AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solar Car : फ्री मध्ये 4000 km पळणाऱ्या मेड-इन-इंडीया कारबद्दल तुम्हाला माहितीय का? किंमत 10 लाखापेक्षा कमी

Solar Car Price under 10 Lakh : या गाडीबद्दल कंपनीचा दावा आहे की, फुल चार्जमध्ये ही कार 330Km पळू शकते. 500 लीटर बूट स्पेससोबत येणाऱ्या या कारला फास्ट चार्ज सपोर्ट सोबत सादर करण्यात आलं होतं. या गाडीच्या बॅटरीवर 3 वर्ष किंवा 1.5 लाख किलोमीटरची वॉरंटी मिळते.

Solar Car : फ्री मध्ये 4000 km पळणाऱ्या मेड-इन-इंडीया कारबद्दल तुम्हाला माहितीय का? किंमत 10 लाखापेक्षा कमी
Solar CarImage Credit source: Vayve Mobility
| Updated on: Oct 04, 2024 | 2:01 PM
Share

पेट्रोल, डिजेल आणि इलेक्ट्रिक कार्स तुम्ही भरपूर पाहिल्या असतील, पण तुम्हाला माहितीय का, भारतीय बाजारात अशी सुद्धा एक कंपनी आहे, जी Solar Car बनवते. Vayve Commercial Mobility ने भारतात अशी एक सोलार कार बनवली, जी सूर्य प्रकाशात चार्ज होऊन काही हजार किलोमीटर अंतर कापू शकते. Vayve CT5 Solar Car ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर करण्यात आली होती. या सोलार कारला टॅक्सी लाइनअपसाठी डिजाइन करण्यात आलं आहे. खास बाब म्हणजे ही फक्त सोलार कार नाही, Electric Car सुद्धा आहे, जी चार्ज केली जाऊ शकते.

या गाडीबद्दल कंपनीचा दावा आहे की, फुल चार्जमध्ये ही कार 330Km पळू शकते. 500 लीटर बूट स्पेससोबत येणाऱ्या या कारला फास्ट चार्ज सपोर्ट सोबत सादर करण्यात आलं होतं. या गाडीच्या बॅटरीवर 3 वर्ष किंवा 1.5 लाख किलोमीटरची वॉरंटी मिळते. 70kmph च्या टॉप स्पीडने पळणाऱ्या या गाडीमध्ये पॅसेंजर्सच्या सेफ्टीसाठी फ्रंट डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. कारमध्ये बसणाऱ्या पाचही प्रवाशांसाठछी सीट बेल्ट्स सुद्धा मिळतील.

4000 किलोमीटर फ्री मध्ये कशी पळणार?

ही कार 6 सेकंदात 0 ते 40 किलोमीटरचा वेग पकडते. ही कार 3.3kW आणि 30kW या दोन ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आली. 30kW वेरिएंटमध्ये ही गाडी वेगाने फुल चार्ज होईल. या गाडीच्या रूफवर सोलर पॅनल आहेत. कंपनीनुसार रूफवरच्या सोलर पॅनलमुळे ही कार 1 वर्ष 4,000 किलोमीटर फ्री मध्ये पळू शकते.

कारची किंमत किती?

कंपनीने अजूनपर्यंत या सोलर कारची किंमत जाहीर केलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार या गाडीची किंमत जवळपास 10 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते. डिजाइनबद्दल बोलायच झाल्यास ही कार चार ऐवजी तीन चाकी आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.