AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

80 च्या दशकावर राज्य करणाऱ्या Yezdi बाईक्सचं भारतात कमबॅक, दोन पॉवरफुल गाड्या लाँच होणार

रेट्रो स्टायलिंग आणि आधुनिक फीचर्स प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण ऐंशीच्या दशकात देशातील रस्त्यांवर रुबाबात धावणाऱ्या Yezdi बाईक्सचं भारतात पुनरागमन होत आहे.

80 च्या दशकावर राज्य करणाऱ्या Yezdi बाईक्सचं भारतात कमबॅक, दोन पॉवरफुल गाड्या लाँच होणार
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Sep 23, 2021 | 6:25 PM
Share

मुंबई : रेट्रो स्टायलिंग आणि आधुनिक फीचर्स प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण ऐंशीच्या दशकात देशातील रस्त्यांवर रुबाबात धावणाऱ्या Yezdi बाईक्सचं भारतात पुनरागमन होत आहे. क्लासिक लीजेंड्स जावा नंतर Yezdi आता भारतात ब्रँड लॉन्च करण्याची तयारी करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीची स्क्रॅम्बल बाईक पाहायला मिळाली होती, जी कदाचित Roadking नावाने सादर केली जाऊ शकते. दरम्यान, आणखी एक अॅडव्हेंचर टूरर मॉडेल टेस्टिंगदरम्यान पाहायला मिळाले. (Upcoming Yezdi ADV & Scrambler Spotted Testing In India, launch soon)

महिंद्रा अँड महिंद्राच्या मालकीच्या क्लासिक लीजेंड्सने काही महिन्यांपूर्वी देशात Roadking नावाने ट्रेडमार्क दाखल केला होता. असे मानले जाते की, हे नाव स्क्रॅम्बलर मॉडेलसाठी वापरले जाईल. त्याचबरोबर कंपनीचे भारतातील दुसरे मॉडेल म्हणून अॅडव्हेंचर टूरर मॉडेल सादर केले जाईल.

अलीकडच्या काळात भारतीय बाजारात अॅडव्हेंचर स्टाईल बाईकची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासह, रेट्रो-स्टाईल देखील खूप लोकप्रिय होत आहे. हिरो मोटोकॉर्पपासून रॉयल एनफिल्ड पर्यंत, अनेक ब्रॅण्डने या सेगमेंटमध्ये आपले मॉडेल सादर केले आहेत. अशा परिस्थितीत Yezdi ची येणारी ही आगामी साहसी मोटरसायकल तरुणांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरू शकते.

युट्यूब चॅनेल सुयोग (SUYOG) ने या नवीन बाईकचा व्हिडिओ अपलोड केला आहे. हे प्रोटोटाइप मॉडेलसारखे दिसत असले तरी, या बाईकची फ्रेम आणि हँडलबार सध्या प्रोडक्शन रेडी मॉडेलसारखे दिसत नाहीत. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह प्रीमियम फीचर्स यात समाविष्ट केले जाऊ शकतात अशी अपेक्षा आहे.

पॉवरफुल इंजिन

मात्र, त्याच्या इंजिन आणि पॉवरट्रेनबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु असे मानले जात आहे की, यामध्ये कंपनी 293cc क्षमतेचे लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन वापरू शकते. जे जावाच्या बाईक्समध्येही पाहायला मिळते. हे इंजिन 27.33 PS पॉवर आणि 27.02 Nm टॉर्क जनरेट करते. या व्यतिरिक्त, दुसरा इंजिन पर्याय म्हणून 334cc इंजिन देखील दिले जाऊ शकते. ही दोन्ही इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्ससह येतात.

रॉयल एनफील्डला टक्कर!

मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. बाजारात आल्यानंतर या दोन्ही बाईक्स प्रामुख्याने रॉयल एनफील्डशी स्पर्धा करतील. रोडकिंग असे नाव असलेल्या या स्क्रॅम्बलर मॉडेलची स्पर्धा रॉयल एनफील्डच्या आगामी मॉडेल Scram 411 आणि अॅडव्हेंचर मॉडेल रॉयल एनफील्ड हिमालयनशी होईल.

इतर बातम्या

मारुतीनंतर आता तुमच्या आवडत्या टाटा कार महागणार, जाणून घ्या किंमत किती वाढणार?

ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी पेपर सोबत बाळगण्याचं आता नो टेन्शन, DigiLocker ला मिळाली मान्यता

Tata चा CNG गाड्यांच्या धडाका, अवघ्या 5 हजारात बूक करा किफायतशीर कार

(Upcoming Yezdi ADV & Scrambler Spotted Testing In India, launch soon)

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना