Tesla Car | एलन मस्कचा संकेत, भारतीय बाजारपेठेत टेस्लाचे आगमन होणार!

जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी ‘टेस्ला’चे (Tesla Motors) भारतीय बाजारपेठेत (Indian Market) आगमन होण्याचा संकेत कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनी दिले आहेत.

Tesla Car | एलन मस्कचा संकेत, भारतीय बाजारपेठेत टेस्लाचे आगमन होणार!
टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारवरील आयात शुल्क कमी करणार भारत सरकार

मुंबई : जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी ‘टेस्ला’चे (Tesla Motors) भारतीय बाजारपेठेत (Indian Market) आगमन होण्याचा संकेत कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनी दिले आहेत. पुढच्या वर्षी म्हणजेच 2021मध्ये टेस्ला भारतीय बाजारपेठेत (Indian Market) उतरू शकते. आपल्या ट्विटर पोस्टमधून एलन मस्क यांनी हे संकेत दिले आहेत. एका भारतीय युजरने ट्विटरवर एलनला भारतात येण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता (Tesla motor will enter the Indian market next year).

एलन मस्कने या ट्विटला उत्तर देताना, दोन टी-शर्टचे फोटो पोस्ट केले आहेत. यातील एका टी-शर्टवर ‘इंडिया लव टेस्ला’, तर दुसऱ्या टी-शर्टवर ‘इंडिया वॉन्ट टेस्ला’ असे लिहिले आहे. या फोटोंसोबत ट्विट करत, ‘पुढच्या वर्षी नक्की. वाट पाहण्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार!’, असे म्हटले आहे. या आधीही बऱ्याचदा टेस्लाने (Tesla Motors) भारतीय बाजारपेठेत उतरण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, काही सरकारी नियमांमुळे त्यांच्या प्रवेशावर निर्बंध आले होते (Tesla motor will enter the Indian market next year).

अगोदर 2018मध्ये, काही निर्बंधांमुळे आपण भारतीय बाजारपेठेत (Indian Market) प्रवेश करू शकत नसल्याचे, एलन मस्कने ट्विट करत म्हटले होते. मात्र, शुक्रवारी (2 ऑक्टोबर) एलन मस्कने केलेल्या या ट्विटमुळे टेस्ला पुढच्या वर्षी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

भारतीय बाजारपेठ गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून मंदावली आहे. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे या क्षेत्रासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली होती. या समस्येमधून बाहेर पडण्यासाठी सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी या क्षेत्राकडून होत आहे. यातच टेस्लाच्या (Tesla Motors) आगमनाची बातमी या क्षेत्रासाठी फायद्याची ठरणार आहे.

अनलॉकनंतर हळूहळू परिस्थिती पूर्व पदावर

अनलॉकच्या घोषणेनंतर भारतीय ऑटो सेक्टर पुन्हा एकदा उभारी घेत आहे. सप्टेंबर महिन्यात मारुती सुझुकी आणि बजाज ऑटोसहित अनेक कंपन्यांच्या गाड्यांच्या विक्रीमध्ये वाढ झालेली दिसून आल्याने ऑटो क्षेत्राच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने सप्टेंबर महिन्यात गाड्यांच्या विक्रीमध्ये 30% टक्क्यांनी वाढ झाल्याचे जाहीर केले होते. 2020मध्ये कंपनीच्या एकूण 160,442 गाड्यांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात ही विक्री केवळ 122,640 युनिट इतकीच होती. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विक्रीत 30.8 टक्के वाढ झाली आहे.’ तर, त्याच वेळी बजाज ऑटोने सप्टेंबरमध्ये वार्षिक विक्रीत 10% वाढ नोंदविली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात कंपनीने 4,02,035 वाहनांची विक्री केली होती. तर, यावर्षी या आकड्यात वाढ होऊन 4,41,306 इतक्या गाड्यांची विक्री झाली आहे.

(Tesla motor will enter the Indian market next year)

 

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI