टाटा मोटर्सनेही गाड्यांच्या किंमती वाढवल्या, 1 जानेवारीपासून नव्या किंमती लागू

नव्या वर्षात जर तुम्ही गाडी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे.

टाटा मोटर्सनेही गाड्यांच्या किंमती वाढवल्या, 1 जानेवारीपासून नव्या किंमती लागू

मुंबई : नव्या वर्षात जर तुम्ही गाडी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून दररोज एक नवी कंपनी घोषणा करतेय की ते नव्या वर्षात जानेवारीपासून गाड्यांच्या किंमती वाढवणार आहेत. नुकतीच टाटा मोटर्सने (Tata Motors) जानेवारीपासून त्यांच्या कमर्शियल व्हेईकल्सच्या (व्यावसायिक वाहनांच्या) किंमती वाढवण्याबाबतची घोषणा केली आहे. कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली वाढ, चलन विनिमय दराचा परिणाम आणि बीएस-6 उत्सर्जन मानकांमध्ये करण्यात आलेले बदल या सर्व कारणांमुळे गाड्यांच्या किंमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. (Tata Motors to increase commercial vehicle prices from January 2021)

टाटा मोटर्सने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की, कच्च्या मालाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे वाहनांचा निर्मिती खर्च (उत्पादन खर्च) वाढला आहे. त्याचा अंशतः प्रभाव कमी करण्यासाठी वाहनांच्या किंमती सुधारणे अपरिहार्य झाले आहे. आमच्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती 1 जानेवारी 2021 पासून वाढतील. वाहनांची किंमती किती प्रमाणात वाढवायच्या हे मॉडेल, इंधन प्रकार आणि इंजिनांच्या पर्यायांवर अवलंबून असेल.

BMW कंपनीनेदेखील कार्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने म्हटलं आहे की, 4 जानेवारीपासून ते त्यांच्या प्रत्येक मॉडेलच्या किंमतीत 2 टक्क्यांनी वाढ करणार आहेत. वाहनांच्या किंमती वाढवण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता कंपनीने म्हटलं आहे की, इनपूट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे वाहनांच्या किंमतीत वाढ करावी लागत आहे. BMW ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावाह म्हणाले की, 4 जानेवारी 2021 पासून BMW ग्रुप इंडिया वाहनांच्या नव्या किंमती लागू करणार आहे. इनपूट कॉस्टमध्ये झालेल्या वाढीमुळे आम्ही दोन गाड्यांच्या किंमतीत दोन टक्क्यांची वाढ करत आहोत.

टाटा आणि बीएमडब्ल्यूसह मारुती सुझुकी, होंडा, रेनॉ, महिंद्रा, फोर्ड या कंपन्यांसह इतरही अनेक वाहन कंपन्यांनी वाहनांच्या किंमतीत वाढ केली आहे. टू व्हीलर मेजर हिरो मोटोकॉर्पनेदेखील घोषणा केली आहे की, ते 1 जानेवारी 2021 पासून त्यांच्या प्रत्येक गाडीच्या किंमतीत 1500 रुपयांची वाढ करणार आहेत. या सर्व वाहन कंपन्यांच्या यादीत एका लक्झरी ब्रँडचाही समावेश आहे. ऑडी कंपनीनेही वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी ऑडी कंपनीच्या कार्सच्या किंमतीत वाढ केली जाणार आहे. परंतु कंपनीने अद्याप कोणत्या मॉडेल्सच्या किंमतीत वाढ केली जाणार आहे, हे अद्याप जाहीर केलेले नाही.

संबंधित बातम्या

नियम बदलले! चारचाकी गाड्या वापरताय; मग कंपन्यांना हे फीचर्स द्यावेच लागणार

Maruti Suzuki चा भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ, ‘या’ कारची देशात सर्वाधिक विक्री

(Tata Motors to increase commercial vehicle prices from January 2021)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI