कोरोना संकटात या ऑटो कंपनीचा शेतकऱ्यांना मोठा आधार; ‘कोविड कवच’ उपक्रमांतर्गत दिली जातेय दीड लाखाची मदत

आधीच कोरोना महामारीत प्रचंड नुकसान झाले आहे, त्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे. अशा परिस्थितीत एस्कॉर्ट्स लिमिटेड ही कंपनी शेतकऱ्यांच्या मदतीला धावली आहे. (This auto company has a large base of farmers in the Corona crisis)

कोरोना संकटात या ऑटो कंपनीचा शेतकऱ्यांना मोठा आधार; 'कोविड कवच' उपक्रमांतर्गत दिली जातेय दीड लाखाची मदत
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 6:04 PM

नवी दिल्ली : कोरोनाने संपूर्ण देशभरात दहशत निर्माण केली आहे. विषाणूने अनेक निष्पाप नागरिकांचे बळी घेतले, त्याचबरोबर देशापुढे भीषण आर्थिक संकटही उभे केले आहे. या संकटातून बाहेर कसे पडायचे, हा प्रश्न सध्या देशापुढे उभा ठाकला आहे. अशा चिंतेच्या परिस्थितीत वाहन कंपन्यांकडून काही ना काही दिलासादायी पावले उचलली जात आहे. याच मदत मोहिमेत आता एस्कॉर्ट्स लिमिटेड या कंपनीनेही पुढाकार घेतला आहे. या कंपनीने शेतीशी संबंधित लोकांना मदतीचा हात पुढे केला आहे. आधीच कोरोना महामारीत प्रचंड नुकसान झाले आहे, त्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे. अशा परिस्थितीत एस्कॉर्ट्स लिमिटेड ही कंपनी शेतकऱ्यांच्या मदतीला धावली आहे. (This auto company has a large base of farmers in the Corona crisis)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान अजून थांबलेले नाही. याचदरम्यान शेती समुदायाला आधार देण्यासाठी अभियांत्रिकी गट एस्कॉर्ट्स लिमिटेडने बुधवारी देशभरातील ग्राहकांसाठी कोरोना संकट काळात दिलासादायी उपायांची घोषणा केली. या उपायांमध्ये कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होणे तसेच घरगुती उपचारांवर केल्या जाणाऱ्या खर्चाची भरपाई करणे यांचा समावेश आहे.

कंपनी करणार दीड लाख रुपयांची मदत

एस्कॉर्ट्स लिमिटेडने ‘एस्कॉर्ट्स कोविड कवच’ या शीर्षकाखाली उपक्रम हाती घेतला आहे. एका विमा कंपनीच्या भागिदारीतून हा उपक्रम राबवला जाणार आहे. याअंतर्गत कोरोना रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णाला दीड लाख रुपयांपर्यंत आणि घरगुती उपचारावरील खर्चापोटी 15 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे. ही मदत 25 मे 2021 पासून लागू होईल व या तारखेपासून एस्कॉर्ट्स ट्रॅक्टरची खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना उपलब्ध असेल, असे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

एस्कॉर्ट्सने चालवले प्रोत्साहन अभियान

‘एस्कॉर्ट्स कोविड कवच’ उपक्रमातून दिल्या जाणाऱ्या मदतीचा भार एस्कॉटर्स कंपनी व या कंपनीचे अधिकृत विक्रेते उचलणार आहेत. याशिवाय कंपनीने आपल्या डीलर्सना आपापल्या डीलरशिपवर लसीकरण शिबिर आयोजित करण्यास प्रोत्साहित केले आहे. संबंधित डिलर्सना स्थानिक रुग्णालयांशी संबंध जोडून देणे, तसेच आपल्या ग्राहकांना व त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यासाठीही कंपनीमार्फत लसीकरण अभियानाचे प्रयत्न केले जात आहेत.

शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यास कंपनी तयार

आपल्या विविध उपाययोजनांबद्दल बोलताना एस्कॉर्ट्स अ‍ॅग्री मशिनरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेणू अग्रवाल म्हणाले, आपला देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. आपल्या देशातील शेतकर्यांनी या महामारीच्या काळात मोठे र्धेर्य दाखवून कठोर परिश्रम घेतले आहेत. जेणेकरून महामारीच्या काळातही आपल्या सर्वांना पुरेसे अन्न मिळेल. जे शेतकरी समाजाच्या हितासाठी शक्य ती प्रत्येक गोष्ट करायला तयार असतात, त्या शेतकऱ्यांना संकट काळात मदत करणे हे आपलेदेखील नैतिक कर्तव्य आहे. आम्हाला आशा आहे की आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आपला देश लवकरच कोरोनाच्या संकटातून मुक्त होईल, असा विश्वास अग्रवाल यांनी व्यक्त केला. एस्कॉर्ट्स लिमिटेड कंपनीने शेतकऱ्यांबरोबरच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच चॅनेल भागीदारांसह इतर भागधारकांसाठी कोरोना संकट काळात दिलासादायी ठरतील अशा विविध उपाययोजनांची घोषणा केली आहे. (This auto company has a large base of farmers in the Corona crisis)

इतर बातम्या

लहान कंपन्याही आता देणार पैसे कमवण्याची संधी, 60 हून अधिक IPO येणार

ट्विटरला दे धक्का; स्वदेशी कू अ‍ॅपची होतेय चांगलीच भरभराट; गुंतवणूकदारांकडून जमवला 218 कोटींचा निधी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.