Royal Enfield च्या ‘या’ स्वस्त आणि मस्त बाइकला जबरदस्त मागणी, सहा महिन्यात 1 लाख युनिट्सची विक्री

या गाडीनं रस्त्यावर फेरफटका मारणं म्हणजे एक शान समजली जाते. कारण कंपनीच्या गाड्यांनी आपला रुबाबी थाट गेल्या काही वर्षांपासून कायम ठेवला आहे. आता कंपनीनं गेल्या सहा महिन्यात आणखी एक विक्रम केला आहे.

Royal Enfield च्या 'या' स्वस्त आणि मस्त बाइकला जबरदस्त मागणी, सहा महिन्यात 1 लाख युनिट्सची विक्री
क्या बात है! Royal Enfield ची जबरदस्त भरारी, या गाडीनं सहा महिन्यात गाठला 1 लाखांचा टप्पाImage Credit source: Royal Enfield
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 7:21 PM

मुंबई : रॉयल एनफिल्डच्या बाइकची तरुणांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. या गाडीनं रस्त्यावर फेरफटका मारणं म्हणजे एक शान समजली जाते. कारण कंपनीच्या गाड्यांनी आपला रुबाबी थाट गेल्या काही वर्षांपासून कायम ठेवला आहे. आता कंपनीनं गेल्या सहा महिन्यात आणखी एक विक्रम केला आहे. चेन्नई स्थित इंडियन मोटरसायकल कंपनी रायल एनफिल्डनं माहिती देत सांगितलं आहे की, हंटर 350 च्या 1 लाख युनिट्सची विक्री झाली आहे. गाडी लाँच केल्यानंतर सहा महिन्यांच्या आतच हंटर 350 ने हा विक्रम प्रस्थापित केला आहे. हंटर 350 ही रॉयल एनफिल्डची दुसरी सर्वात स्वस्त बाइक आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत 1.50 लाखांपासून सुरु होते. ही बाइक रेट्रो, मेट्रो आणि मेट्रो रेबेल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. मेट्रो हंटर 350 ची किंमत 1.64 लाखांपासून सुरु होते. तर मेट्रो रेबेलची एक्स शोरुम किंमत 1.69 इतकी आहे.

रॉयल एनफिल्ड हंटर 350 ची मागणी भारतातच नाही तर इंडोनेशिया, जापान, कोरिया, थायलँड, फ्रान्स, जर्मनी, इटली, युनाइटेड किंगडम, अर्जेंटिना, कोलंबिया, मॅक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारात आहे. या इंडियन बाइकला मोटरसायकल ऑफ द ईयर 2023 हा अवॉर्ड देखील मिळाला आहे.

रॉयल एनफिल्ड हंटर 350 मध्ये 349 सीसी सिंगल सिलेंडर एअर अँड कूल एसओएचसी फ्युल इंजेक्टेड इंजिन पॉवर मिळते. या बाइकला 5 स्पीड ट्रान्समिशन दिले आहेत. ही बाइक लाँच झाल्यानंतर चार महिन्यातच 50 हजार युनिट्सची विक्री झाली होती.

रॉयल एनफिल्ड हंटर 350 रेट्रो ट्रिम सोडल्यास इतर व्हेरियंटमध्ये ट्युबलेस टायर आणि ब्लॅक अलॉय व्हिल देण्यात आलं आहे. स्वस्त आणि मस्त बाइक असल्याने ग्राहकांचीही पसंती आहे. यामुळे गाडीची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.