AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल नाही तर डिझेलवर का नाही धावत मोटरसायकल, कारण तरी काय?

Two Wheeler Diesel | तुम्ही कधी विचार केला का की दुचाकी केवळ पेट्रोल इंजिनावरच का धावते? Diesel इंजिनचा वापर का करण्यात येत नाही. कधी डिझेलवर चालणारी दुचाकी पाहिली आहे काय़ काय बाईक डिझेलवर धावू शकेल का? असा प्रयोग केल्यास का फायदा होईल, त्याचे तोटे काय?

पेट्रोल नाही तर डिझेलवर का नाही धावत मोटरसायकल, कारण तरी काय?
| Updated on: Dec 21, 2023 | 3:52 PM
Share

नवी दिल्ली | 21 डिसेंबर 2023 : बाईक, कार, बस, ट्रक आणि एरोप्लेन हे वेगवेगळ्या इंधनावर धावतात. दुचाकी पेट्रोलवर धावते. तर कार पेट्रोल आणि डिझेलवर चालतात. ट्रक सारखी मोठी वाहनं केवळ डिझेलवर चालतात. तर विमान उडवण्यासाठी एकदम वेगळ्या प्रकारचे इंधन वापरल्या जाते. आता तर इलेक्ट्रिक कारचे युग आले आहे. इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटरची पण क्रेझ आहे. पण तुम्ही कधी डिझेलवर धावणार दुचाकी पाहिली आहे का? दुचाकी केवळ पेट्रोलवरच का धावते? असा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल. चुकून दुचाकीत डिझेल टाकल्यावर काय होईल? तसे झाल्यास काय उपाय करावा, तुम्हाला माहिती आहे का?

डिझेल तर सर्वात स्वस्त

इंधनाची किंमतीचा विचार करता डिझेल सर्वात स्वस्त इंधन आहे. पेट्रोलच्या किंमतीत तर सध्या गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोल बाईकपेक्षा डिझेल बाईक जास्त फायदेशीर ठरली असती, असे तुम्हाला वाटले असेल, नाही का? त्यामुळे पैशांची बचत झाली असती आणि बाईकचा अधिक वापर पण करता आला असता. पण डिझेल बाईकसाठी का फायदेशीर ठरत नाही, पेट्रोल कसे सुरक्षित ठरते, हे पाहुयात..

काय आहे पेट्रोल आणि डिझेलमध्ये फरक

पेट्रोल आणि डिझेल यांच्यामध्ये सर्वात मोठा फरक इंधन ज्वलनाच्या पद्धतीत आहे. ऑटोमोबाईलशी संबंधित अनेक रिपोर्ट्सनुसार, पेट्रोल इंजिनमध्ये स्पार्क वेगळा असतो. तर डिझेल इंजिनमध्ये याप्रकारचा कोणताही स्पार्क नसतो. याशिवाय डिझेल इंजिनमध्ये कॉर्बोरेटर नसते. तर पेट्रोल इंजिनमध्ये ते असते. डिझेल इंजिन अधिक क्षमतेने काम करते. चुकून जर पेट्रोल आणि डिझेल एकत्र आले तर त्याचा इंजिनवर प्रतिकूल परिणाम दिसून येतो.

बाईकमध्ये का नाही मिळत डिझेल इंजिन

डिझेलमध्ये पेट्रोलमध्ये जास्त दबाव तयार करण्याची क्षमता असते. हा दबाव सहन करण्यासाठी डिझेल इंजिन अधिक जड आणि मोठे तयार करावे लागते. जादा दबावामुळे डिझेल इंजिन पेट्रोल इंजिनापेक्षा अधिक ऊर्जा तयार करण्यात सक्षम असते. इतकी पॉवरची गरज बाईकला नसते. त्यामुळेच बाईकसारख्या वाहनात डिझेलचे इंजिन नसते. असे इंजिन बसवणे महागडे ठरते. असे इंजिन असलेल्या बाईक अत्यंत महागड्या ठरतील. त्यामुळे कंपन्या पेट्रोल इंजिनला प्राधान्य देतात. तसेच डिझेल इंजिन मोठे असल्याने दुचाकीचा आकार वाढेल आणि या बेढब दुचाकी चालविणे जिकरीचे होईल.

चुकून डिझेल ओतल्यास काय होईल?

पेट्रोल दुचाकीच्या इंधन टाकीत चुकून डिझेल ओतल्यास बाईक सुरूच होणार नाही. बाईक तरीही बळजबरीने सुरू करण्याचा प्रयत्न केला तर बाईकचे इंजिन जाम होईल. त्यामुळे चुकून डिझेल टाकल्या गेल्यास बाईक तशीच लोटत अथवा इतर वाहनातून मॅकेनिककडे न्या. फ्युएल टँक आणि फ्युएल पंपमधून डिझेल पूर्णपणे काढून टाकावे लागते. या टाकीतून डिझेल पूर्णपणे निघाल्यावर पेट्रोल टाकून ती स्टार्ट करावी लागते.

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.