मारुतीच्या कारमध्ये पहिल्यादांच अंडरबॉडी सीएनजी टँक, नव्या सुव्हमध्ये मोठी बूट स्पेस
देशातील आघाडीची कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकी आपली पहिली अंडरबॉडी सीएनजी टँक असलेली सुव्ह येत्या ३ सप्टेंबर रोजी बाजार आणणार आहे. या गाडीत सीएनजी बॉडीत खाली लावला जाणार असल्याने बुट स्पेस मिळणार आहे.

मारुती सुझुकी इंडिया ३ सप्टेंबर २०२५ मध्ये आपली नवीन मिड साईज सुव्ह लाँच करत आहे. कंपनीने सध्या या कारला ‘Y17’ कोडनेम दिलेले आहे. या कारला मीडियात आणि सोशल मीडियात ‘Escudo’ असे म्हटले जात आहे. परंतू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाँचच्या वेळी हिचे नाव वेगळे असू शकते. या कारमध्ये पहिल्यांदा अंडरबॉडी सीएनजी टँक दिला जाणार आहे.
पहिल्यांदा अंडरबॉडीत लागणार CNG टँक
ही सुव्ह मारुतीची पहिलीच अशी पॅसेंजर व्हेईकल असेल ज्याच्या अंडरबॉडीत सीएनजी टँक दिलेला आहे. आतापर्यंत कंपनीने सर्व सीएनजी कारमध्ये सीएनजी सिलिंडर बूट ( डीक्कीत ) लावलेला असायचा. परंतू नव्या सुव्हमध्ये अंडरबॉडी सीएनजी टँक दिलेला असणार आहे.त्यामुळे प्रवाशांना बुट प्रेस अधिक मिळणार आहे. अनेक ग्राहकांची तक्रार होती की सीएनजी सिलीडरमुळे बुटमध्ये जागा कमी होते. त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे.
S-CNG टेक्नॉलॉजीतले पहिले पाऊल
मारुती कंपनी तिच्या S-CNG तंत्रामुळे बाजारात आधीच प्रसिद्ध आहे. ज्यात सीएनजी किट प्रोडक्शन लाईनवरच इंस्टॉल केली जाते. यामुळे इंजिन, गिअरबॉक्स, सस्पेंशन आणि ब्रेक सीएनजीच्या हिशेबाने आधी ट्युन केलेले असतात. तर दुसरीकडे नवीन अंडरबॉडी सीएनजी टेक्नॉलॉजी मारुतीसाठी आतापर्यंतचा मोठा अपडेट आहे. पुढे येणाऱ्या सीएनजी मॉडेल्सना याच प्रकारे अंडरबॉडी इंस्टॉलेशन टेक्नॉलॉजी दिली जाणार आहे.
जेथे दुसऱ्या कंपन्या उदा. टाटा मोटर्स आणि हुंडई आपल्या मॉडेलमध्ये ट्वीन सिलिंडर सीएनजी तंत्रज्ञान वापरत आहेत. तर मारुती आता एक पाऊल पुढे जाऊन अंडरबॉडी टँकचा प्रयोग करीत आहे. या नव्या तंत्राने केवळ बूटमध्ये जादा जागा वाचेल तर कारच्या बँलन्स आणि परफॉर्मन्स देखील चांगला होईल.
फिचर्स काय असतील ?
बातम्यांनुसार फिचर्सचा विचार करता या सुव्ह मध्ये भारतात मारुतीची पहिली कार असेल ज्यात लेव्हल – 2 ADAS (Advanced Driver Assistance System) दिला जाणार आहे. याशिवाय यात अन्य फिचर्स खालील प्रमाणे असतील..
डॉल्बी एटमॉस साऊंड सिस्टम
पावर्ड टेलगेट
ग्रँड विटारा इंजिन
4 व्हील ड्राईव्हव ( 4WD ) ऑप्शन
अरीना डीलरशिपने होणार विक्री
