500 रुपयांत महिनाभर दामटा! ही इलेक्ट्रिक कार एक लाखाने झाली स्वस्त

MG Comet EV | कंपनीने कॉमेट ईव्ही (Comet EV) वर 1.40 लाख रुपयांपर्यंत सवलत देण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या बेसिक मॉडेलवर ग्राहकांना 99,000 रुपयांचे डिस्काऊंट देत आहे. तर ऑफरनंतर ही कार अत्यंत किफायतशीर किंमतीत मिळत आहे. टाटाच्या इलेक्ट्रिक कारला टफ फाईट देण्यासाठी एमजीने ही शक्कल लढवली आहे.

500 रुपयांत महिनाभर दामटा! ही इलेक्ट्रिक कार एक लाखाने झाली स्वस्त
Follow us
| Updated on: Feb 10, 2024 | 3:13 PM

नवी दिल्ली | 10 February 2024 : एमजी मोटर्सने टाटाच्या इलेक्ट्रिक कारला टफ फाईट देण्यासाठी सवलतींचा वर्षाव केला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या मार्केटमध्ये खळबळ उडाली आहे. कंपनीने कॉमेट ईवी (Comet EV) वर 1.40 लाख रुपयापर्यंतच्या सवलतीची घोषणा केली आहे. मार्केटमध्ये टाटा मोटर्सच्या टियागो ईव्ही (Tiago EV) कडून कॉमेटला तगडे आव्हान मिळत आहे. कॉमेट ईव्हीची विक्री वाढण्यासाठी कंपनीने ही रणनीती आखली आहे. कंपनी कॉमेट ईव्हीच्या बेसिक मॉडेलवर 99,000 रुपयांची सवलत देत आहे. तर इतर व्हेरिएंटवर पण मोठी सवलत देत आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्तात ईव्ही खरेदीची संधी मिळाली आहे.

अशी आहे सवलत

  • MG Comet EV चे तीन व्हेरिएंट – पेस, प्ले आणि प्लश बाजारात आल्या आहेत. त्यांची नवीन किंमत क्रमशः 6.99 लाख रुपये, 7.88 लाख रुपये आणि 8.58 लाख रुपये (एक्स-शोरूम) अशी आहे. किंमतीत 99,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे किंमती 7.98 लाख रुपयांहून 6.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) झाल्या आहेत. त्यामुळे कॉमेट ईव्ही ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ठरली आहे. तर टियागो ईव्हीची किंमत 8.69 लाख रुपयांपासून (एक्स शोरूम) सुरु होते.
  • कॉमेट ईव्हीच्या मिड लेव्हल प्ले आणि टॉप लेव्हलच्या प्लश या व्हेरिएंटच्या किंमतीत 1.40 लाख रुपयांची कपात करण्यात आली आहे. प्लेची किंमत आता 9.28 लाखांहून (एक्स-शोरूम) कमी होऊन 7.88 लाख (एक्स-शोरूम) झाली आहे. तर प्लशची किंमत 9.98 लाख (एक्स-शोरूम) रुपयांहून कमी होऊन 8.58 लाख (एक्स-शोरूम) झाली आहे.

230 किलोमीटरची रेंज

हे सुद्धा वाचा

कॉमेट ईव्ही, चीनमधील वुलिंग ईव्हीवर आधारीत इलेक्ट्रिक कार आहे. किंमतीच्या मानाने या कारमध्ये अनेक आधुनिक फीचर्स आणि जबरदस्त रेंज आहे. कॉमेट ईव्ही 17.3kWh बॅटरी पॅकसह येते. बॅटरी पूर्णपणे चार्ज झाल्यावर ही कार 230 किलोमीटरची ARAI प्रमाणित ड्राईव्ह रेंज देते. कंपनीने यामध्ये रियर-एक्सल-माउंटेड इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला आहे. 42 बीएचपीची पीक पॉवर आणि 110 एनएमचा टॉर्क देते. ही कार 3.3kW एसी चार्जिंगला सपोर्ट करते. या कारमधील बॅटरी 0 ते 100 टक्के चार्ज होण्यासाठी 7 तास लागतात. एका महिन्यात ही कार चालविण्यासाठी केवळ 500 रुपयांचा खर्च येतो.

Non Stop LIVE Update
राहुल गांधींची ट्रेन कशी? त्याला फक्त इंजिन अन् डब्बे..फडणवीसांची टीका
राहुल गांधींची ट्रेन कशी? त्याला फक्त इंजिन अन् डब्बे..फडणवीसांची टीका.
कोल्हेंचं अजित दादांच्या टीकेला प्रत्युत्तर, कार्यसम्राट की नटसम्राट..
कोल्हेंचं अजित दादांच्या टीकेला प्रत्युत्तर, कार्यसम्राट की नटसम्राट...
शरद पवार महायुतीत येणार? 4 जूननंतर... प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य
शरद पवार महायुतीत येणार? 4 जूननंतर... प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य.
नारायण राणे वेडा माणूस, त्याचा चेहरा..., ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
नारायण राणे वेडा माणूस, त्याचा चेहरा..., ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
... हा नारायण राणेंचा अपमान नाही का? वैभव नाईक यांचा उपरोधीक टोला
... हा नारायण राणेंचा अपमान नाही का? वैभव नाईक यांचा उपरोधीक टोला.
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, मी निवडून आलो तर...
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, मी निवडून आलो तर....
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन.
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका.
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला.
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?.