AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल- डिझेल कारचा खेळ खल्लास! Maruti ची देशातील पहिली इथेनॉल कार… कधी होणार लाँच, काय आहे खास?

Maruti e100 Flex Fuel Car: देशात पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे वाहनधारक हैराण आहेत. तर Maruti Suzuki ची E100 Flex Fuel Passenger Car ही देशातील पहिली इथेनॉल कार रस्त्यावर उतरणार आहे. त्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळेल. ही कार किती देणार मायलेज आणि कधी होणार लाँच?

पेट्रोल- डिझेल कारचा खेळ खल्लास! Maruti ची देशातील पहिली इथेनॉल कार... कधी होणार लाँच, काय आहे खास?
देशातील पहिली इथेनॉल कारImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 27, 2026 | 2:46 PM
Share

Maruti Ethanol Car: केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात देशात फ्लेक्स फ्युएल कार आणि हायड्रोजन कार येणार असल्याचा दावा केला होता. सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकीने जागतिक पर्यावरण दिनी, 5 जून 2026 रोजी देशातील पहिली इथेनॉल कार लाँच करण्याचे जाहीर केले आहे. मारुती सुझुकी E100 फ्लेक्स फ्युएल पॅसेंजर कार ऑटो इंडस्ट्रीत गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. ही कार 100% इथेनॉलवर चालेल. भारतात सध्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीची झळ बसत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि प्रदूषण कमी व्हावे यासाठी केंद्र सरकार इलेक्ट्रिक कारसह इतर पर्यायांना प्रोत्साहन देत आहे. त्यात इथेनॉल कारचाही समानवेश आहे. भारत, ब्राझीलच्या धरतीवर इथेनॉल इकोसिस्टिम विकसीत करणार आहे.

मारुतीने अजून अधिकृतपणे कोणते मॉडेल इथेनॉलवर बाजारात दाखल होईल हे जाहीर केलेले नाही. पण WagonR वा Fronx चे फ्लेक्स फ्युएल व्हर्जन सर्वात अगोदर बाजारात उतरवल्या जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी कंपनीने जापानमध्ये Fronx फ्लेक्स फ्युएल प्रोटोटाईप दाखवला होता. त्यामुळे भारतीय बाजारात कंपनी कोणते मॉडेल उतरवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डिझाईन आणि इंटिरिअर

कारचे डिझाईन हे सध्याच्या मॉडल्ससारखेच असेल. अर्थात इथेनॉलला अनुरूप बदल होतील. त्यात इथेनॉल टँक, पायपिंग, बॉडी रिइंफोर्समेंट असे काही बदल दिसतील. यासोबतच आकर्षक LED लाईट्स, मॉडर्न फ्रंट ग्रिल आणि रुफ रेल्स असण्याची शक्यता आहे. या कारमध्ये मोठी केबिन असेल. 7-इंचची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माऊंटेड कंट्रोल्स, चांगल्या दर्जाची आसान व्यवस्था आणि त्यावरील फॅब्रिक याकडे विशेष लक्ष असेल. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरची सोय सुद्धा या कारमध्ये असेल.

ऑटोमॅटिक क्लायमेंट कंट्रोल, रिअर पार्किंग सेन्सर्स, USB चार्जिंग, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि कीलेस एंट्री अशी काही फीचर्स या कारमध्ये आहेत. इथेनॉल इंडिकेटर, फ्युअल मॉनिटरिंग सिस्टिम नवीन असेल. ड्युअल एअरबॅग्स, ABS सह EBD, रियर पार्किंग सेन्सर्स, ISOFIX चाईल्ड सीट एंकर आणि हाय-स्ट्रेंथ स्टील स्ट्रक्चर मिळण्याची शक्यता आहे. तर फ्लेक्स फ्युएल इंजिनसाठी या कारमध्ये अतिरिक्त सुरक्षा फीचर्स यासोबत असतील.

इंजिन आणि मायलेज

यामध्ये 1.2 लिटर फ्लेक्स फ्युएल इंजिन असेल. हे इंजिन पेट्रोल आणि इथेनॉल दोन्ही इंधनावर धावेल. E100 मोडमध्ये पॉवर कमी होण्याची शक्यता आहे. पण टॉर्क चांगला असेल. पेट्लोवर ही कार ताशी 20-22 किमी धावेल. तर E100 वर ही कार ताशी 15-18 किमी धावेल असा अंदाज आहे. इथेनॉलची किंमत सध्या जवळपास 65 रुपये प्रति लिटर आहे. या कारमुळे ग्राहकांना अजून एका पर्याय उपलब्ध झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलची आयात कमी व्हावी आणि अवलंबित्व कमी करावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.

Follow Us
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा मुंडे हे काय बोलून गेल्या?
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ; राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर?
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
Dada Bhuse | पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा... नेमकं काय म्हणाले?
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग दुसरीकडे आईनं संपवलं जीवन
सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वड
Dhule | सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वडिलांचा मृत्यू
उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट?
मोठी बातमी! उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट? थेट वरळीतच...
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?; सुनेत्रा पवारांना रोहिणी खडसेंचं थेट आवाहन, म्हणाल्या...
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत धक्कादायक खुलासा
भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
थरारक VIDEO! भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
मोठी घडामोड! गोंदियात काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!