आली शॉटगन, रॉयल एनफिल्डने आणले वादळ, जाणून घ्या किंमत काय

Royal Enfield Shotgun 650 | तरुणाईला रॉयल एनफिल्डने वेड लावले आहे. पण रॉयल एनफिल्डला बाजारात जावा, येज्ज्ञी, यामाहाच नाही तर आता होंडाने पण आव्हान दिले. त्यामुळे बाजारात आता शॉटगन 650 ही दमदार बाईक उतरवली आहे. त्यामुळे बाजारात आता नवीन वादळ आलं आहे.

आली शॉटगन, रॉयल एनफिल्डने आणले वादळ, जाणून घ्या किंमत काय
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 3:44 PM

नवी दिल्ली | 26 नोव्हेंबर 2023 : प्रीमियम मोटारसायकल कंपनी रॉयल एनफिल्डने पुन्हा बाजारात वादळ आणलं आहे. रॉयल एनफिल्डने तरुणाईसाठी खास दमदार बाईकचे युग आणले. देशात एकेकाळी बुलेटची क्रेझ होती. मध्यंतरी स्पोर्ट्स बाईक आणि इतर बाईकने हे युग जणू संपवले. पण जावा, येज्ज्ञी, यामाहा या कंपन्या जणू गायब झाल्या. पण रॉयल एनफिल्डने आधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक डिझाईन, खास रंगसंगती आणि विविध बदलाने दमदार बाईकचे युग पुन्हा खेचून आणले. तरुणाई त्यावर फिदा झाली. आता अनेक कंपन्या या मैदानात उतरल्या आहेत. नवीन रॉयल एनफिल्ड शॉर्टगन 650 ने बाजारात वादळ आणले आहे.

दोन नवीन दमदार बाईक

रॉयल एनफिल्डने वार्षिक रायडर्स इव्हेंट मोटोवर्समध्ये हिमालयन 450 सह शॉर्टगन 650 लाँच केले. शॉर्टगन 650 च्या विशेष एडिशन लाँच करण्यात आली आहे. मोटोवर्स एडिशन नावाने त्या बाईकची ओळख आहे. त्याचे उत्पादन कमी असेल. पण या बाईकविषयीची चर्चा रंगली आहे. तिचे फीचर्स, किंमत किती याविषयीची माहिती बाईकप्रेमींना हवी आहे.

हे सुद्धा वाचा

शॉर्टगन 650 मोटोवर्स एडिशन

HT Auto चा एक रिपोर्ट समोर आला आहे. रॉयल एनफिल्ड शॉर्टगन 650 मोटोवर्स एडिशन खरेदी करण्यासाठी एक अट घालण्यात आली आहे. ज्या लोकांनी मोटोवर्स एडिशन 2023 मध्ये सहभाग घेतला आहे. नाव नोंदवले आहे. त्यांनाच 650 मोटोवर्स एडिशन खरेदी करता येईल. या बाईकचे केवळ 25 युनिट्सची विक्री करण्यात आली आणि लकी ड्रॉ अतंर्गत ती खरेदी करता येईल.

शॉर्टगन 650 मोटोवर्स एडिशनमध्ये काय खास

शॉर्टगन 650 मोटोवर्स एडिशन एकदम खास मोटरसायकल आहे. यामध्ये स्वतंत्र आणि खास रंगसंगती आणि आकर्षक डिझाईन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य दुचाकीपेक्षा ती खास दिसेल. या दुचाकीला पेंट जॉबच्या मशीनने रंग देण्यात आले नाही. तर हाताने रंग देण्यात आला आहे. या मोटरसायकलला रॉयल एनफील्ड सुपर मीटियर 650 चे इंजिन बसविण्यात आले आहे. त्याला 6 स्पीड गियरबॉक्सचा उपयोग करण्यात आला आहे. या बाईकची किंमत 4.25 लाख रुपये एक्स-शोरूम आहे.

पुढील वर्षी शॉर्टगन 650 मैदानात

सर्वसामान्य ग्राहकांना ही बाईक कधी बाजारात येईल आणि त्याला रपेट करायला मिळेल याची उत्सुकता लागली आहे. शॉर्टगन 650 ही बाईक सर्वसामान्य ग्राहकांसाठी पुढील वर्षी बाजारात येईल. नवीन शॉर्टगन 650 चे व्हर्जनची किंमत आलेली नाही. पण एका अंदाजानुसार, कॉन्टिनेंटल जीटी 650 आणि सुपर मीटियर 650 या मॉडेलच्या किंमतीदरम्यान शॉर्टगन 650 ची किंमत असू शकेल.​

Non Stop LIVE Update
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.