WagonR CNG कारची जोरदार मागणी, आतापर्यंत 3 लाखापेक्षा अधिक गाड्यांची विक्री

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाच्या (MSE) WagonR-CNG कार मॉडेलची बाजारात सध्या जोरदार मागणी आहे (Record break sale of Maruti Suzuki WagonR CNG Car in India).

WagonR CNG कारची जोरदार मागणी, आतापर्यंत 3 लाखापेक्षा अधिक गाड्यांची विक्री

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाच्या (MSE) WagonR-CNG कार मॉडेलची बाजारात सध्या जोरदार मागणी आहे (Record break sale of Maruti Suzuki WagonR CNG Car in India). आतापर्यंत या 3 लाखपेक्षा अधिक गाड्यांची विक्री झाली आहे. या विक्रीसह या प्रकारच्या कारमध्ये ही सर्वाधिक विक्री होणारी गाडी ठरली आहे. मारुति सुझुकीने शुक्रवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. त्यांनी सांगितलं मारुती सुझुकीची ही कार प्रवासी वाहनांच्या श्रेणीत सर्वात विक्री होणारी सीएनजी कार ठरली आहे.

WagonR कार 1999 मध्ये लॉन्च

मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले, “WagonR- जवळपास दोन दशकांपासून देशाच्या टॉप 10 कारपैकी एक राहिली आहे. WagonR ला 1999 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. आतापर्यंत वॅगनआरच्या 24 लाख गाड्यांची विक्री झाली आहे. यातील जवळपास अर्ध्या ग्राहकांसाठी ही त्यांची पहिली गाडी होती.”

हेही वाचा : मारुती सुझुकीच्या ‘या’ कारच्या किंमतीत दीड लाखांची कपात

“आता पुन्हा एकदा 3 लाख WagonR- एस-सीएनजी कारची विक्री हे नवं रेकॉर्ड आहे. यातून ग्राहकांचा कंपनीवरील विश्वास सिद्ध होतो. CNG वर चालणारी वॅगनआर LXI आणि LXI (O) या दोन प्रकारात उपलब्ध आहे. त्यांची किंमत 5.25 लाख रुपये आणि 5.32 लाख रुपये (एक्स-शोरुम) इतकी आहे.

भाडेतत्वावरही नवी कार घेता येणार

मारुती सुझुकीने सबस्क्राईब नावावर एक योजना आणली आहे. यानुसार आता थेट नवी कारही भाड्याने घेता येणार आहे. या योजनेचा विस्तार लवकरच देशातील 6 मोठ्या शहरांमध्ये होणार आहे. यात दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, फरीदाबाद, गुरुग्राम आणि बंगळुरु या शहरांचा समावेश आहे. कंपनीची ही योजना पुढील 2-3 वर्षात देशातील 60 शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे.

संबंधित बातम्या :

मारुती सुझुकीकडून ‘Buy Now Pay Later’ ऑफर लाँच, आता कार घ्या, दोन महिन्यांनी EMI सुुरु

मारुती, ह्युंडाईनंतर आता अशोक ले लँडचंही उत्पादन बंद

मारुती सुझुकीची सर्वात स्वस्त SUV कार S-Presso लाँच, किंमत फक्त…

Record break sale of Maruti Suzuki WagonR CNG Car in India

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *