इथेनॉल मिश्रित पेट्रोलने घटणार मायलेज ? E20 पेट्रोलबाबत महत्वाची अपडेट काय?
ऑटोमोबाईल सेक्टरशी संबंधित वाहनांमध्ये 20 टक्के इथेनॉल-मिश्रित पेट्रोल ( E20) च्या वापराने गाड्यांची फ्युअर एफिशियन्सी म्हणजेच मायलेजवर परिणाम होऊ शकतो. कारच्या मॉडेलनुसार त्यांच्या मायलेजवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारत सरकार वाहनांसाठी आता 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल ( E20 ) च्या वापरासाठी प्रोत्साहन देत आहे. पेट्रोलचे वाढत्या दरामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. परंतू ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज संबंधित काही तज्ज्ञांच्या मते या प्रकारच्या इंधनांनी वाहनांची फ्युअल एफिशियन्सी म्हणजे मायलेजवर परिणाम होऊ शकतो असे म्हटले जात आहे. या प्रकारच्या E20 इंधनाने वाहनांचे मायलेज 2 ते 5 टक्क्यांपर्यंत कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
का घटणार मायलेज ?
वाहन तज्ज्ञांच्या मते इथेनॉलची कॅलोरिफिक व्हॅल्यू पेट्रोलहून कमी असते.याचा अर्थ ज्वलन झाल्यानंतर इथेनॉल पेट्रोलच्या तुलनेत कमी ऊर्जा निर्मिती करते. त्यामुळे जेव्हा पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिक्स केले जाते तेव्हा गाड्यांची इंधन क्षमता घटत असते.
जुन्या वाहनांवर होणार परिणाम
नवीन वाहन हळूहळू ई-20 इंधनास अनुकुल तयार केली जात आहेत. परंतू जुन्या वाहनांसाठी हे इथेनॉल मिश्रित पेट्रोल आव्हनात्मक ठरणार आहे. इंजिनिअर्सचे म्हणणे आहे की खूप जुन्या वाहनांमध्ये गॅस्केट, फ्युअल रबर पाईप आणि होज सारखे पार्ट्स वर याचा परिणाम होऊ शकतो. परंतू हा परिणाम लागलीच दिसणार नाही.
सरकारचे काय म्हणणे ?
तेल मंत्राल्याने म्हणणे आहे की सोशल मीडियावर सुरु असलेली हा प्रचार चुकीचा आहे. E20 ने मायलेज कमी होणार हे चुकीचे आहे. मंत्रालयाच्या मते जुन्या वाहनांमध्ये ( E20 कम्पॅटेबल ) देखील मायलेज घसरण अंत्यत कमी असते. अनेक कंपन्या तर 2009 पासूनच E20-आधारित कार बनवित आहेत.
यावर मंत्रालयाने सांगितले E20 या इंधनासाठी तयार केलेल्या नवीन कार केवळ चांगला परफॉर्मेंस देतात असे नव्हे तर शहरातील ड्रायव्हींग स्थितीही वेगाने एक्सलेरेशन देखील उपलब्ध करतात. यासोबत इथेनॉल बाष्पीकरण क्षमता (heat of vaporisation) पेट्रोल पेक्षा जास्त असते. त्यामुळे इंजिनाचे तापमान कंट्रोलमध्ये रहाते. आणि एअर फ्युअल मिश्रण घट्ट होऊन जाते. याचा फायदा थेटपणे व्हॉल्युमॅट्रीक एफिशिएंशी वाढण्याच्या रुपात मिळते.
किती होऊ शकतो परिणाम ?
मंत्रालयाच्या मते ज्या कारना E10 साठी डिझाईन केलेले आहे आणि त्यांना E20 साठी कॅलिब्रेट केले आहे, त्या कारमध्ये मायलेज केवळ 1 ते 2 टक्क्यांपर्यंत घटू शकते. आणि ज्या कार E20 साठी तयार नाहीत. त्यात 3 ते 6 टक्क्यांची घट पाहायला मिळू शकते.
