Tata EVs | आताच बुकिंग करा! स्वस्तात टाटाच्या इलेक्ट्रिक कार मिळवा

Discount on Tata EVs | टाटा मोटर्स आता नव्या उमेद्दीने बाजारात उतरली आहे. लवकरच कार आणि व्यावसायिक वाहनांसाठी अशा दोन कंपन्या वेगळ्या तयार करण्यात येत आहे. ग्राहकांना इलेक्ट्रिक कारवर मोठी सवलत देण्यात येत आहे. टाटा नेक्सन ईव्ही, टियागो आणि टिगोरवर ही सवलत मिळेल.

Tata EVs | आताच बुकिंग करा! स्वस्तात टाटाच्या इलेक्ट्रिक कार मिळवा
मिळवा बंपर सूट, अशी होईल बचतImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 09, 2024 | 2:34 PM

नवी दिल्ली | 9 March 2024 : टाटा मोटर्स आता नव्या जोमाने आणि दमाने बाजारात उतरणार आहे. प्रवाशांसाठी आणि व्यावसायिक वाहनांसाठी आता दोन कंपन्या अस्तित्वात येणार आहे. टाटा मोटर्स या मार्च महिन्यात टाटा पंच ईव्ही सोडून इतर सर्व इलेक्ट्रिक कारवर आकर्षक सूट आणि इतर फायदे देत आहे. ही ऑफर खास करुन 2023 मध्ये उत्पादित कारांवर देत आहे. स्टॉक संपविण्यासाठी टाटा मोटर्सने खास ऑफर आणली आहे. यामध्ये नेक्सन ईव्ही, टियागो ईव्हीच्या नवीन 2024 मधील मॉडेलचा समावेश आहे.

दोन सेगमेंटमध्ये विभागणी

टाटा मोटर्सच्या बोर्डाने केलेल्या घोषणेनुसार, आता व्यवसायाचे दोन भाग होतील. यामध्ये एक भाग व्यावसायिक वाहनांसाठी असेल. त्यात बस, ट्रक, छोटा हाथी यांच्यासह इतर वाहनांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. तर दुसरे सेगमेंट पॅसेंजर व्हेईकलवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. यामध्ये पेट्रोल-डिझेल कार, इलेक्ट्रिक कार आणि कंपनीचे भविष्यातील प्रकल्पाचा समावेश आहे. त्याचा शेअरधारकांना फायदा होईल.

हे सुद्धा वाचा

टाटा नेक्सन ईव्हीवर मोठी सवलत

  • टाटा डिलर नेक्सन ईव्हीची प्री-फेसलिफ्ट इलेक्ट्रिक एसयुव्हीची अनसोल्ड 2023 मधील कारवर सवलत देत आहे. नेक्सन ईव्हीवर 2.30 लाख रुपयांपर्यंत सवलत आणि 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. तर नेक्सन ईव्ही मॅक्सवर 2.65 लाख रुपयांची रोख सवलत आणि 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळते. ही ऑफर कारच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे.
  • 30.2kWh बॅटरीसह MR आणि 40.5kWh बॅटरीसह LR अशा दोन व्हेरिएंटमध्ये नेक्सन ईव्ही उपलब्ध आहे. 2023 मध्ये उत्पादित नेक्सन ईव्हीच्या सर्व व्हेरिएंटवर 50,000 रुपयांचे ग्रीन बोनस आणि 2024 मधील मॉडलवर 20,000 रुपयांचा ग्रीन बोनस आहे.

टाटा टियागो ईव्हीवर सवलत

टियागो ईव्हीच्या MY2023 कारवर 65,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळतो. यामध्ये 50,000 रुपयांचा ग्रीन बोनस आणि 15,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळते. तर नवीन 2024 मॉडलवर 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे.

टाटा टिगोर ईवीवर सूट

टाटा टिगोरवर एकूण 1.05 लाख रुपयांपर्यंतची सवलत देण्यात येत आहे. यामध्ये 75,000 रुपयांची रोख सवलत, तर विविध व्हेरिएंटवर 30,000 रुपयांचे एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. अर्थात ही सवलत MY2023 मॉडलवरच उपलब्ध आहे. टिगोर ईवी मध्ये 26kWh बॅटरीपॅकसह 315 किमीची ARAI प्रमाणित रेंजचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये इलेक्ट्रिक मोटर 75hp आणि 170Nm चे आऊटपुट जेनरेट होते.

Non Stop LIVE Update
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका.
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात.
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ.
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?.
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?.
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.