AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Tiago EV : पेट्रोल-डिझेलचे टेन्शन सोडा… टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात… सिंगल चार्जमध्ये 285 किमी दामटा

Tata Tiago EV : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीत वाहनधारकांसाठी अजून एक जबरदस्त पर्याय समोर आला आहे. टाटा मोटर्सने नवीन Tata Tiago EV भारतात लाँच केली आहे. या कारची सुरुवातीची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. काय आहे या कारचे वैशिष्ट्ये?

Tata Tiago EV : पेट्रोल-डिझेलचे टेन्शन सोडा... टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात... सिंगल चार्जमध्ये 285 किमी दामटा
पेट्रोल-डिझेलचे टेन्शन सोडाImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 28, 2026 | 4:17 PM
Share

Tata Tiago EV : भारतात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अजून वाढ होण्याची भीती आहे. त्याचवेळी टाटा मोटर्सने ने त्यांची लोकप्रिय इलेक्ट्रिक हॅचबॅक Tiago EV नवीन स्वरुपात बाजारात आणली आहे. कंपनीने या वर्षात Tata Tiago EV ही मोठ्या अपडेटसह बाजारात उतरवण्याचे निश्चित केले आहे. यावेळी कंपनीने कारची किंमत कमी ठेवत जास्त फीचर्स दिले आहेत. नवीन Tata Tiago EV ची सुरुवातीची शोरूम किंमत 6.99 लाख रुपये इतकी आहे. तर BaaS म्हणजे बॅटरी-एज-ए-सर्व्हिस प्लॅनची किंमत केवळ 4.69 लाख रुपये इतकी आहे. पण या योजनेत ग्राहकांना प्रत्येक किलोमीटरसाठी अतिरिक्त रक्कम मोजावी लागेल. कंपनीच्या शोरूममध्ये याविषयीची माहिती मिळेल.

टाटा टियागोची रेंज आणि बॅटरी

बॅटरी आणि रेंज पाहता कारमध्ये पूर्वीप्रमाणेच 19.2kWh आणि 24kWh बॅटरी पॅकचा पर्याय देण्यात आला आहे. मोठ्या बॅटरीचे मॉडेल 285 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. तर छोट्या बॅटरीसह ही कार 226 किलोमीटरपर्यंत धावते. टाटा मोटर्सनुसार, नवीन Tiago EV आता पूर्वीपेक्षा 40 टक्के झटपट चार्ज होते. DC फास्ट चार्जरच्या मदतीने ती कार केवळ 10 ते 80 टक्क्यांपर्यंत केवळ 35 मिनिटात चार्ज होते. कंपनीचा दावा आहे की केवळ 18 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ही कार 100 किलोमीटरपर्यंत धावू शकते.

पूर्वीपेक्षा अधिक स्टायलिश लूक

नवीन Tiago EV आता पूर्वीपेक्षा अधिक स्टायलिश दिसत आहे. कारच्या समोर नवीन LED हेडलँप, आकर्षक LED DRLs आणि ग्रिल डिझाईन देण्यात आली आहे. मागील बाजूस आता कनेक्टेड LED टेललॅम्प देण्यात आला आहे. त्यामुळे ही कार प्रीमियम दिसते. याशिवाय नवीन डिझाईचे 15 इंच व्हील, ब्लॅक रूफ आणि शार्क फिन अँटिना पण देण्यात आला आहे.

Tiago EV चे फीचर्स काय?

या कारच्या इंटिरिअरमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता यामध्ये ड्युल टोन डॅशबोर्ड मिळेल. सोबतच 10.25 इंचाचा मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. हे वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करतो. कंपनीने कारचे सॉफ्टवेअर आणि प्रोसेसिंग सिस्टिम सुद्धा पूर्वीपेक्षा अधिक चांगली केली आहे.

नवीन Tiago EV मध्ये अनेक फीचर्स जोडल्या गेलेले आहेत. यामध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूज कंट्रोल, वायरलेस चार्जर, कूल्ड ग्लव बॉक्स, रियर AC वेंट्स आणि ऑटो फोल्ड ORVM सारखे फीचर्स आहेत. याशिवाय कनेक्टेड कार टेक्नोलॉजीसह 40 पेक्षा स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहे.

Follow Us
अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार
अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार.
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट..
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट...
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार....
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार.....
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला.
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक.
मिरा-भाईंदर ते घाटकोपर… बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा
मिरा-भाईंदर ते घाटकोपर… बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा.
राजकारणात मोठं घडणार? देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट...
राजकारणात मोठं घडणार? देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट....
दिल्ली दौऱ्यामागचं गुपित काय?; फडणवीस-शिंदे-पवारांचा मुक्काम वाढला
दिल्ली दौऱ्यामागचं गुपित काय?; फडणवीस-शिंदे-पवारांचा मुक्काम वाढला.
बापरे! थेट त्या फ्लॅटवर 'प्लॅटिनम गोल्ड बॅच'च, मोटेगावकराचाही समावेश
बापरे! थेट त्या फ्लॅटवर 'प्लॅटिनम गोल्ड बॅच'च, मोटेगावकराचाही समावेश.
'55 रेडे कापून सत्तेत आले अन् दुसऱ्यांच्या कुर्बानीला...' राऊत
'55 रेडे कापून सत्तेत आले अन् दुसऱ्यांच्या कुर्बानीला...' राऊत.