महिंद्रा Scorpio N आणि Scorpio Classic यापैकी एक घ्यायची आहे ? जाणून घ्या दोघांमधील फरक

महिंद्राच्या स्कॉर्पिओ एसयुव्हीची सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे कंपनीने ग्राहकांची गरज ओळखून स्कॉर्पिओ एन न्यू जनरेशन गाडी नुकतीच लाँच केली आहे. त्याचबरोबर कंपनीने स्कॉर्पिओ क्लासिस ही गाडी अपडेट केली आहे.

महिंद्रा Scorpio N आणि Scorpio Classic यापैकी एक घ्यायची आहे ? जाणून घ्या दोघांमधील फरक
Scorpio N vs Scorpio Classic या महिंद्राच्या दोन गाड्यांपैकी कोणती बेस्ट ? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवरImage Credit source: Mahindra
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 6:40 PM

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्राच्या एसयुव्ही गाड्यांची भारतीय बाजारपेठेत चांगली पकड आहे. ग्राहकांची पसंती गाड्यांना मिळत असल्याने कंपनी एकापेक्षा एक गाड्या बाजारात सादर करत असते. असं पाहिलं तर महिंद्राच्या स्कॉर्पिओ एसयुव्हीची सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे कंपनीने ग्राहकांची गरज ओळखून स्कॉर्पिओ एन न्यू जनरेशन गाडी नुकतीच लाँच केली आहे. त्याचबरोबर कंपनीने स्कॉर्पिओ क्लासिस ही गाडी अपडेट केली आहे. दोन्ही गाड्यांची भारतीय बाजारात मागणी आहे. त्यामुळे या दोन गाड्यांपैकी कोणती गाडी निवडावी असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. चला आज किंमत, साइज, स्पेस, बूट स्पेस, सर्व्हिस, मायलेज,फीचर्स, कलर आणि इतर स्पेशिकशनच्या आधारे दोन्ही गाड्यांची तुलना करुयात. म्हणजे तुम्हाला दोन पैकी एक गाडी निवडणं सोपं होईल.

Scorpio N vs Scorpio Classic लूक आणि स्पेसिफिकेशन

दोन्ही गाड्या दिसण्यास आकर्षक आहेत यात काही शंका नाही. क्लासिकचं डिझाईन जुन्या स्कॉर्पिओच्या आधारावर आहे. तर नव्या डिझाईनसह स्कॉर्पिओ एन सादर करण्यात आली आहे. पण असं असलं तरी काही एलिमेंट जुन्या स्कॉर्पिओसारखे आहेत. यात साईड हिंग्ड टेलगेट आणि किनकेड रुफचा समावेश आहे. स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. 2.2 लिटर युनिटची उत्पादन क्षमता 130 बीएचपी 3650 आरपीएम आणि पीक टॉर्क आउटपूट 300 एनएम 1600 ते 2800 आरपीएमवर आहे. हे इंजिन 6 स्पीड गियरबॉक्सला जोडलेलं आहे.

दुसरीकडे स्कॉर्पिओ एन हे मॉडेल 2.2 डिझेल इंजिन प्रोड्युस 172 बीएचपी 3500 आरपीएम आणि पीक टॉर्क आउटपूट 370 एनएम 1500 ते 3000 आरपीएमवर जनरेट करते. जर तुम्ही सहा स्पीड टॉर्क कन्व्हर्टर घेतलं तर टॉर्क आउटपूट 400 एनएमने वाढेल. या माध्यमातन 1750 ते 2750 आरपीएम उर्जा जनरेट होईल. हे इंजिन 4×4 ड्राईव्हट्रेनवर ट्यून केलं आहे. या गाडीचं लोअर व्हेरियंट 130 बीएचपी पॉवर 3750 आरपीएमवर आणि पीक टॉर्क आउटपूट 300 एनएम 1500 ते 3000 आरपीएमवर जनरेट होतो. यामध्ये 2.0 टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन सुद्धा आहे. यातून 200 बीएचपी पॉवर 5000 आरपीएम आणि पीक टॉर्क आउटपूट 370 किंवा 380 एनएमच्या मध्ये 1750 ते 3000 आरपीएमवर पॉवर जनरेट करतं. हे पण 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टरवर अवलंबून आहे.

Scorpio N vs Scorpio Classic फीचर्स

फीचर्सच्या बाबती स्कॉर्पिओ एन उजवी ठरते. यामध्ये मॉडर्न फीचर्स देण्यात आले आहेत. यात एलईडी प्रोजेक्टर हेडलँप, एलईडी टेल लँप, इलेक्ट्रिक सनरूफ, मागच्या बाजूला एसीचं व्हेंट, 8 इंचाची टचस्क्रिन एन्फोटेंनमेंट सिस्टमसह अँड्रॉईड ऑटो आणि अॅप्पल कारप्ले सपोर्ट, क्रूझ कंट्रोल, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी आहे. दुसरीकडे स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये हेलोजन प्रोजेक्टर हेडलँप, 9.0 इंच टचस्क्रिन, रियर पार्किंग कॅमेरा, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मागच्या बाजूला एसी व्हेंट्स आणि क्रूझ कंट्रोल आहे.

Scorpio N vs Scorpio Classic किंमत

स्कॉर्पिओ क्लासिकची किंमत 12.64 लाखांपासून सुरु होते. तर एस व्हेरियंट एस 11 ट्रिमची किंमत 16.14 लाखापर्यंत जाते. दुसरीकडे, स्कॉर्पिओ एनची किंमत 12.74 लाखांपासून सुरु होते आणि 24.05 लाखांपर्यंत (एक्स शोरुम) जाते.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.