांमध्ये जवळपास 5000 पेक्षा अधिक E85 फ्यूल स्टेशन सुरु करण्याची सरकारची योजना आहे.

E85 फ्यूलसाठी कसं वाहन हवं?

E85 फ्यूल हे प्रत्येक वाहनासाठी नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. E85 कम्पलायंट इंजिन असलेल्या वाहनांमध्येच या फ्यूलचा वापर करता येईल. यासाठी विशेष डिझाइन केलेल्या कॅलिब्रेट फ्लेक्स-फ्यूल वाहनांची आवश्यकता आहे. भारतात सध्या काहीच फ्लेक्स-फ्यूल वाहन उपलब्ध आहेत.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु