पुढच्या आठवड्यापासून Tata Punch चे बुकिंग्स सुरु, कारमध्ये नेक्सॉनचं ‘हे’ जबरदस्त फीचर्स मिळणार

टाटा पंच मायक्रो एसयूव्ही पुढील आठवड्यापासून बुकिंगसाठी उपलब्ध होईल. कार निर्मात्या कंपनीने पुष्टी केली आहे की, बुकिंग अधिकृतपणे 4 ऑक्टोबर रोजी सुरु होणार आहे.

पुढच्या आठवड्यापासून Tata Punch चे बुकिंग्स सुरु, कारमध्ये नेक्सॉनचं 'हे' जबरदस्त फीचर्स मिळणार
Tata Punch
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 1:58 PM

मुंबई : टाटा पंच मायक्रो एसयूव्ही पुढील आठवड्यापासून बुकिंगसाठी उपलब्ध होईल. कार निर्मात्या कंपनीने पुष्टी केली आहे की, बुकिंग अधिकृतपणे 4 ऑक्टोबर रोजी सुरु होणार आहे. टाटा मोटर्सने अद्याप बुकिंगच्या रकमेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. त्याऐवजी, त्यांनी आगामी मायक्रो एसयूव्हीच्या अधिक फीचर्सचा खुलासा करण्यास सुरवात केली आहे. (Tata Punch bookings to open next week)

कार निर्मात्या कंपनीने आपल्या सोशल मीडिया चॅनल्सवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात म्हटले आहे की, पंचचे दरवाजे 90 अंशांच्या कोनात उघडतील. या सुविधेमुळे लोकांना वाहनातून आत किंवा बाहेर जाणे सोपे होईल.

कशी आहे नवी टाटा पंच

नवीन टाटा पंच ALFA-ARC (Agile Light Flexible Advanced Architecture) वर बनवलेली पहिली SUV असेल आणि भारतातील Nexon subcompact SUV च्या खाली असेल. पंचमध्ये कंपनीच्या इम्पॅक्ट 2.0 डिझाइन लँग्वेजचा वापर करण्यात आला आहे. ही कार आक्रमक स्टायलिंग लूकसह येते. टाटा मोटर्सने आधीच निळ्या आणि ड्युअल-टोन रंगाचे पर्याय जाहीर केले आहेत आणि सिंगल टोन रंगांसह आणखी दोन-टोन पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. “सणासुदीच्या काळात ही कार नॅशनल लाँचिंगसाठी सज्ज आहे. टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, स्पोर्टिंग डायनॅमिक्ससह टफ यूटिलिटीचं मिश्रण या कारमध्ये पाहायला मिळेल.

टाटा मोटर्सने पुष्टी केली आहे की, पंच आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या अपोझिट जॅक-अप हॅचबॅकपेक्षा अधिक श्रेष्ठ असेल आणि या एसयूव्हीमध्ये अनेक दमदार फीचर्स असतील. कंपनीने सूचित केले आहे की, या कारमध्ये काही सेगमेंट-फर्स्ट फीचर्स मिळतील जसे की, ट्रॅक्शन मोड (सँड, रॉक, मड), हिल डिसेंट कंट्रोल आणि हिल स्टार्ट असिस्ट, तसेच एसयूव्ही क्रेडेन्शियलसारखे काही सेगमेंट-फर्स्ट फीचर्स मिळतील. ही कार पुढच्या बाजूला 185 मिमीच्या हाय ग्राउंड क्लिअरन्स आणि 16 इंच अलॉय व्हीलसह येईल.

आकर्षक डिझाईन

टाटाच्या सिग्नेचर स्प्लिट लायटिंग डिझाइनसह या कारचा फ्रंट एंड आक्रमक आहे. टाटा लोगोमधील काळ्या पॅनेलमध्ये ट्राय-अॅरो पॅटर्न देखील आहे, ज्याभोवती एलईडी डे-टाइम रनिंग लँप आहे. तर मुख्य हेडलॅम्प युनिट्स खाली स्थित आहेत, जे प्रोजेक्टर लाइटसह येतील. समोरचा बहुतेक भाग जड कव्हरने झाकलेला आहे आणि त्याला एक मोठा ट्राय-अॅरो डिझाईन ग्रिल आणि मोठे गोल फॉग लॅम्प मिळतात.

दमदार इंजिन

कंपनीने पंचचे स्पेसिफिकेशन्स उघड केले नाहीत, तथापि, काही वृत्तांमध्ये दावा करण्यात आला आहे की, नवीन पंच 1.2-लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिनसह येईल, जे Altroz ​​प्रीमियम हॅचबॅकला पॉवर देतं. पेट्रोल मिल 85 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड आणि पर्यायी AMT युनिटसह येण्याची शक्यता आहे. लॉन्च झाल्यावर, नवीन टाटा पंच मारुती सुझुकी एस-प्रेसो आणि रेनॉल्ट क्विडशी स्पर्धा करेल. गेल्या वर्षी ऑटो एक्स्पो दरम्यान टाटा मोटर्सने पंचला HBX कॉन्सेप्ट मायक्रो-एसयूव्ही म्हणून पहिल्यांदा प्रदर्शित केली. पंच एसयूव्ही मारुती सुझुकी इग्निस आणि आगामी ह्युंडई मायक्रो-एसयूव्हीला टक्कर देईल, या कारला कॅस्पर म्हटले जाण्याची शक्यता आहे.

टाटाच्या एसयूव्ही फॅमिलीत चौथ्या वाहनाची एंट्री

तथापि, कंपनीने येथे वाहनाबद्दल फारशी माहिती सादर केलेली नाही. टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेइकल बिझनेस युनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्रा म्हणाले की, “टाटा पंच, हे नावाप्रमाणेच, एक एनरजेटिक व्हीकल आहे ज्यामध्ये कुठेही जाण्याची क्षमता आहे. ते पुढे म्हणाले की, ही कार ग्राहकांच्या गरजा पूर्ण करेल. कॉम्पॅक्ट सिटी कारमध्ये एसयूव्ही फीचर्स शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही कार बनवण्यात आली आहे. पंच आमच्या एसयूव्ही फॅमिलीमधील चौथे वाहन आहे. अशा परिस्थितीत, आता आम्ही रेंज ऑप्शन वाढवण्याचा विचार करीत आहोत.

इतर बातम्या

Yamaha YZF-R15 V4 चं वितरण सुरु, जाणून घ्या नव्या मोटारसायकलमध्ये काय आहे खास?

महिन्याला 2500 रुपयांच्या EMI वर घरी न्या TVS ची दमदार मायलेजवाली बाईक, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

1 लीटर पेट्रोलमध्ये 45km रेंज, 80 हजारांची Suzuki Access 125 अवघ्या 17,820 रुपयात

(Tata Punch bookings to open next week)

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....